Homeडेली पल्सकल्याणमध्ये सीए इन्स्टिट्यूटला...

कल्याणमध्ये सीए इन्स्टिट्यूटला सर्व ती मदत

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) संस्थेला सीए इन्स्टिट्यूटसाठी कल्याणमध्ये सरकारकडून जागा उपलब्ध झाली असून या १७ गुंठे जागेत सुसज्ज असं सीए इन्स्टिट्यूट उभं राहणार असून त्यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आश्वासन शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिले.

डॉ. शिंदे यांनी संस्थेच्या वतीने कल्याण येथे आयोजित कार्यक्रमात काल भाग घेतला. तेव्हा ते बोलत होते. याप्रसंगी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रवींद्र चव्हाण, उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी, माजी आमदार नरेंद्र पवार, भाजपचे माजी नगरसेवक मंदार हळबे, राहुल दामले, शिवसेनेचे कल्याण पश्चिम शहरप्रमुख रवी पाटील यांच्यासह संजय पाटील, सीए मयूर जैन, राकेश अगरवाल, अमित मोहरे, विकास कर्मा, गिरीश थारवानी आणि कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर शहरातील चार्टर्ड अकाउंटंट्स उपस्थित होते.

या इन्स्टिट्यूटमधून भविष्यात अनेक सीए घडतील. त्यातून देशाची अर्थव्यवस्था मजबूत होण्यास आणखी हातभार लागेल. इतकंच नव्हे, तर हे इन्स्टिट्यूट येथील सर्वात मोठं इन्स्टिट्यूट म्हणून ओळखलं जाईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. चार्टर्ड अकाउंटंट देशाची अर्थव्यवस्था सुदृढ ठेवण्याचं काम करतात. त्यामुळे आज देश जगातली पाचवी मोठी अर्थव्यवस्था होत असताना यात चार्टर्ड अकाउंटंट्सचंही योगदान मोठं आहे, असं मतही डॉ. शिंदे यांनी व्यक्त केले.

Continue reading

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...

आखाती देशांमध्ये उद्या साजरी होणार ईद!

संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि बहरीनसह अनेक आखाती देशांनी ईद-उल-फित्रच्या अधिकृत प्रारंभ तारखेची आज घोषणा केली. 30 दिवसांचा रमजान महिना पूर्ण झाल्याचे दर्शवणारा शव्वाल महिन्याचा चंद्र न दिसल्यामुळे, उद्या 20 मार्च, शुक्रवार रोजी ईद-उल-फित्र साजरी...

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...
Skip to content