भविष्यात तंत्रज्ञान विकसित करण्या करिता कुत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डिजिटल कौशल्याद्वारे युवा सशक्तीकरण करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय युवा पुरस्करार्थी मोहम्मद आरिफ खान यांनी नुकतेच केले.

युज नॅशनल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, मार्क मार्शल आर्ट्स, भारत सरकार युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय मेरा युवा भारत (Myभारत) नाशिक यांच्या संयुक्त विद्दमानाने नाशिकच्या युज नॅशनल ज्युनिअर कॉलेज येथे जागतिक युवा कौशल्य दिन नुकताच साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. १५० युवक-युवती यांनी यात सहभाग नोंदविला. प्राचार्य तौसिफ शेख, उपप्राचार्य डॉ. नुरेइलाही शाह मंचावर उपस्तित होते.

दरवर्षी १५ जुलै हा दिवस जागतिक युवा कौशल्य दिन साजरा केला जातो. याचा मुख्य उद्देश तरुणांना बदलत्या जगात यशस्वी होण्यासाठी आवश्यक कौशल्यांनी सक्षम बनवणे आणि महत्त्व अधोरेखित करणे, हा आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शोएब काजी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता जकरीय मनियार, अबीर खान, एजाज खान, नबीला खान वजाहत सय्यद व सुनील पंजे यांनी परिश्रम घेतले.