Homeटॉप स्टोरीराज ठाकरे महायुतीच्या...

राज ठाकरे महायुतीच्या व्यासपीठावर दिसणार?

नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर झालेली प्रत्यक्ष चर्चा तसेच मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे आज भाजपाप्रणित महायुतीत सहभागी व्हायचे की नाही, याचा निर्णय घेणार आहे. आज सकाळी ठाकरे यांनी त्यांच्या शीवतीर्थ, या निवासस्थानी मनसेच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. यात यावर निर्णय होईल. या बैठकीत जर महायुतीत समाविष्ट होण्याचा निर्णय झाला तर उद्या महायुतीच्या नेत्यांच्या होणाऱ्या पत्रकार परिषदेत राज ठाकरेही व्यासपीठावर दिसण्याची शक्यता आहे.

काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत २८ मार्चला मुंबईत महायुतीची एकत्रित पत्रकार परिषद घेऊन त्यावेळी कुणाला किती जागा मिळणार हे जाहीर केले जाईल, असे स्पष्ट केले होते. जागावाटपाचे आतापर्यंत ९९ टक्के काम पूर्ण झाले असून आमच्या कार्यकर्त्यांचे समाधान होईल अशा जागा आम्हाला मिळणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. रायगड लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उमेदवारीची घोषणाही यावेळी करण्यात आली.

महायुतीच्या ४८ जागा असून त्यामध्ये जवळपास कुणी कोणत्या जागा लढवायच्या याबाबत मागेच ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. आता ९९ टक्के काम झाले आहे. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील उमेदवार जाहीर करणे क्रमप्राप्त होते. पहिल्या टप्प्यात विदर्भात निवडणूक होणार आहे. आंबेगाव येथे शिवाजीराव

महायुती

आढळराव पाटील २० वर्षांपूर्वी पक्षातून गेले होते. ते पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काल सहभागी झाले. त्यानंतर लगेचच त्यांना शिरूर मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आली. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांबरोबर त्यांची प्रमुख लढत होईल.

पाच वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुका झाल्या त्यावेळी आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने लढलो होतो. त्यामध्ये भाजपाच्या २३ जागा निवडून आल्या. शिवसेनेच्या १८ जागा निवडून आल्या आणि ४ राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या. एक जागा नवनीत राणांची होती. त्यांना राष्ट्रवादीने पुरस्कृत केले होते. त्यामुळे आम्हाला फार कमी जागा मिळणार, राष्ट्रवादी फक्त तीन जागा लढवणार, अशा चर्चा करत माध्यमांमधून गैरसमज पसरवण्याचे काम करण्यात आले, असेही पवार म्हणाले.

जाहीरनाम्यावर काम सुरू आहे. तो लवकरच दिला जाईल. स्थानिक प्रश्न आहेत तेही जाहीरनाम्यात यावेत अशी भूमिका आहे. स्टार प्रचारक यादीवर एकत्र बसून चर्चा झाली आहे. त्यामुळे ती यादीही लवकरच जाहीर करण्यात येईल. राज्यातील लोकसभा प्रचारक म्हणून राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे यांचे नाव अगोदरच जाहीर करण्यात आले आहे. अशा पद्धतीने आम्ही लोकांसमोर जाणार असून लोकांचा विश्वास आम्ही जिंकू आणि नरेंद्र मोदी यांना तिसर्‍यांदा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्राचे बळ त्यांच्या पाठीशी उभे करू, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

Continue reading

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...

आखाती देशांमध्ये उद्या साजरी होणार ईद!

संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि बहरीनसह अनेक आखाती देशांनी ईद-उल-फित्रच्या अधिकृत प्रारंभ तारखेची आज घोषणा केली. 30 दिवसांचा रमजान महिना पूर्ण झाल्याचे दर्शवणारा शव्वाल महिन्याचा चंद्र न दिसल्यामुळे, उद्या 20 मार्च, शुक्रवार रोजी ईद-उल-फित्र साजरी...

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...
Skip to content