Friday, October 18, 2024
HomeArchiveअन्न, वस्त्र आणि...

अन्न, वस्त्र आणि मोबाईल!

Details

 

 
 
विनोद साळवी..
” कार्यकारी संपादक, महाराष्ट्र दिनमान
Vinodsalvi1@gmail.com”
 
 
“गावरान भाषेत बोलायचं तर आजच्या घडीला मोबाईल नावाच्या खेळण्यानं ‘येडं पेरलंय नि खुळं उगवलंय’, हा प्रत्यय कुठेही घेता येईल. तासन्तास चॅटिंग, कधीही, कुठेही, केव्हाही बोलायचं. वेळ, काळेला नेम नाही. अवघं जीवन आणि या जीवनातील प्रत्येक सेंकद अन् सेंकद या मोबाईलने व्यापून टाकला आहे. खाता-पिता-उठता-बसता-झोपता बस्स मोबाईल हवा. टपाल, तार, आंतरदेशीय, पोस्टकार्ड, पीसीओ, ग्रिटिंग, पेजर हा बाद होत गेलेला ट्रेण्ड. इनकमिंग-आउटगोईंगने एका झटक्यात मोबाईलमधून वजा होणार्याव पैशांमुळे वेळ, काळेचे गणित पाळूनच आणि एक एक शब्द तोलून मापून बोलायचा जमानाही संपला. परंतु आता घोटभर घेतल्यानंतरही पोटभर बोला! ही स्वस्त डेटा ऑफर अन् कर लो धंदा मुठी में!”
 
 
“रिलायन्स जिओ बंपर ऑफर्सचा भुलभुलय्या, तीन महिने मोफत सेवा, आमचा मोबाईल, आमचं सीमकार्ड हे मार्केटिंगचे तंत्र व मंत्र आपोआप साधलं गेलं. माणूस सर्वाधिक मोबाईलमध्ये गुरफटत गेला. एकवेळ पोटाला अन्न-पाणी नसलं तरी डेटा प्लान हवाच. मोबाईलचा पडदा (स्क्रीन) सतत हलता-झुलता पाहिजे. मग, नव्या डेटा प्लाननुसार आता बोलणं महागलं असलं तरी इथं हौसेला मोल नाही. त्यापरीस मोबाईल नावाचं जडलेलं व्यसन, डेटा, इंटरनेट आणि काहींसाठी व्हॉट्अॅप, फेसबुक, इन्स्टाग्रामपर्यंत मर्यादित असलेली कॉपी-पेस्टची दुनिया ते कधीही मोबाईल नावाच्या जंजाळातून सुटणार नाहीत. मोबाईल कंपनी मग ती कुठलीही असो तिला व्यवसाय हवा. आता तर व्होडाफोन-आयडिया, एअरटेल आणि जिओ या तिन्ही कंपन्यांनी त्यांचे दरपत्रक वाढवले आहे. त्यामुळं अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गरजांपैकी एक बनलेला मोबाईल अन् त्यांचा प्लान कितीही महागला तरी दूध, केबल, गॅस सिलिंडरवाल्याप्रमाणं त्याचंही ओझं सहन करण्यासाठी अगदी सर्वसामान्य गरिबांचा खिसा गरम असेल.”
 
 
“याचं कारण की मोबाईल ही गरज आहेच. परंतु, त्यापेक्षा ते एक जडलेलं व्यसन आहे. दारू सोडवता येईल पण मोबाईल? या व्यसनाच्या आहारी देशातील जवळपास ३९ ते ४४ टक्के जनता गेली आहे. स्मार्ट फोन नसला तर काहींना अस्वस्थ वाटल्यासारखंही होतं, हा अनुभव घरोघरचा आहे. हा स्मार्टफोन बहुपयोगी असला तरी त्यात खाली मान घालून तासन्तास वेळ वाया घालवणारी मंडळी आपल्या अवती-भवती बघत असतो. या फोननं अगदी तुमच्या-आमच्या मान आणि पाठीचा कणा मोडून पडला. डोळ्यांचा विकारही जडला तरीही मोबाईल काही सुटता सुटत नाही. घरकुटुंबात हा मोबाईल नावाचा पाहुणा आला नि बघता बघता त्यानं एवढं जग व्यापून टाकलं. मूल जन्माला आलं, रांगू लागलं की त्याला गप्प बसवण्यासाठी आई-बाबा त्याच्या हातात खुळखुळा, बाहुली देत असल्याचा इतिहासही आता मोबाईलने पुसून टाकला आहे. काही अपवाद वगळता आता लहान मुलांच्या हातचं खेळणं म्हणून मोबाईल झाला आहे. मला येत नाही पण माझा बाळ माझा मोबाईल सर्हायईतपणे हाताळतो, असं अभिमानानं सांगणारी पालकमंडळीही समाजात आहेत.”
 
 

 
 
 
“कोणत्याही गोष्टींचे चांगले आणि वाईट असे परिणाम असतात. मोबाईल ही कामापुरती गरज नसून सुखवस्तूच्या यादीत गेल्यानं गरीब-श्रीमंती हा भेदाभेद करता येणार नाही. आजकाल माणसं माणसांशी संवाद साधताना किती दिसतात? हवं तर मोबाइलवर फोन कर माझ्याकडे आता वेळ नाही. लोकल ट्रेनमधून प्रवास करणारी माणसं मोबाईलमध्ये डोकं खुपसून इतकी आत्ममग्न दिसतात की आपल्या आजूबाजूला काय घडतयं, याच्याशी त्यांना काही देणं घेणं नाही. गेल्या काही वर्षांत वर्तमानपत्रात डोक खुपसून बसणार्यात लोकांपेक्षा मोबाईलमध्ये तन-मन-धन अर्पिलेली लोकसंख्या वाढीस लागली आहे. त्यामुळे मोबाईल निर्मिती आणि डेटा विक्री करणार्याअ कंपन्यांना मरण नाही. गाव-शहर जाल तिथं मोबाईलचं दुकान आणि गॅलर्याक. गॅस सिलिंडर, भाज्या-तरकार्याा महागल्या म्हणून कुणी जेवण सोडत नाही तसंच अगदी मोबाईल आणि डेटाचं झालं आहे. ऐकवेळ जेवणं नसलं तरी चालेलं पण, मोबाईल हवा आहे. व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेलचे नवे दर ३ डिसेंबरपासून लागू झाले आहेत. जिओचे नवीन दर ६ डिसेंबरपासून लागू होणार आहेत. या बातमीनं कोणताही मोठा हाःहाकार उडाल्याचं कुठेचं दिसत नाही. कारण पहिल्यांदा ज्यांनी व्यसन लावलं त्यांच्याकडे तुम्ही-आम्ही ठरलेलं गिर्हा ईक म्हणून तुम्हाला जाळ्यात ओढणारी वेसणही आहे. मग, आता सांगा डेटा महागला म्हणून मोबाईल वापरणं सोडाल की फक्त नेमकं नि मोजकं बोलून डेटा कुठं-कुठं वाचवाल?”

Continue reading

उत्तर प्रदेशात एन्काऊंटरचे सत्र सुरूच!

उत्तर प्रदेशमध्ये संशयित आरोपीचा एन्काऊंटर (पोलीस चकमक) करण्याचे सत्र अजूनही चालूच आहे. आज बेहराईचमधल्या रामगोपाल मिश्रा यांच्या हत्त्येतल्या दोघा संशयित आरोपींबरोबर पोलिसांची चकमक झाली. त्यात सर्फराज आणि तालीब, हे दोन आरोपी जखमी झाल्याचे समजते. गेल्या ७ वर्षांत उत्तर प्रदेशात...

प्रेम, नुकसान आणि उपचार म्हणजेच जिंदगीनामा!

जिंदगीनामा, सोनी लिव्हवरील सहा भागांचा काव्यसंग्रह, शक्तिशाली कथनातून मानसिक आरोग्याच्या गुंतागुंतीचा शोध घेतो, ज्यातील प्रत्येक अद्वितीय आव्हाने हाताळते. मालिका सहानुभूती वाढवण्याचा आणि अनेकदा न बोललेल्या विषयांबद्दल संभाषण वाढवण्याचा प्रयत्न करते. प्रिया बापटसाठी, हा प्रकल्प फक्त दुसऱ्या भूमिकेपेक्षा अधिक होता–...

20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात मतदान! 23ला निकाल!!

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका एकाच टप्प्यात होणार असून त्याचकरीता येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होईल. मतमोजणी 23 नोव्हेंबरला होणार असून त्याचदिवशी निकाल जाहीर केले जातील. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. या...
Skip to content