Sunday, April 13, 2025
Homeडेली पल्स‘वॅम’मुळे रेशमसह अनेकांना...

‘वॅम’मुळे रेशमसह अनेकांना मिळाले एक आश्वासक व्यासपीठ!

रेडिओ जॉकी, व्हॉइस-ओव्हर आणि ऑडिओ एडिटिंग अर्थात ध्वनी संपादन क्षेत्रातल्या कौशल्याच्या आधारे अंधत्वावर मात करत आपले कतृत्व सिद्ध करणाऱ्या रेशम तलवारला आता वॅमने (WAM) म्हणजेच वेव्ह्ज (World Audio Visual and Entertainment Summit) ॲनिमे आणि मंगा क्षेत्रात एक नवे आणि मोठे व्यासपीठ मिळवून दिले आहे.

रेशम तलवार यांचा नेहमीच आपल्या आवाजाच्या क्षमतेवर विश्वास होता. एक दृष्टीबाधित कलाकार असूनही त्यांना एका गोष्टीची जाणिव होती, की त्यांच्या आवाजात केवळ शब्दच नव्हे, तर भावना, अभिव्यक्ती आणि पात्रांना जिवंत करण्याची क्षमता आहे. दिव्यांग असूनही त्यांनी कधीच आपल्या दिव्यांगत्वाला स्वतःची ओळख बनू दिले नाही. त्याऊलट आवाजी अभिनय अर्थात व्हॉइस-ॲक्टिंगच्या अत्यंत स्पर्धात्मक जगात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. काल  त्या दिल्लीत झालेल्या जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेअंतर्गतच्या (World Audio Visual and Entertainment Summit – WAVES) ॲनिमे आणि मंगा स्पर्धेतल्या (WAM) व्हॉइस ॲक्टिंग श्रेणीतील विजेत्या ठरल्या आहेत. या विजयाने त्यांच्या आजवरच्या वाटचालीलाच एका नवी उंची मिळाली आहे.

केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालय तसेच भारतीय माध्यम आणि मनोरंजन संघटनेने (MEAI) परस्पर सहकार्यातून संयुक्तपणे या अभिनव स्पर्धेचे आयोजन केले आहे. देशातील कलाकारांना त्यांची प्रतिभा सादर करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, तसेच ॲनिमे आणि मंगाबाबतीत भारतात दिसून येणाऱ्या वाढत्या उत्साहाला मूर्त रुप मिळवून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. वॅमच्या आयोजनामुळे कलाकारांना लोकप्रिय जपानी शैलींचे भारतीय तसेच जागतिक अशा दोन्ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतील अशा प्रकारचे स्थानिक स्वरुप विकसित करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आहे. या स्पर्धेमुळे स्पर्धकांच्या कलात्मक अभिव्यक्तीला चालना देणाऱ्या आणि उदयोन्मुख प्रतिभांना प्रोत्साहन देणाऱ्या प्रकाशन, वितरण आणि उद्योग क्षेत्रातील संधीही उपलब्ध झाल्या आहेत. या स्पर्धेंतर्गत 11 शहरांमध्ये राज्यस्तरीय स्पर्धा होतील आणि त्यानंतर मुंबईत होणाऱ्या जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेदरम्यान (WAVES) या स्पर्धेची राष्ट्रीय महाअंतिम फेरी होईल.

2023मध्ये भारतातील ॲनिमे बाजाराचे उलाढाल मूल्य 1,642.5 दशलक्ष डॉलरइतके होते. 2032पर्यंत ते 5,036 दशलक्ष डॉलरपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आहे. नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइम व्हिडिओ, क्रंचिरोल आणि डिस्ने+ हॉटस्टार यांसारख्या व्यासपीठांमुळे आता प्रेक्षकांना सहजपणे ॲनिमे कलाकृती पाहता येतात. या कलाकृतींचा भारतीय दर्शकांनाही आनंद घेता यावा यासाठी त्यांना भारतीय भाषांमधील उपशीर्षकांची जोडही दिलेली असते. याचप्रमाणे आता मंगा कलाकृतीदेखील लोकांना सहज उपलब्ध होऊ लागली आहेत. अमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपन्याही कॉमिक पुस्तकांची विक्री करू लागल्या आहेत. इतकेच नाही तर यासाठी काही खास दुकानेही उघडली जात आहेत.

रेशमचा विजय ही अनेक आश्चर्यकारक यशोगाथांपैकी केवळ एक यशोगाथा आहे. वाराणसीमधल्या सनबीम वरुणा या शाळेची विद्यार्थिनी एंजल यादव हिने वॅमअंतर्गत वाराणसीत झालेल्या मंगा (विद्यार्थी श्रेणी) स्पर्धेत परीक्षकांनाच अचंबित केले. तिने सादर केलेल्या कलाकृतीचा कोलकातामधल्या वैभवी स्टुडिओवर इतका मोठा प्रभाव पडला की त्यांनी तिला थेट नोकरीच देऊ केली. यातून आपला युवा वर्ग या क्षेत्रात किती मोठी छाप पाडू शकतात याचीच प्रचिती आपल्या सगळ्यांना येते. रणदीप सिंग हे एक व्यावसायिक मंगा कलाकार आहेत. त्यांनी भुवनेश्वरमध्ये वॅमअंतर्गत आयोजित स्पर्धेत भाग घेतला होता. परीक्षकांना त्यांचे काम इतके आवडले, की त्यांनी ते छपाईयोग्य असल्याची मोहोर त्यावर उमटवली. रणदीप सिंग स्वतःच्या मंगावर काम करत असलेतरी त्यांना वैभवी स्टुडिओकडून आधीच मोबदला मिळवून देणारे मंगा प्रकल्प मिळाले आहेत. या उदाहरणांमधून वॅमच्या माध्यमातून कलाकारांच्या जीवनानात कसा बदल घडून येतो याचीच प्रचिती येते.

वॅमला मिळणारे अभूतपूर्व पाठबळ केवळ वैयक्तिक यशोगाथांपुरते मर्यादित नाही, तर यात या उद्योगातल्या काही आघाडीच्या दिग्गज नावांचाही समावेश आहे. लागलीच काम सुरू करण्यासाठी तयार असलेल्या प्रतिभेच्या शोधात असलेले बॉब पिक्चर्सचे संचालक श्रीकांत कोनाथम यांनी भविष्यातील वॅमच्या प्रत्येक कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले आहे. टून्सूत्रचे नवीन मिरांडाही वेबटूनच्या अवकाशात विजेत्यांसोबत वितरणविषयक करार करत आहेत, तर ईटीव्ही बाल भारतच्या राजेश्वरी रॉय कलाकारांना ॲनिमेविषयक प्रकल्पांच्या संकल्पनांसाठी संधी देत आहेत. मध्य भारतातील सर्वात मोठ्या ॲनिमेशन स्टुडिओचे संस्थापक निलेश पटेल यांनी विजेत्यांना नोकरी आणि अंतिम फेरीत पोहोचलेल्या स्पर्धकांना इंटर्नशिपची संधी देण्याचे आश्वासन दिले आहे.

वॅम, हे एक असे व्यासपीठ आहे जिथे रेशमसारखी दृष्टीबाधित व्हॉइस ॲक्टर एंजलसारख्या किशोरवयीन मंगा कलाकाराच्या किंवा रणदीपसारख्या अनुभवी व्यावसायिक कलाकारासोबत तितक्याच ताकदीने उभी राहू शकते. हा उपक्रम म्हणजे केवळ एक स्पर्धा नाही, तर भारतातल्या  सर्जनशील प्रतिभांचा शोध घेण्याच्या, त्यांना प्रोत्साहन देण्याच्या आणि त्यांना गौरवान्वित करण्याच्या विद्यमान प्रक्रियांना नवा आयाम मिळवून देणारी एक क्रांती आहे. आता वेव्ह्ज शिखर परिषद अगदी जवळ येऊन ठेपली आहे. या परिषदेच्या माध्यमातून जगाला भारताच्या लोककथांच्या वारशाशी घट्टपणे जोडलेल्या आणि आता ॲनिमे आणि मंगासारख्या आधुनिक माध्यमांचा अवलंब करत असलेल्या इथल्या कथात्मक मांडणीकारांचे दर्शन होईल.

स्रोत: माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

मध्य भारताला पावसाने झोडपले, बिहारमध्ये दोन दिवसांत ८२ बळी!

भारताच्या मध्य तसेच पूर्व भागाला गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले असून गेल्या दोन दिवसांत बिहारमध्ये ८२ जणांचा मृत्यू झाल्याचे बोलले जाते. मुसळधार पाऊस, गारपीट आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ही जीवितहानी झाली आहे. बिहार सरकारने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी...

वक्फनंतरची आज पहिली जुम्मा नमाज! ठिकठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त!!

वक्फ बोर्डाच्या कायद्यात सुधारणा केल्यानंतर आज पहिल्यांदाच मुसलमानांकडून पढली जाणारी पहिली जुम्माची नमाज असून एकूण परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी देशातल्या अनेक भागात मुस्लीम मोहल्ल्याच्या परिसरात पोलीसांच्या छावणीचे स्वरूप आले आहे. वक्फ बोर्डाच्या कायद्यात झालेल्या सुधारणांना बहुतांशी सर्वच मुस्लीम संघटनांनी तसेच विरोधी...

तव्वहूर राणाचा बोलविता धनी कोण? १२ वाजता होणार चौकशी सुरू!

मुंबईत झालेल्या २६ / ११चा मास्टरमाईंड तव्वहूर राणा सध्या एनआयएच्या ताब्यात असून साधारण १२ वाजल्यापासून त्याच्या चौकशीला सुरूवात होईल. या चौकशीत राणाचा पाकिस्तानमधला बोलविता धनी कोण, त्याला पैसा पुरवणारा कोण तसेच त्याचे भारतातले जाळे शोधून काढण्याचा प्रयत्न केला जाणार...
Skip to content