Monday, February 3, 2025
Homeकल्चर +जेव्हा पपेट्सने गाजवला...

जेव्हा पपेट्सने गाजवला कोल्ड प्लेसोबत रंगमंच!

एक स्वप्न सत्यात उतरलं, जेव्हा शब्दभ्रमकार व बाहुलीकार सत्यजित रामदास पाध्ये आणि त्यांच्या प्रतिभावान पपेटियर टीमने- कौस्तुभ, सुषांत आणि कैलाश यांनी प्रसिद्ध कोल्ड प्ले बँडसोबत भारत दौऱ्यात मंचावर धमाकेदार परफॉर्मन्स केला! कोल्ड प्लेच्या टीमने खास सत्यजित आणि त्यांच्या टीमला ह्या शोसाठी निवडले. क्रिस मार्टिन आणि त्यांच्या बँडसोबत “गुड फिलिंग्स” या गाण्यावर सत्यजित आणि त्याच्या टीमने अप्रतिम परफॉर्मन्स सादर केला. संगीत आणि पपेट्रीचा अद्भुत संगम अनुभवायला मिळाला.

प्रसिद्ध जिम हेनसन कंपनीतील अमेरिकन पपेटियर निकॉलेट आणि ड्रू यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रशिक्षणामुळे, सत्यजित आणि त्यांच्या टीमने ५ ऐतिहासिक शोमध्ये आपल्या कलागुणांनी जादू निर्माण केली आणि त्यात हा क्षणही अविस्मरणीय ठरला.

शब्दभ्रमकार व बाहुलीकार सत्यजित म्हणाला की, या अविस्मरणीय प्रवासाचा भाग बनवल्याबद्दल कोल्ड प्लेला मनःपूर्वक धन्यवाद आणि आमच्यावर प्रेम आणि पाठिंबा दर्शवणाऱ्या प्रत्येक चाहत्याचे मनःपूर्वक आभार. तुमच्याशिवाय हे शक्यच नव्हतं. आम्हाला जगातील सर्वात मोठ्या कोल्ड प्ले कॉन्सर्टचा भाग बनविल्याबद्दल धन्यवाद..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

जाणून घ्या वसंत पंचमीचा इतिहास, महत्त्व आणि मान्यता!

आज वसंत पंचमी! माघ महिन्यातील पंचमीला देवी सरस्वती पृथ्वीतलावर अवतरली. त्यामुळे विद्येची देवता सरस्वतीची पूजा या दिवशी केली जाते. तसेच हा दिवस देवी सरस्वती आणि लक्ष्मी यांचा जन्मदिवसही मानला जातो. सर्व ऋतूंचा राजा असणार्‍या वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल वसंत पंचमीच्या...

राज ठाकरे करणार पुराणिक स्मृती महिला क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन!

मुंबईतल्या माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लब व शिवाजी पार्क जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने क्रिकेटपटू प्रकाश पुराणिक स्मृती चषक महिला टी-२० क्रिकेट स्पर्धा ४ ते ७ फेब्रुवारीदरम्यान शिवाजी पार्क मैदानात आयोजित करण्यात आली आहे. सलग तिसऱ्या वर्षी ही स्पर्धा माहीम ज्युवेनाईल...

अत्यंत कमी उंचीवरच्या गतीमान लक्ष्याला उडवणाऱ्या चाचण्या यशस्वी

डीआरडीओ म्हणजे संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने काल ओदिशाच्या किनाऱ्यावरील चांदीपूर येथून अत्यंत कमी पल्ल्याच्या हवाई संरक्षण प्रणालीच्या सलग तीन उड्डाणचाचण्या यशस्वीरित्या पार पाडल्या. खूप  कमी उंचीवर उडणाऱ्या, अतिशय गतिमान लक्ष्यांवर या चाचण्या करण्यात आल्या. तिन्ही उड्डाणचाचण्यांदरम्यान, संरक्षक क्षेपणास्त्रांनी वेगवेगळ्या उड्डाण परिस्थितीत...
Skip to content