Homeन्यूज अँड व्ह्यूजउद्धव ठाकरेंचे गुप्ता...

उद्धव ठाकरेंचे गुप्ता बंधूंशी संबंध तरी कोणते?

देहरादूनमधील एका बिल्डरच्या हत्त्येतील आरोपी आणि आफ्रिकेतील घोटाळेबाज व्यापारी अजय गुप्ता तसेच त्यांच्या बंधूंशी उद्धव ठाकरे यांचे कोणते व्यावसायिक संबंध आहेत? असा सवाल शिवसेनेचे उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी आज मुंबईत एका पत्रकार परिषदेत केला.

७ ऑगस्ट २०२४ रोजी संध्याकाळी संजय राऊत यांच्या दिल्लीतील शासकीय निवासस्थानी उद्धव ठाकरेंनी गुप्ता बंधूंपैकी एकाची भेट घेतली. याबाबत संजय राऊत यांच्या घरातील सीसीटीव्ही तपासणे आवश्यक आहे. उबाठा जेव्हा दिल्लीत जातात तेव्हा हॉटेल ताज किंवा मौर्य हॉटेलमध्ये वास्तव्य करतात. पण यावेळी ते संजय राऊत यांच्या शासकीय निवासस्थानी थांबले होते. दिल्ली दौऱ्यात उद्धव ठाकरे अजय गुप्ताला भेटले होते का? अजय गुप्ता बिझनेसमन आणि कुख्यात गुंड आहे. बाबा सहानी यांच्या आत्महत्त्येतील आरोपीशी उद्धव ठाकरे यांचा व्यावसायिक संबंध असल्याची शक्यता निरुपम यांनी व्यक्त केली. उद्धव ठाकरेंच्या पक्षाला नुकतीच निवडणूक आयोगाने देणगी स्वीकारण्यास परवानगी दिली आहे. मग गुप्तासोबतची ही भेट निवडणूक निधीसाठी होती का, असा प्रश्नही निरुपम यांनी केला.

उद्धव

राजेश गुप्ता, अतुल गुप्ता आणि अजय गुप्ता हे उत्तराखंडमधील सहारनपूर येथील रहिवासी आहेत. ते १९९२मध्ये दक्षिण आफ्रिकेत व्यापारानिमित्त गेले आणि तिथेच एक भ्रष्ट आणि कुविख्यात व्यापारी बनले. आफ्रिकेचे तत्कालीन राष्ट्रपती जेकब झुमादेखील गुप्ता यांचे बिझनेस पार्टनर होते. २०१८मध्ये गुप्ता बंधूंचे घोटाळे उघड झाले. दक्षिण आफ्रिका सरकारमधील विविध खात्यांमधून प्रचंड फायदा उचलला. यानंतर जेकब झुमा यांची सरकारमधून हकालपट्टी झाली. या घोटाळ्यांनंतर फरार झालेल्या तिन्ही गुप्ता बंधूंविरोधात नवीन सरकारने इंटरपोलची रेडकॉर्नर नोटीस जारी केली होती. या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार अजय गुप्ता यांनी नव्या सरकारशी चर्चा करुन या घोटाळ्यातून आपले नाव कमी करुन घेतले. राजेश गुप्ता आणि अतुल गुप्ता दोघेही फरार असून अजय गुप्ता मात्र मुंबईत वास्तव्य करत आहेत, असे निरुपम म्हणाले.

अजय गुप्ता आणि अतुल गुप्ता हे देहरादून येथील सचिंदरसिंग सहानी (बाबा सहानी) यांच्या हत्त्येप्रकरणी आरोपी असून ते सध्या जामिनावर आहेत. सहानी हे १५०० कोटींचे डेहराडूनमध्ये मोठे कॉम्प्लेक्स तयार करत होते. मात्र त्यांना पैशांची चणचण होती. २४ मे रोजी बाबा सहानी यांनी इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्त्या केली. यावेळी त्यांच्याजवळ सापडलेल्या चिठ्ठीत गुप्ता बंधूंची नावे होती. तत्पूर्वी बाबा सहानी यांनी १६ मे रोजी देहरादून पोलिसांना पत्र लिहून गुप्ता बंधूंपासून धोका असल्याची तक्रार केली होती, असे निरुपम यांनी सांगितले.

उद्धव

उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुंटुंबियांची परदेशात मोठी गुंतवणूक आहे असे कळते. लंडनला घर, इतर मोठी हॉटेल्स आहेत. आफ्रिकेतदेखील उद्धव ठाकरे यांची गुंतवणूक आहे का? या गुंतवणुकीत गुप्ता बंधूंची भागिदारी आहे का? याचे उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यायला हवे, असेही ते म्हणाले. संजय राऊत बिल्डरांशी दलाली करण्यात कुख्यात आहेत. पत्रा चाळ घोटाळ्यात त्यांनी बिल्डरांकडून मोठी दलाली मिळवली. यासाठी राऊत यांना तुरुंगात जावे लागले होते. त्यामुळे बाबा सहानीसोबत किंवा गुप्ता बंधूंबरोबर राऊत यांचे काही संबंध आहेत का? याचीही चौकशी होणे आवश्यक, असे निरुपम म्हणाले.

Continue reading

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...
Skip to content