HomeArchiveआश्वासनांच्या तुकड्यांपेक्षा भाकरीची...

आश्वासनांच्या तुकड्यांपेक्षा भाकरीची चतकोर द्या!

Details
आश्वासनांच्या तुकड्यांपेक्षा भाकरीची चतकोर द्या!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान
[email protected]
काही दिवसांपूर्वीच काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्याविषयी लिहिताना जाहीरनामे, एक आश्वासनसमृद्ध अडगळ.., असे लिहिले होते. ते एवढ्यासाठीच की जाहीरनाम्यातील बहुतेक आश्वासने फक्त जाहीरनामा पुस्तिकेच्या कागदावरच राहतात. मतदान होते, सरकार निवडले जाते आणि सत्तेवर येताचक्षणी संबंधित पक्षांना, उमेदवारांना, विजयी लोकप्रतिनिधींना, नेत्यांना आश्वासनांचा विसर पडतो. देशासमोरील वास्तव काही वेगळेच असल्याचे त्यांना जाणवते. आपल्यासमोर वाढून ठेवलेले जबाबदारीचे ताट फारसे आकर्षक नाही, पंचपक्वानांनी सजवलेले नाही, त्यात चटणीभाकरच आहे, गोडधोड नावालाच आहे, हे दिसते आणि विजयाच्या धुंदीत असलेले सर्वजण जमीनीवर येतात. मग काही आश्वासनांच्या पूर्ततेचा खटाटोप सुरू होतो. काही आश्वासनांना बगल दिली जाते, काही आश्वासने वा मुद्दे तर आम्ही असे बोललेलोच नाही, असे सांगून बेधडक फेटाळली जातात.

देश सांभाळण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त सुरू असते, आला दिवस निघून जातो, नवनवीन धोरणे, उपक्रम जाहीर होतात, काही सुरूही होतात. अशा अवस्थेत पाच वर्षे सरायला येतात, पुन्हा निवडणुकांचे वेध लागतात आणि पुन्हा जाहीरनाम्यांची समृद्ध अडगळ गोळा होऊ लागते. काँग्रेसपाठोपाठ भारतीय जनता पार्टीने त्यांचा जाहीरनामा तथा संकल्प पत्र सोमवारी जाहीर केले तेव्हा त्यातील अनेक मुद्दे म्हणजे भविष्यात फक्त आश्वासनांची अडगळ होऊ शकते असे जाणवले. राज्यात आणि देशात पहिल्या टप्प्यातील मतदान अवघ्या तीन दिवसांवर आले असताना भाजपाने हा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. विदर्भातील सात मतदारसंघात येत्या गुरूवारी भाजपाची कसोटी लागणार आहे. गडकरींचे नागपूर, वर्धा, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ-वाशिम या संमिश्र तोंडवळ्याच्या मतदारसंघात ११ एप्रिल रोजी मतदान होत आहे.

प्रचारसभांमधून जनतेला अपेक्षित मुद्द्यांवर, रोजच्या जगण्याशी निगडीत प्रश्नांवर बोलण्यापेक्षा देश, देशप्रेम, फितुरी, देशद्रोही, हिंदुत्ववाद, पाकिस्तान, करारा जबाब अशाच गोष्टींवर बोलण्यावर भाजपाच्या नेतृत्त्वाने भर दिला आहे. पण जाहीरनाम्यात मात्र शेतकरी, बेरोजगार यांच्यासह अनेकांना आश्वस्त करण्यात आले आहे. गेली अनेक वर्षे राम मंदिर उभारण्याची वाट पाहणाऱ्या मंडळीनांही पुन्हा राम मंदिर निर्मितीचं आश्वासन देत चुचकारण्यात आले आहे. प्रत्येक घरात वीज, शौचालय, ६० वर्षांवरील शेतकऱ्यांना पेन्शन, १ लाखांपर्यंतचे कृषी कर्ज व्याजमुक्त, कृषी क्षेत्रात २५ लाख कोटींची गुंतवणूक अशा भरघोस घोषणांचा पाऊस शेतकऱ्यांवर पाडण्यात आला आहे.

आश्वासनसमृद्ध अडगळ म्हणतात ती हीच. जे काँग्रेसचे तेच भाजपाचे. शेतकऱ्यांचे प्रश्न कायमस्वरूपी सोडवावेत या इच्छाशक्तीपेक्षा शेतकरी मतदारवर्ग आपल्या बाजूने यावा याचसाठी सर्व पक्षांचा खटाटोप सुरू असतो. या निवडणूक जाहीरनाम्यांमधूनही काँग्रेस वा भाजपाने काही वेगळे चित्र दाखवलेले नाही. अर्थातच त्यामुळे, भाजपाच्या आधीच्या आश्वासनांची पूर्तता अद्याप झालेली नाही, पहिले आधीचा हिशेब चुकता करा, अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. आश्वासनांमुळे कागदावरील चित्र बरं दिसत असलं तरी त्याला सत्यात उतरवण्याची तुमची पात्रता नाही, असा टोला मुंडे यांनी मारला आहे. पंधरा लाख, अच्छे दिन, शेतकऱ्यांच्या मालाला दुप्पट हमीभाव, दोन कोटी नोकऱ्या या गेल्या निवडणुकीतील आश्वासनांची भाजपाला आता मुंडेसह सर्वच विरोधी पक्ष आठवण करून देतील. शेतकऱ्यांबरोबरच मध्यमवर्गालाही मधाचे बोट लावण्यात आले आहे. राम मंदिर मात्र थेट ४१ व्या पानावर दोन ओळींत आटोपले आहे. ऐतिहासिक कामगिरी, विकासाची पाच वर्षे अशी भलामण भाजपाने केली असली तरी देशातील सध्याची परिस्थिती वेगळेच काही सांगते. अर्थात भाजपाने ७५ संकल्प पूर्ण कऱण्यासाठी २०२२ ची मुदत घेत बाजू सावरली आहे.

शेतकऱ्यांसाठी बरेच काही करण्याचे ढोल भाजपाने या संकल्प पत्रात पिटले आहेत. मग यातील किमान चार-पाच गोष्टी तरी निदान दुप्पट भाव तरी गेल्या पाच वर्षांत भाजपाचे सरकार का देऊ शकले नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांनीच विचारायला हवा. पण प्रचारसभांमध्ये या शेतकऱ्यांना अर्थात मतदारांना चौकीदार, नामदार, देश की सुरक्षा, आघाडीची बनवेगिरी, नेहरू, काँग्रेसमुक्त भारत, विरोधक काम करू देत नाहीत, विरोधी पक्ष घाबरले आहेत, असल्या शब्दांच्या बुडबुड्यांमध्ये भ्रमचित्त केले जात आहे. या सभांमधील मोदी, मोदी चा गजर दिवसेंदिवस कमी होत आहे हे लक्षणीय आहे. आश्वासने देतानाच भाजपाने रोजगारनिर्मितीचे उपाय सांगायला हवेत, कृषि भावांबद्दल बोलायला हवे, शिक्षण सुविधांबद्दल भूमिका मांडायला हवी. मरगळलेल्या अर्थव्यवस्थेला गतिमान करण्याचे धोरण जाहीर करायला हवे. लोकांप्रती, देशाविषयी असलेली भाजपाची कळकळ, देशप्रेम अशा गोष्टींमधूनच समोर येईल. हिंदुत्ववाद, देशप्रेम, विरोधात बोलेल तो देशद्रोही, विकासाची थापेबाजी, कळवळ्याचा खोटा आव हा सर्व बेगडीपणा आता मतदारांच्याही लक्षात येऊ लागला आहे. या बोगस मुद्द्यांवर तासंतास बोलून नेतेमंडळी भरल्या पोटी ढेकर देऊ शकतात पण, गरिबांच्या, भुकेल्यांच्या पोटात उसळलेला भुकेचा वडनावल ताटातील भाकरीची अस्सल चतकोरच शमवू शकते. आश्वासनांचे तुकडे मतदारांच्या अंगावर फेकणाऱ्या सर्वच पक्षांच्या हे जेवढे लवकर लक्षात येईल तेवढे बरे!”
 
“शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान

Continue reading

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...

केशव उपाध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तर डावखरे, राणे सरचिटणीस!

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचवेळी प्रदेश सरचिटणीस म्हणून आमदार निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश...
Skip to content