HomeArchiveआंबेडकरी चळवळीचे ``पानीपत’’!...

आंबेडकरी चळवळीचे “पानीपत’’! – अंतीम भाग

Details
आंबेडकरी चळवळीचे “पानीपत’’! – अंतीम भाग

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

भगवान निळे, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक-धार्मिक आणि आर्थिक चळवळ हे आंबेडकरी चळवळीचे चार अंगभूत भाग आहेत. या चारही भागात आंबेडकरी चळवळ सपशेल अयशस्वी ठरली आहे हे नाकारता येत नाही. आंबेडकरी चळवळ पेचात सापडली आहे. ती नेताविहीन झाली असून संधीसाधू मंडळींच्या मुठीत गेली आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी चळवळ जिवंत ठेवण्यासाठीच नेते धडपडत आहेत. चळवळीला आपल्या पोटापाण्याचे साधन बनवून सत्ताधारी व विरोधी पक्ष यांनी वापरून घेण्याचे खेळणे बनवून टाकले आहे. भावनिकतेच्या व आक्रस्ताळेपणाच्या बाहेर दलित चळवळ यायला तयार नाही. आंबेडकरी पक्षातील प्रत्येक नेता जो स्वबळावर निवडून येऊ शकत नाही, एवढेच नव्हे तर, एखादा नगरसेवकही निवडून आणू शकत नाही असे नेते स्वतःला ‘प्रती आंबेडकर’ व ‘राष्ट्रीय नेता’ समजतात. कुत्र्यांच्या छत्र्यांप्रमाणे उगवणाऱ्या दलित संघटना मनुष्यपरत्वे निघत आहेत. हे जागरूकतेचे लक्षण नसून आंबेडकरी चळवळीच्या उद्द्येशाला नष्ट करण्याचे कारस्थान आहे, हे कुणीही नाकारणार नाही.

आंबेडकरी राजकीय चळवळ मुळातच खुज्या नेतृत्त्वामुळे खुंटली आहे. स्वार्थामुळे दलित नेते समाजातील गोरगरीबांचे प्रश्न हाताळू शकत नाहीत. बिल्डर व राजकीय गुंडासोबत असलेल्या कार्यकारणभावामुळे झोपडपट्टीत राहणाऱ्या दलितांच्या दु;खाशी त्यांना कसलेही देणेघेणे उरले नाही. दलितांच्या शिक्षणाचा, दलित विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी, अन्याय, दलित कामगार, शेतकरी, महिलांचे प्रश्न यावर भाष्य करणेही आता दुरापास्तच झाले आहे. निवडणुका जवळ आल्या की या तथाकथित नेत्यांना समाज आठवतो. कारण निवडणुकांच्या काळात हा समाजच त्याच्या आर्थिक देवाणघेवाणीचे केंद्र बनून जात असतो, हे भीषण वास्तव आहे. राजकारणात अयशस्वी झालेले नेते समाजकारण व धर्मकारणातही लुडबूड करताना दिसतात. धर्मकारण व समाजकारण या क्षेत्राच्या आधारेच आपण राजकारणात टिकू शकतो व सर्वसाधारण लोकांचा पाठींबा मिळवू शकतो अशी या तथाकथित नेत्यांची धारणा बनलेली आहे. त्यामुळेच भारतीय बौद्ध महासभा, पीपल्स एजुकेशन सोसायटी, दीक्षाभूमी स्मारक यासारख्या संस्थावर आपला ताबा ठेवण्यासाठी हे नेते जंगजंग पछाडतात. माणसे गोळा करण्याची व गर्दी खेचण्याची ही शक्तीस्थळे आहेत.

खाजगीकरण व जागतिकीकरणामुळे आता सामाजिक, राजकीय व आर्थिक संदर्भ बदलले आहेत. परिणामी खाजगीकरण-उदारीकरण-जागतिकीकरण धोरणाने क्रान्तीकारी विचार बोथट होत चालला आहे. चळवळीच्या नावाखाली बिगर-सरकारी संघटनांचे पीक जोरात आले आहे. 1990 नंतरचा कालखंड हा दलित चळवळीच्या ऱ्हासाचा कालखंड आहे. या कालखंडामध्ये सरकारने उदारीकरण, जागतिकीकरण व खाजगीकरणाचे धोरण अपरिहार्यपणे स्वीकारल्यानंतर आर्थिक संरचनेत व त्या अनुषंगाने सामाजिक संरचनेत काही मूलगामी बदल होत आहेत. या बदलाच्या सर्वव्यापी प्रभावाला सामोरे कसे जावे हे न कळल्यामुळे दलित चळवळीमध्ये वैचारिक सैरभैरपणा आलेला आहे.

आंबेडकरी चळवळ उथळ सत्ताकारण व वलयांकित व्यक्तिमत्वाभोवती फिरत राहिल्याने दलित चळवळीकडे बदलत्या काळानुरूप आजच्या नवभांडवलशाहीविरूद्ध लढण्यासाठी भूमिका , धोरण व कृतिशीलता नाही. ती संसदीय चौकटीतील सत्ताकारण व जोडीला अस्मिताकेंद्री राजकारणाभोवती फिरत राहिली आहे. दलित नेत्यांचे राजकारण निवडणूककेंद्री बनल्यामुळे त्यांची जनतेपासूनची नाळ तुटली आहे. केवळ राजकीय सत्तेच्या तुकडयांवर संतुष्ट न राहता, एकूण वर्ग-जात-स्त्री-दास्य अंतासाठी सर्वहारा वर्गाच्या सहाय्याने जनलढे उभारले पाहिजेत याचा दलित नेत्यांना विसर पडल्याचे दिसत आहे. जातीविरोधी लढयातील वर्गीय बाजू दलित चळवळीने कायम दुर्लक्षित ठेवल्याने दलित चळवळीला जात व प्रादेशिकता ओलांडून, शोषित जाती वर्गामध्ये आपला पाया विस्तारायचा असेल तर, यापुढे जातीविरोधी लढा वर्गलढयाबरोबर पुढे न्यावा लागेल. अन्यथा, एकूणच लढाऊ बाण्याची असलेली दलित आंबेडकरी चळवळ काँग्रेस-भाजपाच्या दारात हातात कटोरा घेऊन उभी राहिलेली दिसेल.

दलित आणि आंबेडकरी चळवळीचा जन्म समाजकार्यातूनच झालेला आहे. सामाजिक चळवळीच्या माध्यमातून मनपरिवर्तन करता येऊन समान हक्क, समान वागणूक व मानसन्मान मिळू शकतो. आंबेडकरी सामाजिक चळवळीचे साध्य हेच आहे. राजकारण व राजकीय सत्ता हे समस्या सोडविण्याचे माध्यम असले तरी सामाजिक चळवळींना मूठमाती देऊन सत्ताधाऱ्यांच्या कळपात सामील होणे कधीही योग्य ठरणार नाही. सामाजिक चळवळी या व्यवस्था परिवर्तनाचे माध्यम असतात. विषमतावादी व्यवस्थेत सामाजिक हक्क, आत्मसन्मान व आर्थिक समानता सहजासहजी मिळत नसते. त्यासाठी संघर्ष करावा लागतो. आंबेडकरी चळवळ आता संघर्ष करण्याचेच विसरली आहे. समाजउद्धारासाठी रस्त्यावर उतरणे आता इतिहासजमा झाले आहे. भावनिक प्रश्नांवर लोकांची डोकी भडकवून त्यांना मूळ समस्येपासून दूर नेण्याचे पातक नेत्यांनी केले आहे. व्यक्तीगत हेवेदावे, मत्सर व अहंकार याद्वारे अनेक चळवळी नष्ट झाल्या. परंतु, त्यांचे उद्द्येश मात्र कधीच सफल झाले नाहीत, हेही इतिहास सांगतो.”
 
“भगवान निळे, ज्येष्ठ पत्रकार

Continue reading

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...

केशव उपाध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तर डावखरे, राणे सरचिटणीस!

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचवेळी प्रदेश सरचिटणीस म्हणून आमदार निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश...
Skip to content