HomeArchiveऑपरेशन समुद्रसेतूत अँफिबियास...

ऑपरेशन समुद्रसेतूत अँफिबियास बोटींचा सहभाग!

Details
“विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार”

 
जगभरात असलेल्या लॉकडाऊनमुळे मालदीव नि यूएइमध्ये अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी तीन बोटी पाठवण्यात आल्या असून त्या कोचीत दाखल होतील. संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने ही माहिती ट्विटरवरून दिली. सरकारने या जहाजांना रवाना केले. आयएनएस जलाश्व मुंबई बंदरातून तर आयएनएस मगर याला आपली दिशा वळवण्याचा सूचना देत मालदिवला पाठवण्यात आले. आयएनएस शार्दूलदेखील दिशा बदलून दुबईला रवाना केले आहे. ही तिन्ही जहाजे कोची येथे येतील. जलाश्व हे पूर्व नौदल तर मगर नि शार्दूल दक्षिण कमांडच्या अखत्यारीत येते.

 
 
“ऑपरेशन समुद्रसेतू हाती घेतलं जात असल्याची बातमी आली तीच मुळात आय एन एस जलाश्व या नौकेच्या नावाने! ७ मेच्या सकाळी ती माले बंदरात दाखल झाली. कोरोनामुळे या देशात अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेची जबाबदारी स्वीकारत ती कार्यरत झाली. लँडिंग प्लॅटफॉर्म डॉक म्हणजे हेलिकॉप्टर उतरण्याची क्षमता. आपत्ती काळात बोटीवर हेलिकॉप्टर दाखल होत असेल तर ती अधिकची क्षमता मानली जाते. ऑस्टिन क्लास गटातील ही बोट आहे. अशाप्रकारच्या काही मोजक्याच अँफिबियास गटाच्या नौका भारताकडे आहेत. याद्वारे सैन्य, संबंधित ट्रक किंवा रणगाडे अशी वाहतूक करता येते. या ‘जलाश्व’वर तीन मेगा वॅट इतकी विद्युत निर्मितीक्षमता असून तिचा उपयोग बोटीच्या चलनवलनासाठी होतो. साठ हजार गॅलन ताजे पाणी तयार होते. या बोटीवर असलेली वैद्यकीय सुविधा ही मानवीय मदत नि आपत्ती निवारण मोहिमेसाठी वापरता येऊ शकते. याच कारणास्तव या बोटीची निवड करण्यात आली. या नौकेवर बाह्य देशातून आणलेलं नि अधिकारी कर्मचारी यांच्यात दोन भाग करण्याची सोय आहे. L 41, ‘जलाश्व’ ही 26 मार्च 1987 ला कार्यान्वित झाली.”
 
लँडिंग शीप टँक या गटातील आय एन एस शार्दूल हिची निर्मिती कोलकात्याच्या गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स या कंपनीने केली आहे. समुद्री आणि किनाऱ्यावरील हालचालींसाठी उपयुक्त असलेली ही मोठी नौका आहे. ही मगर श्रेणीतील उन्नत टप्प्याची बोट आहे. सुमारे ९०% इतकी स्वदेशी बनावटीची असून अनेक वैशिष्ट्यपूर्ण उपकरण नि साहित्याने सज्ज आहे. ही L 16 शार्दूल’ जानेवारी 2007ला कार्यरत झाली.
 
ही एक अँफिबियास युद्धनौका असून L 20 क्रमांकाची 15 जुलै 1987ला नौदलात दाखल झालेली बोट आहे. हिंदुस्थान शिपयार्डने या बोटीची बांधणी नि आरेखन केले तर गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स यांनी अन्य फिटिंग्स केली. या बोटीवर दोन दोन मध्यम पल्ल्याची माल नि मनुष्यबळवाहू हलिकॉप्टर वापरता येतात. सदर जहाजाला समोरच्या बाजूने तळाला दरवाजा असून त्यासहाय्याने माल नि सैन्य कुमक किनाऱ्यावरून आतबाहेर केली जाते. सध्या ही नौका फर्स्ट ट्रेनिंग स्क्वाड्रन म्हणून तरूण अधिकाऱ्यांना समुद्री प्रशिक्षणासाठी १० एप्रिल २०१८पासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. याच अँफिबियास गटात केसरी L 15 ही युद्धनौका 5 एप्रिल 2008 तर L 24 ऐरावत युद्धनौका 19 मे 2009 रोजी ताफ्यात सामील झाली. तर घडियाल ही L 23 युद्धनौका 14 फेब्रुवारी 1997ला नौदलाला सुपूर्द करण्यात आली.
 
विदेशात अडकलेल्या लोकांना आणण्याच्या मोहिमेतील पहिला टप्पा ६९८ भारतीयांना आणून 10 मे राजी पूर्ण केला गेला. दुसरा टप्पादेखील आताच्या रविवारी पूर्ण केला. या खेपेत लोकांना आणण्यात आले. पहिल्यांदा ५९५ पुरूष आणि १०३ महिलांना आणले गेले. १० वर्षांखालील १४ बालके १९ गर्भवती महिला यांचा यात समावेश होता. सर्वांमध्ये प्रामुख्याने ४४० केरळचे तर १८७ तामिळनाडूच्या लोकांना सामील करून घेण्यात आलं.
 

Continue reading

विधिमंडळात आजही गदारोळ?

विधानसभेत अध्यक्षांसमोरील राजदंडाला स्पर्श करत निदर्शने केल्यामुळे काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंगळवारच्या संपूर्ण दिवसभराच्या कामकाजासाठी सभागृहातून निलंबित केले. विधिमंडळात आजही काँग्रेससह विरोधी पक्षांच्या सदस्यांकडून कृषीमंत्र्यांच्या कथित वादग्रस्त विधानांविरूद्ध आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता...

रविवारी आस्वाद घ्या आरती ठाकूर-कुंडलकर यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने कै. पं. के. जी. गिंडे यांच्या स्मरणार्थ आरती ठाकूर – कुंडलकर यांचे गायन येत्या रविवारी, ६ जुलैला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी त्यांना संजय देशपांडे तबला...

सरकारी ‘चरणसेवे’चा १ लाख ४० हजार वारकऱ्यांनी घेतला लाभ

आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील लाखो वारकरी पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाले आहेत. या थकवणाऱ्या प्रवासात त्यांच्या पायांना विश्रांती आणि आरोग्यसुविधा मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘चरणसेवा’ उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता...
Skip to content