Homeकल्चर +उद्या ‘डोन्ट लुक...

उद्या ‘डोन्ट लुक अवे’ पाहा ‘भुताटकी’त!

रसिक प्रेक्षकांचं चित्त वेधून घेणारा हॉलीवूडचा सुपरहिट रहस्यमय चित्रपट ‘डोन्ट लुक अवे’ आता ‘भुताटकी’ या शीर्षकाखाली मराठीमध्ये पाहयला मिळणार आहे. हा चित्रपट उद्या, १० मे रोजी ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांना खोल गुंतवून ठेवणार आहे.

मॅकविन नावाच्या एका भयानक पुतळ्याकडे जो कोणी पाहतो त्याचा मृत्यू होतो. फ्रँकी नावाची एक तरुण मुलगी तिच्या मित्रांना या पुतळ्यापासून वाचवण्यासाठी पुतळ्यामागच्या शक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न करते. फ्रँकीच्या प्रयत्नांना यश येते की नाही, हे चित्रपटात कळणार आहे.

चित्रपटाच्या दिग्दर्शकाने पूर्ण रहस्याने भरलेला चित्रपट देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला आहे. रसिकांना जर असेच रहस्यमय चित्रपट पाहयला आवडत असतील तर त्यांच्यासाठी ‘भुताटकी’ अगदी योग्य चित्रपट ठरणार आहे, असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लि.चे सी.ई.ओ. सुशीलकुमार अग्रवाल यांनी सांगितले.

Continue reading

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...

आखाती देशांमध्ये उद्या साजरी होणार ईद!

संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि बहरीनसह अनेक आखाती देशांनी ईद-उल-फित्रच्या अधिकृत प्रारंभ तारखेची आज घोषणा केली. 30 दिवसांचा रमजान महिना पूर्ण झाल्याचे दर्शवणारा शव्वाल महिन्याचा चंद्र न दिसल्यामुळे, उद्या 20 मार्च, शुक्रवार रोजी ईद-उल-फित्र साजरी...

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...
Skip to content