Homeहेल्थ इज वेल्थजागतिक आरोग्य संघटनेने...

जागतिक आरोग्य संघटनेने केली वैद्यकीय मॉडयूल 2च्या अंमलबजावणीला सुरुवात

केंद्रीय आयुष आणि महिला व बालविकास राज्यमंत्री डॉ. मुंजपरा महेंद्रभाई यांनी काल, इंडिया हॅबिटॅट सेंटर येथे आयसीडी-11, टीएम मॉड्यूल-2 चा शुभारंभ केला. आयुष चिकित्सा भारतातील तसेच जगभरातील जागतिक मानकांसह एकत्रित करून त्याचे आधुनिकीकरण करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आयसीडी-11 या पारंपरिक वैद्यकीय मॉडयूल 2ची सुरुवात करत, जागतिक आरोग्य संघटनेने त्याच्या अंमलबजावणीची तयारी सुरू केली आहे.

आयुर्वेद, सिद्धा आणि युनानी चिकित्सा पद्धतीच्या आधारावर, आजारांची माहिती आणि संज्ञांचा आता जागतिक आरोग्य संघटनेच्या आयसीडी-11 वर्गीकरणात समाविष्ट करण्यात आला आहे. या प्रयत्नांमुळे, आयुर्वेद, युनानी आणि सिद्धा चिकित्सा पद्धतीनुसार, आजारांची जी नामावली किंवा संज्ञा असते, तिला एक कोड देण्यात आला असून, त्यांचा समावेश, आरोग्य संघटनेच्या आजार वर्गीकरण मालिकेत करण्यात आला आहे.

आयुष मंत्रालयाने, जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्याने, आयुर्वेद, सिद्धा आणि युनानी चिकित्सा पद्धतीत, वापरल्या जाणाऱ्या नामावलीनुसार, आयसीडी 11 मालिकेच्या टी एम मॉडयूल अंतर्गत, वर्गीकरण केले आहे.

या वर्गीकरणासाठी यापूर्वी जागतिक आरोग्य संघटना आणि आयुष मंत्रालय यांच्यात देणगीदार करारावरही स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या. या प्रयत्नामुळे भारताची आरोग्य सेवा वितरण प्रणाली, संशोधन, आयुष विमा संरक्षण, संशोधन आणि विकास, धोरण निर्मिती प्रणाली अधिक बळकट आणि विस्तारित होईल. याशिवाय, या संहितांचा उपयोग समाजातील विविध रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी भविष्यातील धोरणे तयार करण्यासाठीदेखील केला जाऊ शकतो.

आयसीडी-11मध्ये पारंपरिक वैद्यकीय संज्ञांचा समावेश हा पारंपरिक औषध आणि जागतिक मानकांमधील दुवा आहे, असे जागतिक विकास संघटनेचे,  भारतातील प्रतिनिधी डॉ. राडारिको एच. ऑफ्रिन यावेळी म्हणाले. ब्राझील, बांगलादेश, मलेशिया, मॉरिशस, श्रीलंका, नेपाळ, इराण आणि ब्रिटनसह डब्ल्यूएचओच्या सदस्य देशांच्या प्रतिनिधींनी यावेळी, आपापल्या देशांमधील पारंपरिक औषधाच्या सद्यस्थितीबाबत आपले अनुभव मांडले.

Continue reading

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली!...
Skip to content