Homeमुंबई स्पेशलमुंबईकरांचा सायंकाळच्या सत्रातील...

मुंबईकरांचा सायंकाळच्या सत्रातील पाणीपुरवठा सुरू!

भांडुप जलशुद्धीकरण संकुलातील नवीन आणि जुन्‍या अशा दोन्‍ही उदंचन केंद्रातील यंत्रणा टप्‍प्‍याटप्‍प्‍याने चालू होत असून मुंबईतल्या ज्‍या भागांना संध्याकाळचा पाणीपुरवठा केला जातो, त्‍या भागांना टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा चालू करण्‍यात आला असल्याचे मुंबई महापालिकेने म्हटले आहे.

भांडुप जलशुद्धीकरण संकुल परिसरात पावसाचे पाणी घुसल्याने जलशुद्धीकरण केंद्रातील गाळणी आणि उदंचन संयंत्रे तसेच विद्युत पुरवठा यंत्रणा बंद करावी लागली होती. यामुळे मुंबई महानगर क्षेत्रात (एमएमआर रिजन) बहुतांश भागांमध्ये काल (१८ जुलै) सकाळपासून होणारा पाणीपुरवठा बाधित झाला होता.

त्यानंतर भांडुप जलशुद्धीकरण संकुलात शिरलेले पावसाचे पाणी युद्धपातळीवर उपसून गाळणी (filtration) व उदंचन (pumping) यंत्रणा परिसर यापासून मोकळा करण्यात आला. स्वच्छता करण्यात आली. संबंधित संयंत्राची पाहणी करून आवश्यक ती दुरुस्ती केल्यानंतर आवश्यक ती सर्व तांत्रिक कार्यवाही करून उदंचन करणारे पंप टप्‍प्‍याटप्‍प्‍याने सुरू करण्‍यात येत आहेत.

उदंचन सुरू होताच भांडुप मुख्‍य जलसंतुलन (Main Reservoir) कुंभातील पाणीपातळी उंचावू लागली. त्‍यानंतर सायंकाळपासून पश्चिम उपनगरांसह शहर भागातील अनेक भागांमध्‍ये पाणीपुरवठादेखील करण्‍यात आला. यामध्‍ये प्रामुख्‍याने एच/पश्चिम विभागातील चॅपल रोड परिसर, खारदांडा, के/पूर्व भागातील मोगरापाडा, पार्ले पूर्व परिसर, के/पश्चिम विभागातील यारी रोड, पी/उत्‍तर विभागातील मढ, गांधीनगर, पी/दक्षि‍ण विभागातील बिंबीसार परिसर, आर/दक्षिण वि‍भागातील ठाकूर संकूल, लोखंडवाला संकूल, आर/उत्‍तर विभागामध्‍ये दहिसर परिसर यांचा समावेश आहे.

शहर भागामध्‍ये जी/दक्षि‍ण विभागातील तुळशीपाईप मार्ग, सेनापती बापट मार्ग परिसर, एन. एम. जोशी मार्गावर दादर ते भायखळा दरम्‍यान, तसेच जी/उत्‍तर विभागात दादर, माहिम, धारावी, डी विभागात भुलाभाई देसाई मार्ग, ताडदेव, महालक्ष्‍मी, ए विभागात कुलाबा, कफ परेड अशा निरनिराळ्या भागांमध्‍ये टप्‍प्‍याटप्‍प्‍याने पाणीपुरवठा देण्‍यात आला आहे/देण्‍यात येत आहे.

भांडुप संकुलातील यंत्रणा टप्‍प्‍याटप्‍प्‍याने चालू करण्यात येत असून पाणीपुरवठा पूर्वपदावर येत आहे. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर मुंबईकर नागरिकांनी पाणी उकळून घ्यावे आणि नंतर ते प्यावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने पुन्‍हा एकदा करण्यात आले आहे.

नगरसेवक संदीप पटेल मैदानात

पावसामुळे मुंबई महापालिकेचा पाणीपुरवठा खंडित झाल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत जनतेला मदतीचा हात देण्यास गोरेगाव परिसरातले नगरसेवक संदीप दिलीप पटेल लगेच कार्यरत झाले. काल त्यांनी जवाहर नगरमधील झोपडपट्टीवासीयांना बिसलरी पाण्याच्या बाटल्यांचे स्वतःच्या हस्ते तसेच कार्यकर्त्यांकरवी वाटप केले.

Continue reading

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...
Skip to content