Homeचिट चॅटजगप्रसिद्ध चित्रपट निर्माते...

जगप्रसिद्ध चित्रपट निर्माते बेला टार एफटीआयआयच्या दौऱ्यावर

स्वतःच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीच्या चित्रपटात संपूर्णपणे मग्न असलेले आणि जागतिक चित्रपट विश्वातील सर्वात आदरणीय व्यक्तिमत्वांपैकी एक असलेले हंगेरियन चित्रपट निर्माते-दिग्दर्शक बेला टार पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडिया (एफटीआयआय)ला भेट देण्यासाठी सध्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर आहेत.

या संस्थेमध्ये ते दिग्दर्शन आणि पटकथालेखन विभागाच्या पदविका अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिग्दर्शनाचा पाच दिवसांचा मास्टरक्लास घेणार आहेत. वर्कमैस्टर हार्मनीज (2000), द तुरीन हॉर्स (2011) आणि अतिशय संस्मरणीय, काळजाला भिडणारा कृष्णधवल सटान्टॅन्गो (1994) हे त्यांच्या प्रसिद्ध चित्रपटांपैकी काही चित्रपट असून त्यांनी स्वतःच्या शैलीमुळे अनेकांना प्रेरणा दिली आहे.

बेला टार आज, रविवारी 18 डिसेंबर 2022 रोजी एफटीआयआयच्या संकुलात विद्यार्थ्यांसाठीदेखील एक सत्र घेणार असून यामध्ये ते चित्रपट क्षेत्रात त्यांनी केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण प्रयोगांविषयीचे आपले अनुभव सांगणार आहेत. त्यामुळे जास्तीतजास्त विद्यार्थ्यांच्या चित्रपटविषयक आकांक्षांची जोपासना होण्यास मदत होईल. कोलकात्याच्या सत्यजीत रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युटचे विद्यार्थी या खुल्या सत्रामध्ये दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी होतील.

केरळमध्ये झालेल्या प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जीवनगौरव पुरस्कार (2022) स्वीकारण्यासाठी बेला टार भारतात आले होते.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content