Homeचिट चॅटवायकर साहेब.. आमचे...

वायकर साहेब.. आमचे मत तुम्हालाच!

वायकर साहेब तुम्ही आला नसता तरीही आमचे मत तुम्हाला व मोदींनाच म्हणजेच विकासाला दिले असते, अशी ग्वाही जुहू परिसरातल्या अनेक ज्येष्ठ नागरिकांनी दिल्याची माहिती उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातले महायुतीचे (शिवसेनेचे) उमेदवार रविंद्र वायकर यांनी दिली.

जुहू लाफ्टर क्लब, जुहू बिच अरेबिक अँड योगा क्लब, डाॅक्टसॅ ३६५ तसेच विवेकानंद युथ कनेक्ट फाउंडेशन यांनी माझा सत्कार केला तसेच माझ्यावर जो विश्वास व्यक्त केला तो मी सार्थ ठरवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करीन. स्वच्छ मुंबई सुंदर मुंबई तसेच स्वच्छ भारतचे प्रतीक चौपाटीवर पाहायला मिळत आहे, असे ते म्हणाले.

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात शरीराचे स्वास्थ्य अबाधित ठेवायचे असेल तर व्यायाम हवाच. तसा मी सकाळी उठून व्यायाम करतोच. जुहू चौपाटीवरील जुहू लाफ्टर क्लब तसेच विवेकानंद युथ कनेक्ट फाउंडेशन हे करीत असलेल्या कामाचे खूप नाव ऐकले होते. आज सकाळी मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने भाजपचे स्थानिक आमदार अमित साटम यांच्या सहयोगाने यांना भेटायची संधी प्राप्त झाली. जुहू येथील अथांग असा महासागर, उसळणाऱ्या पाण्याच्या लाटा, मॉर्निंग वॉकसाठी चौपाटीवर आलेले तरुण ते ज्येष्ठ नागरिक यांच्यामधील सळसळता उत्साह बघून मी भारावून गेलो. सर्वांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. चौपाटीवर उपस्थित लोकांशी व सदस्यांशी चर्चा केली, असे वायकर यांनी सांगितले.

दिंडोशीच्या सर्वंकष विकासासाठी वायकरसारख्या नेत्याची गरज

स्वकर्तृत्वावर सर्वसामान्य शिवसैनिक, नगरसावक ते महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री तसेच पक्षाने ज्या ज्या जबाबदाऱ्या दिल्या त्याला प्रामाणिकपणे न्याय देऊन सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन जोगेश्वरी

विधानसभा क्षेत्राचा सर्वांकष विकास करणारा नेता रविंद्र वायकर दिंडोशी विधानसभा क्षेत्राच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, अशी भावना दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील जनतेमध्ये प्रचारफेरीदरम्यान दिसून आली, असे त्यांनी सांगितले.

‘हमारा नेता कैसा हो… रविंद्र वायकर जैसा हो’, ‘अबकी बार ४०० पार’, जय श्रीराम, हर हर मोदी… घर घर मोदी’ अशा घोषणांनी दिंडोशी विधानसभा क्षेत्र रविवारी दणाणून निघाले होते. निमित्त होते लोकसभा प्रचारफेरी. वायकर यांच्या प्रचारार्थ दिंडोशी विधानसभा क्षेत्रात सकाळी नऊ वाजल्यापासून प्रचारफेरी काढण्यात आली. रहेजा नगर येथून सुरुवात झालेली ही प्रचार फेरी तानाजी नगर मार्गे वारणा बेकरी, शिवाजीनगर, भीम नगर, क्रांती नगर, साईबाबा नगर ते अप्पा पाडा रिक्षा स्टॅन्ड त्यानंतर काढण्यात आली.

भव्य अशा प्रचारफेरीमध्ये शिवसेना, भाजपा, रिपाई, रासप, मनसे चे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. या प्रचारफेरीमध्ये ठिकठिकाणी उमेदवार रविंद्र वायकर यांचे जंगी स्वागत करण्यात आले. स्थानिक जनताही त्यांची भेट घेण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणी तर महिलांनी त्यांचे औक्षण करून तसेच पुष्पहार घालून त्यांना विजयी होण्याच्या शुभेच्छा दिल्या.

या प्रचारफेरीमध्ये विधान परिषद आमदार राजहंस सिंग, निरीक्षक वैभव भराडकर, विभागप्रमुख गणेश शिंदे, विभाग संघटिका सुषमा नेवरे, माजी नगरसेविका दक्षा पटेल, विनोद मिश्रा, मनसेचे विभागप्रमुख ॲड भास्कर परब, आत्माराम चाचे भाजपचे दिंडोशी विधानसभा अध्यक्ष राजन सिंग, रिपब्लिकन पार्टीचे तालुका अध्यक्ष संजय बोराडे, माजी नगरसेविका विनया सावंत आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Continue reading

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...

आखाती देशांमध्ये उद्या साजरी होणार ईद!

संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि बहरीनसह अनेक आखाती देशांनी ईद-उल-फित्रच्या अधिकृत प्रारंभ तारखेची आज घोषणा केली. 30 दिवसांचा रमजान महिना पूर्ण झाल्याचे दर्शवणारा शव्वाल महिन्याचा चंद्र न दिसल्यामुळे, उद्या 20 मार्च, शुक्रवार रोजी ईद-उल-फित्र साजरी...

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...
Skip to content