Homeन्यूज अँड व्ह्यूजव्हॉट्सअ‍ॅप हॅकिंग आणि...

व्हॉट्सअ‍ॅप हॅकिंग आणि आर्थिक फसवणूक!

सायबर गुन्हेगार व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) अकाउंट हॅक करून पीडिताच्या नावाने फसवणूक करत आहेत. ते Google व्हेरिफिकेशन कोड किंवा OTP मागतात- तांत्रिक अडचण सोडवणे, ग्रुपमध्ये सामील होणे किंवा ओळख पटवणे अशी कारणे याकरीता देतात. कोड मिळाल्यावर ते पीडिताचा नंबर वापरून WhatsApp स्वतःच्या मोबाईलवर इंस्टॉल करतात आणि चॅट्स व संपर्कयादीवर ताबा मिळवतात.

अकाउंट ताब्यात घेतल्यावर हे गुन्हेगार पीडिताच्या मित्र, नातेवाईक आणि सहकाऱ्यांना मेसेज पाठवतात. अनेकवेळा व्यवसायातील कर्मचारी मालक किंवा वरिष्ठ अधिकारी असल्याचा भासवणारा मेसेज मिळवतात आणि तातडीने पैसे किंवा गोपनीय माहिती मागतात. त्यामुळे आर्थिक नुकसान आणि प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण होतो.

जर तुमचं WhatsApp हॅक झालं असेल तर..

– त्वरित WhatsApp अनइंस्टॉल करा.

– पुन्हा इंस्टॉल करा आणि Google कोड किंवा OTP मिळवून अकाऊंट अ‍ॅक्टिवेट करा.

– काही वेळा WhatsApp कोड पाठवण्यासाठी काही तास घेऊ शकतो.

WhatsApp पुन्हा एकदा इंस्टॉल झाल्यावर गुन्हेगारांचा प्रवेश आपोआप बंद होतो.

हे गुन्हेगार अनेकदा ज्येष्ठ नागरिक किंवा डिजिटल माहिती नसलेल्या व्यक्तींना लक्ष्य करतात. त्यामुळे सर्व वयोगटातील लोकांना जागरूक राहणे वा करणे आवश्यक आहे.

व्हॉट्सअ‍ॅप

तुम्ही किंवा ओळखीच्या व्यक्ती फसवणुकीचा बळी ठरल्यास:

– राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन 1930 वर कॉल करा.

– किंवा www.cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा.

घ्यावयाची काळजी:

– OTP किंवा Google कोड कुणालाही देऊ नका- even ओळखीच्या व्यक्तींनाही.

– WhatsApp मध्ये two-step verification सुरू करा.

– कोड किंवा तातडीने पैसे मागणारे कॉल/मेसेज आल्यास प्रतिसाद देऊ नका.

– अकाउंट हॅक झाल्यास त्वरित संपर्कातील लोकांना सावध करा.

– ज्येष्ठ नागरिक आणि डिजिटल माहिती नसलेल्या व्यक्तींना याबाबत जागरूक करा.

– कार्यालयीन व्यवहारांसाठी स्पष्ट नियम आणि प्रक्रिया ठरवा.

– पैसे किंवा गोपनीय माहिती मागणाऱ्या विनंत्या याची दुसऱ्या माध्यमातून पडताळणी करा.

– फसवणूक झाल्यास त्वरित 1930 वर कॉल करा किंवा www.cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा.

(लेखक पोलीस उपमहानिरीक्षक, मुंबईत महाराष्ट्र सायबर विभागात कार्यरत आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

दीपावलीत सतर्क राहा ऑनलाईन फसवणुकीपासून!

दीपावलीनिमित्त देशभरात जल्लोश सुरू होत आहे. सणासुदीचा काळ म्हटले की, प्रत्यक्ष खरेदीबरोबरच ऑनलाईन खरेदी, दूरचा प्रवास, त्यासाठी होणारे ऑनलाईन आरक्षण, गुंतवणुकीसाठी ऑनलाईन ऑफर, शुभेच्छांसाठी होणारा सोशल मीडियाचा वापर आदींची रेलचेल असते. सायबर क्राईम करणारे ऑनलाईन गुन्हेगारांकरीता हा काळ पर्वणीच...
Skip to content