येस बँकेने इंडियन ऑलिंपिक असोसिएशनबरोबर (आयओए) भागिदारी केली आहे. या भागिदारीमुळे येस बँक पॅरिस ऑलिंपिक्स २०२४मध्ये भारतीय टीमची अधिकृत बँकिंग भागीदार असेल. यानिमित्ताने येस बँकेने पॅरिस ऑलिंपिक २०२४साठी रवाना होणाऱ्या पथकासाठी ‘येस ग्लोरी’ हे खास बचत खाते तयार केले आहे.
येस बँकेच्या मुंबईतल्या मुख्यालयात झालेल्या एका खास कार्यक्रमात या भागिदारीची घोषणा करण्यात आली. यावेळी येस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत कुमार, कार्यकारी संचालक राजन पेंटल, आयओएच्या अध्यक्षा खासदार डॉ. पी. टी. उषा, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुराम अय्यर, अथलीट्स कमिशनच्या अध्यक्षा मेरी कोम आणि लंडन ऑलिंपिक्स २०१२च्या ब्राँझ पदक विजेत्या आणि पॅरिसमधील भारतीय खेळाडू मनू भाकेर, राजेश्वरी रिया कुमारी, परवीन हुडा आणि धीरज बॉमदेवरा यांचा समावेश होता.
ऑलिंपिक गुणवत्तेचा विकास करण्यातील यंत्रणेची ताकद दाखवून देण्याचे या भागिदारीचे उद्दिष्ट आहे. या तत्त्वाशी सुसंगत राहत येस बँकेने ‘मिलकर जिताएंगे’ हे कँम्पेन लाँच करत प्रत्येक विजयामागे एकजूट किती महत्त्वाची असते हे अधोरेखित करण्याचे ठरवले आहे. येस बँकेचे तत्त्व ‘लाइफ को बनाओ रिच’ या भागिदारीशी सुसंगत असून त्यात अनुभव आणि आठवणींमध्ये सामावलेल्या जीवनाच्या श्रीमंतीवर भर देण्यात आला आहे. आपले खेळाडू जागतिक स्तरावर स्पर्धा करत असताना त्यांची कामगिरी राष्ट्रीय अभिमानाला बळ देणारी व एकत्रित अनुभवांचा नवा वारसा तयार करणारी असेल.
येस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत कुमार म्हणाले की, आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रातील भारताच्या कामगिरीने देशाला प्रेरणा दिली आहे. भारतीयांसाठी ऑलिंपिक विशेष महत्त्वाचे असून त्यानिमित्ताने सर्व देश खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी एकत्र येतो. येस बँक भारतीय टीमला गुणवत्तेचा ध्यास घेण्याच्या प्रवासात पाठिंबा देण्यासाठी व पर्यायाने राष्ट्रीय अभिमान व कामगिरीप्रती योगदान देण्यासाठी बांधील आहे.

येस बँकेने पॅरिस ऑलिंपिक २०२४साठी रवाना होणाऱ्या पथकासाठी ‘येस ग्लोरी’ हे खास बचत खाते तयार केले आहे. यातून येस बँकेने खेळाडूंना शुभेच्छा देण्याचा आणि कुटुंबियानी त्यांच्या प्रवासात बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेची दखल घेण्याचा प्रयत्न केला आहे. येस ग्लोरी खात्याचे लाभ खेळाडूंच्या जवळच्या कुटुंबातील सदस्यांनाही मिळणार आहेत.
येस ग्लोरीची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे-
· स्वागत करण्यासाठी मोफत ताज व्हाउचर
· अस्थीरोगतज्ज्ञांद्वारे मोफत सल्लासेवा
· आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या खर्चात शून्य क्रॉस-करन्सी मार्क अप.
· मोफत वैद्यकीय विमा
· येस ग्लोरी गोल्ड डेबिट कार्ड (आपल्या विजेत्या खेळाडूंसाठी खास तयार केलेले डेबिट कार्ड)
· मोफत आंतरराष्ट्रीय लाउंज अक्सेस
या भागिदारीविषयी आयओएच्या अध्यक्ष डॉ. पी. टी. उषा म्हणाल्या की, इंडियन ऑलिंपिक असोसिएशन आणि येस बँकेदरम्यान झालेल्या या भागिदारीविषयी मी आनंदी आहे. या भागिदारीअंतर्गत येस बँक पॅरिस २०२४ ऑलिंपिक खेळांची खास बँकिंग भागीदार असेल. या दमदार भागिदारीमुळे आमच्या खेळाडूंना अधिक आर्थिक पाठिंबा व सेवा मिळेल. येस ग्लोरी डेबिट कार्ड खेळाडूंना नाविन्यपूर्ण सुविधा पुरवण्याची व त्यांना कोणत्याही आर्थिक काळजीशिवाय ऑलिंपिकवर लक्ष केंद्रित करण्याची मुभा देण्याची आमची बांधिलकी दर्शवणारे आहे.
येस बँक आणि इंडियन ऑलिंपिक असोसिएशन यांच्यातील भागिदारीसाठी आयओएस स्पोर्ट्स आणि एंटरटेनमेंटने सहकार्य केले आहे. आयओएस स्पोर्ट्स आणि एंटरटेनमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक नीरव तोमर या भागिदारीविषयी म्हणाले की, आगामी पॅरिस ऑलिंपिकसाठी येस बँकेचे भारतीय टीमचे प्रायोजक म्हणून स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. बऱ्याच काळापासून येस बँक खेळाच्या प्रसारासाठी काम करत असून ऑलिंपिक खेळांसाठी भारतीय टीमसह करण्यात आलेली ही भागिदारी देशात खेळाचा विकास करण्याप्रती त्यांची बांधिलकी दाखवणारी आहे. त्याचप्रमाणे ही भागिदारी यंदाच्या पॅरिस ऑलिंपिकमध्ये भारतीय टीमला यश मिळवून देण्यासाठी सक्षम करण्याच्या आमच्या सामाईक ध्येयाचे प्रतीक आहे.