Thursday, March 13, 2025
Homeहेल्थ इज वेल्थडेंग्यूला रोखण्यासाठी घाला...

डेंग्यूला रोखण्यासाठी घाला शरीर पूर्णपणे झाकणारी वस्त्रे

डेंग्यू पसरवणाऱ्या सामान्यपणे  दिवसा चावणाऱ्या एडीस डासांबाबत समाजाला जागरूक करण्यासाठी, शाळेत जाणाऱ्या मुले आणि इतरांसाठी शरीर पूर्णपणे झाकून ठेवणारे कपडे घालण्याबाबत जनजागृती मोहीम राबवली जाईल तसेच पाणी साठवण्याची विविध भांडी आणि इतर भांड्यांमध्ये साठून राहणाऱ्या अस्वच्छ पाण्यापासून मुक्त ठेवण्याचे काम मोठ्या प्रमाणावर केले जाईल. देशभरात दूरचित्रवाणी, रेडिओ, समाजमाध्यम यासारख्या विविध व्यासपीठांवरुन जनजागृती केली जाईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी काल दिली.

पावसाळ्याची सुरुवात आणि जागतिक पातळीवर डेंग्यूच्या रुग्णांमध्ये होत असलेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर देशातील डेंग्यूविषयक स्थितीचा आणि या रोगाचा प्रतिबंध, नियंत्रण आणि व्यवस्थापन यासंदर्भात असलेल्या सरकारी आरोग्य व्यवस्थेच्या सज्जतेचा आढावा घेण्यासाठी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

डेंग्यू प्रतिबंध आणि जनजागृतीसाठी 24/7 कार्यरत असणारा तसेच आपत्कालीन परिस्थितीत लक्षणे, उपचार शिष्टाचार आणि मदत याविषयीच्या प्रश्नांना उत्तरे देणारा केंद्रीय हेल्पलाइन क्रमांक तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.  राज्यांनाही असेच हेल्पलाइन क्रमांक कार्यान्वित करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

केंद्रित, समयोचित आणि सहयोगी उपक्रमांचा परिणाम म्हणून वर्ष 1996मध्ये 3.3% असलेल्या डेंग्यूचे रुग्ण दगावण्याचा दर आता 2024मध्ये 0.1% इतका कमी झाला आहे. तरी नुकताच सुरु झालेला पाऊस आणि पावसाळ्यामध्ये डेंग्यूचे रुग्ण वाढण्याचा धोका यामुळे निर्माण केलेली आव्हानात्मक परिस्थिती लक्षात घेता या आजाराविरुद्ध सज्ज राहण्याचे निर्देश त्यांनी दिले.

केंद्र सरकारने 2024 मध्ये डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी सज्जतेबाबत राज्यांना संवेदनशील करण्यासाठी 14 मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

Continue reading

‘शातिर..’मधून अभिनेत्री रेश्मा वायकर करणार पदार्पण

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या महिलाप्रधान चित्रपटाला चांगले दिवस आल्याचे दिसते. मात्र मराठीत महिलाप्रधान सस्पेन्स थ्रिलर प्रकारातील चित्रपटांचा अभाव आहे. आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून श्रीयांस आर्ट्स अँड मोशन पिक्चर्सच्या वतीने ‘शातिर THE BEGINNING’ या सस्पेन्स थ्रीलर चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या...

कुर्ल्यातल्या कबड्डी स्पर्धेत अंबिका, पंढरीनाथ संघांची बाजी

शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून मुंबईतल्या कुर्ला (पश्चिम) येथील गांधी मैदानात जय शंकर चौक क्रीडा मंडळ आणि गौरीशंकर क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित पुरुष गटाच्या कबड्डी स्पर्धेत प्रथम श्रेणी गटात अंबिका सेवा मंडळ, कुर्ला...

‘स्वामी समर्थ श्री’साठी राज्यातील दिग्गज उद्या आमनेसामने

क्रीडा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या "स्वामी समर्थ श्री" राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेच्या माध्यमातून मुंबईकर शरीरसौष्ठवप्रेमींना जानदार, शानदार आणि पीळदार शरीरसौष्ठवपटूंचे ग्लॅमर पाहायला मिळणार आहे. आमदार महेश सावंत यांच्या आयोजनाखाली मुंबईच्या प्रभादेवीत दै. सामना मार्गाशेजारील...
Skip to content