Homeडेली पल्सभारतीय उद्योजक त्रिनिदादमध्ये...

भारतीय उद्योजक त्रिनिदादमध्ये उभारणार क्रिकेट अकादमी?

त्रिनिदाद टोबॅगोने भारतीय स्वातंत्र्यलढ्यातून प्रेरणा घेतली आहे. आता भारतीय उद्योजकांनी त्रिनिदाद टोबॅगोच्या विकासात सहभागी व्हावे. आज मुंबईत दहा प्रसिद्ध उद्योगपतींशी चर्चा झाली. त्रिनिदाद येथे क्रिकेट अकादमी स्थापन करण्याच्या दृष्टीने या भेटीत उद्योजकांशी चर्चा झाली. हे भारतीय उद्योजक त्रिनिदाद टोबॅगो येथे गुंतवणूक करण्याबाबत सकारात्मक असल्याचे त्रिनिदाद टोबॅगोचे पंतप्रधान डॉ. किथ राऊली यांनी सांगितले.

भारतभेटीवर आलेले त्रिनिदाद आणि टोबॅगोचे पंतप्रधान डॉ. किथ राऊली व त्यांच्या पत्नी शेरॉन राऊली यांनी काल राज्यपाल रमेश बैस यांची मुंबईत राजभवन येथे औपचारिक भेट घेतली. त्यानंतर ते बोलत होते. राज्यपालांच्या पत्नी रामबाई बैस यादेखील यावेळी उपस्थित होत्या. डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रात भारताकडून सहकार्य होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

त्रिनिदाद टोबॅगोच्या पंतप्रधानांचे स्वागत करताना राज्यपाल बैस म्हणाले की, त्रिनिदाद ही महान फलंदाज ब्रायन लाराची भूमी आहे. तसेच ड्वेन ब्रावो, सुनील नरेन व किरोन पोलार्ड हे त्रिनिदादचे क्रिकेटपटू भारतात लोकप्रिय आहेत. भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था असून तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने देश वाटचाल करीत आहे. त्रिनिदाद टोबॅगो देशाने भारताशी कृषी, आरोग्यसेवा, औषधीनिर्माण, ऊर्जा आणि माहिती तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रांमध्ये भागीदारीला चालना द्यावी.

त्रिनिदाद आणि टोबॅगोमधील विद्यापीठांनी महाराष्ट्र राज्यातील विद्यापीठांशी सहकार्य प्रस्थापित करावे अशीही अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली. यावेळी त्रिनिदाद टोबॅगो शिष्टमंडळाच्या सन्मानार्थ राज्यपालांनी प्रीतीभोजनाचे आयोजन केले. त्रिनिदाद आणि टोबॅगो प्रजासत्ताकाचे कार्य आणि वाहतूक मंत्री रोहन सिनॅनन व पामेला सिनॅनन, क्रीडा आणि समुदाय विकास मंत्री शम्फा कुडो – लुईस, त्रिनिदादचे भारतातील राजदूत डॉ. रॉजर गोपॉल, प्रशासकीय सहयोगी, उच्चायुक्त कार्यालय शर्लिन रामसुंदर, आंतरराष्ट्रीय संबंध आणि राजशिष्टाचार अधिकारी किर्क फ्रँकोइस, माध्यम उपसचिव ॲबी ब्रेथवेट आदी सदस्य यावेळी उपस्थित होते. शासनाच्या वतीने मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, एअर वाईस मार्शल रजत मोहन, मे. जन. विक्रमदीप सिंह, रिअर ऍडमिरल मनीष चड्ढा, अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा आदी उपस्थित होते.

Continue reading

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...

आखाती देशांमध्ये उद्या साजरी होणार ईद!

संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि बहरीनसह अनेक आखाती देशांनी ईद-उल-फित्रच्या अधिकृत प्रारंभ तारखेची आज घोषणा केली. 30 दिवसांचा रमजान महिना पूर्ण झाल्याचे दर्शवणारा शव्वाल महिन्याचा चंद्र न दिसल्यामुळे, उद्या 20 मार्च, शुक्रवार रोजी ईद-उल-फित्र साजरी...

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...
Skip to content