Homeन्यूज अँड व्ह्यूजआम्ही हरीनाम जपूच..,...

आम्ही हरीनाम जपूच.., पण ठाण्याचे वाटोळे होईल त्याचे काय?

खरंतर या नवरात्रौस्तवाच्या दिवसांत सरकार वा कोणाच्याच विरोधात काही लिहायचे नाही असे ठरवले होते. सणाचे दिवस आहेत. उगाच जिभेला कडवटपणा जाणवू द्यायचा नाही, असे मनोमन ठरवले होते. शिवाय विरोध म्हणजे वैयक्तिक आकस नव्हे की इर्शाही नाही. जनतेच्या प्रश्नांसाठी सर्व काही… असो. कालच्या जवळजवळ सर्वच वर्तमानपत्रांनी ठळक मथळ्यात ‘ठाण्यातील वाहतूककोंडीवरून लोकप्रतिनिधींत खडाजंगी’ अशा स्वरूपाची बातमी छापली. ही बैठक होती जिल्हा नियोजन मंडळाची.. आणि स्थळ होते जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर! ठिकाणही योग्यच होते. सध्या हा परिसर म्हणजे जणू गर्दीचा मापदंडच!! एरवीही हा परिसर गर्दीचाच असतो. जिल्हा न्यायालय, शासकीय विश्रामधाम (नावातच विश्राम आहे.) ना कर्मचाऱ्यांना विश्राम, ना खोल्यांना.., ना परिसराला, ना पोलिसांना! याविषयी पुन्हा कधीतरी सविस्तर लिहीनच. याला लागूनच ठाणे पोलिसांची गुन्हे शाखा आणि खुद्द पोलीस आयुक्तालय! जिल्हाधिकारी कार्यालयाला लागूनच असलेला बाबा आदमच्या काळातील जुनाट बोळवजा रस्ता. त्याला सरकारी भाषेत मार्ग असे नाव आहे. या रस्त्याच्या कडेलाच हारीने उभे राहिलेल्या संगणकाच्या असंख्य टपऱ्या!! खरंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला तरी शहर नियोजनाची कठोर अंमलबजावणी हवी ना? तीही नाही. या बोळवजा तथाकथित मार्गावर पदपथ नाही. जसजसे पुढे जाल तसतसे अंधूकसे पदपथ दिसू लागतात. तर, मुद्दा होता ठाण्याच्या लोकप्रिय प्रतिनिधींना ठाणेकरांच्या समस्यांची आठवण झाली आणि त्यातही वाहतूककोंडीची याचा… जय हो लोक प्रतिनिधींची!!

ठाणेकरांना दररोज सकाळी उठल्यापासून सतावणाऱ्या समस्येची प्रतिनिधींनी दखल घेतली ही आनंदाचीच गोष्ट आहे. पण या गोष्टीची दखल घ्यायला तब्बल दहा वर्षे लागावीत याबाबत मात्र ठाणेकर खंत व्यक्त करत आहेत. (काहींच्या मते वाहतूककोंडीचा त्रास १५ वर्षांपासूनचा आहे.) ठाणे तसेच राज्यातल्या विविध समस्यांबाबत आम्ही नेहमीच लिहीत असतो. काहींना हे लिखाण सरकारविरोधी वा शिवसेनेविरूद्ध, शिंदेंविरूद्धचे वाटते. परंतु आम्हाला बोल लावण्याऐवजी ती समस्या खरी आहे की नाही याची कुणीच शहानिशा करत नाही वा आपली बाजूही कुणी मांडत नाही. दोनतीन माणसांचा गट असा आहे की, तो सतत आम्हाला आमच्या वयाची आठवण करून हरीनाम आठवत घरी बसा, असे सुचवत असतो. परंतु आमच्या म्हणण्यात तथ्य असल्याचेच जिल्हा नियोजन बैठकीत उघड झाले.

ठाण्या

आपल्या राज्यातील सर्वच लहान मोठ्या शहरांना वाहतूककोंडीचा प्रचंड मनस्ताप दररोज सहन करावा लागतो. याचे प्रमुख कारण म्हणजे आपल्याकडील यंत्रणांचा शहर नियोजनाचा अभ्यास कच्चा आहे व त्यात भर म्हणून राजकीय नेत्यांचे ‘अर्धकच्चे’ ज्ञान! “A key theme is the need to balance the growth with human needs ensuing cities are designed” हे तत्त्वच आपण गुंडाळून ठेवले असल्याचे जागोजागी दिसून येत आहे. ठाणे शहराचा विचार करायचा झाल्यास शहराचा विकास ज्याप्रमाणात झाला त्याप्रमाणात नागरी सोयीसुविधा मुळीच निर्माण झाल्या नाहीत. याला ठाणे महापालिका व नव्याने निर्माण झालेले विकास प्राधिकरण हेच जबाबदार आहेत असे मानायला बरीच जागा आहे. विकास नियमावलीत राजकीय नेत्यांनी नको इतकी लुडबूड केल्यानेच वाहतूककोंडी वाढीस लागली आहे. लोकसंख्या व वाहतुकीच्या साधनाची ज्या झापाट्याने वाढ झालेली दिसते त्याप्रमाणात इतर नागरी सुविधांमध्ये जरासुद्धा वाढ न झाल्यानेच ठाणेकरांना रोज नोकरीवर जाताना व रात्री घरी येताना प्रचंड वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे. “Traffick jam is collision between free enterprise and socialism. Free enterprises produces automobile faster than socialism can build roads and road’s capacity” हेही लक्षात घेणे गरजेचे आहे.

मोटारगाड्या व अवजड वाहनांची निर्मिती करणाऱ्या बहुतेक कंपन्या परदेशी आहेत वा त्यातील काही भारतीय कपंन्याबरोबर सहकारात गाड्यांची निर्मिती करत आहेत. या सर्वांवर काही प्रमाणात निर्बंध आणणे गरजेचे आहे. कारण, प्रदूषणाचे कारण देऊन परदेशात गाड्यांच्या उत्पादनावर निर्बंध आणले गेले आहेत, त्याचाही विचार करायला हवा. “India’s urbanization strategy, as reflected in numerous master plans across cities, has often been to define specific mixed use zones across a city for given population while plotting out in detail while public amenity will be available where naturally, such documents and strategies are often outdated by the time they are approved” (वरुण गांधी- मेट्रोपोलीसमधून). सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी व सनदी अधिकाऱ्यांनी या विधानाचा गांभीर्याने विचार करून आपल्या नियोजित योजनांचा विचार केला पाहिजे.

ठाण्या

जिल्हा नियोजन समितीच्या या बैठकीत राजकीय आरोपप्रत्यारोपही केले गेले. या राजकारणात आम्हाला जरासुद्धा रस नाही. आज जे विरोधात बोलले ते सत्तेत असते आणि जागांची अदलाबदल झाली असती तर टिकेचे सूर दुसऱ्या बाजूने आले असते हे लक्षात ठेवले पाहिजे. ठाणे शहर वा संपूर्ण जिल्हा हा राज्याच्या महसूलातील मोठा वाटा जमवतो म्हणूनच काही विचार मांडण्याचे धाडस करणार आहे. ठाणे शहरात नोकरदार ब उद्योग करणारी लाखो माणसे आहेत. दररोज सकाळी ही माणसे नित्यानेमाने ठाण्याहून रवाना होतात व संध्याकाळच्या सुमारास परततात. परंतु त्यांना आपापल्या घरी पोहोचण्यास मात्र रात्रीचे साडेआठ ते नऊ वाजतात. त्यातच जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे न्यायालय, पोलीस आयुक्त कार्यालय ज्या रस्त्यावर येते तो प्रमुख रस्ता सणासाठी दहा दिवस बंद ठेवणे कितपत योग्य आहे याचा राजकीय नेते व अधिकारी तसेच न्यायवृंद आणि ठाणे शहरातील समाजधुरीणांनी विचार करायची वेळ आली आहे. एका बाजूला हे महानगर आहे, असं सांगायचं आणि दुसऱ्या बाजूला रेल्वेस्थानकानजीकचा प्रमुख रस्ता दहा दिवस बंद ठेवायचा, हे योग्य आहे का स्वतःच्या मनाला विचारा!

Continue reading

बिहारमध्ये विरोधकांचे ‘जंगलराज’ तर सत्ताधाऱ्यांचे काय ‘मंगलराज’?

"Criticism may not agreeable but its necessary. It fulfils the same function as pain in the human body. It calls attention to an unhealthy state of things" असंच काहीस राजकारणात सत्तारूढ पक्ष व विरोधी पक्ष यांचे नाते असावे, असं...

ठाणे.. ती गाडी आणि त्यावरचे स्टिकर.. गौडबंगाल तर नाही ना!

नेहमीप्रमाणे ठाणे शहरातील कोर्टनाका परिसरात फेरफटका मारून ढोकाळी नाक्यानजिक असलेल्या घरी जायला बस घेतली. तुम्ही विचाराल की तुम्ही दररोज किंवा आलटूनपालटून कोर्टनाक्याला का जाता? उत्तर सोपं आहे. राजकीय नेत्यांच्या पंटर्सची या परिसरात उठबस असते. जिल्हाधिकारी कार्यालय आहे. समोरच जिल्हा...

आता कळेलच धडधाकट कोण आणि कुबड्यांची गरज कुणाला?

आजच्या दैनिक लोकसत्तेच्या अग्रलेखाचा मथळा इतका बोलका आहे की, त्यावर काही लिहिणे अन्यायकारक ठरेल! आपल्या देशात हे नेहमीच घडत आलेले आहे व पुढेही घडणार आहे. राष्ट्रीय पक्ष मग तो भारतीय जनता पक्ष (भाजप) असो वा काँग्रेस, त्यांनी नेहमीच असे...
Skip to content