Sunday, September 8, 2024
Homeटॉप स्टोरीलोकसभेच्या अंतीम टप्प्याचे...

लोकसभेच्या अंतीम टप्प्याचे मतदान सुरू

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी सुरूवात झाली. बिहार, चंदीगड, हिमाचल प्रदेश, झारखंड, ओदिशा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालसह 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 57 लोकसभा मतदारसंघात हे मतदान होत आहे. याच्या सोबतीलाच ओदिशा राज्य विधानसभेच्या उर्वरित 42 विधानसभा मतदारसंघांसाठीही याच वेळी मतदान होत आहे.

गेल्या महिन्याच्या 19 तारखेपासून सुरू झालेल्या या मतदान महाभियानाची आज सांगता होत आहे. या महाभियानात याआधी 6 टप्प्यात 486 लोकसभा मतदारसंघातील मतदान पूर्ण झाले आहे. 28 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 486 लोकसभा मतदारसंघातील मतदान सुरळीत आणि शांततेत पार पडले आहे. 4 जूनला मतमोजणी होणार आहे.

मतदान सुखकर आणि सुरक्षित वातावरणात होईल याची खात्री करण्यासाठी पुरेशी सावली, पिण्याचे पाणी, रॅम्प आणि स्वच्छतागृहांसह सर्व मूलभूत सुविधांसह मतदारांचे स्वागत करण्यासाठी मतदान केंद्रे सज्ज आहेत. हवामान विभागाने ज्या भागांसाठी उष्ण हवामान किंवा पावसाचा अंदाज वर्तवला असेल अशा भागात, संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी आणि राज्य यंत्रणांनी प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी पुरेशा उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मतदान

उष्ण वातावरण असूनही, मतदारांनी मागील टप्प्यात मतदान करण्यासाठी मतदान केंद्रांवर मोठी गर्दी केली होती. मागच्या दोन टप्प्यात, महिला मतदानाची टक्केवारी पुरुष मतदारांच्या तुलनेत जास्त असल्याचे दिसून आले आहे. मतदारांनी घराबाहेर पडून जबाबदारी समजून घेत, अभिमानाने तसेच अधिकाधिक संख्येने मतदान केंद्रांवर जाऊन मतदान करण्याचे आवाहन आयोगाने केले आहे.

या टप्प्यातल्या मतदानाचे वैश्ष्ट्यं..

1. सार्वत्रिक निवडणुका 2024 च्या टप्पा-7 साठी आज 1 जून 2024 रोजी 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 57 लोकसभा मतदारसंघांसाठी (सर्वसाधारण – 41; अनुसूचित जमाती – 03; अनुसूचित जाती – 13) मतदान होत आहे. मतदान सकाळी 7 वाजता सुरू झाले आहे आणि मतदान बंद होण्याच्या वेळा लोकसभा मतदारसंघानुसार भिन्न असू शकतात.

2. ओदिशा विधानसभेच्या 42 विधानसभा मतदारसंघात (सर्वसाधारण – 27; अनुसूचित जमाती – 06; अनुसूचित जाती – 09)देखील याच वेळी मतदान होणार आहे.

3. सुमारे 10.9 लाख मतदान अधिकारी 1.09 लाख मतदान केंद्रांवर 10.06 कोटी मतदारांचे स्वागत करतील.

4. सुमारे 10.06 कोटी मतदार या टप्प्यात मतदान करणार असून यापैकी 5.24 कोटी पुरुष मतदार;  4.82 कोटी महिला मतदार तर 3574 तृतीयपंथी मतदार आहेत.

5. 85 वर्षं किंवा त्याहून अधिक वयाचे मतदार आणि दिव्यांग मतदार यांच्यासाठी पर्यायी गृह मतदान सुविधा उपलब्ध आहे.

मतदान

6. 13 विशेष गाड्या आणि 8 हेलिकॉप्टर (हिमाचल प्रदेशसाठी) मतदान आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना नेण्यासाठी तैनात करण्यात आली आहेत.

7. 172 निरीक्षक (64 सामान्य निरीक्षक, 32 पोलीस निरीक्षक, 76 व्यय  निरीक्षक) मतदानाच्या काही दिवसांपूर्वीच त्यांच्या मतदारसंघात पोहोचले आहेत. हे निरिक्षक अत्यंत दक्ष राहून आयोगाचे डोळे आणि कान म्हणून काम करत आहेत. याव्यतिरिक्त, काही राज्यांमध्ये विशेष निरीक्षक तैनात करण्यात आले आहेत.

8. मतदारांना दिल्या जाणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनावर काटेकोरपणे लक्ष ठेवत त्वरीत पाऊले उचलता यावीत यासाठी एकूण 2707 भरारी पथके, 2799 सांख्यिकी निरीक्षण पथक, 1080 देखरेख  ठेवणारी पथके आणि 560 व्हिडिओ निरीक्षण पथके चोवीस तास देखरेख ठेवत आहेत.

9. एकूण 201 आंतरराष्ट्रीय सीमा तपासणी नाके आणि 906 आंतरराज्य सीमा तपासणी नाके मद्य, अंमली पदार्थ, रोख रक्कम आणि मोफत वस्तूंच्या कोणत्याही प्रकारच्या अवैध वाहतूकीवर कडक नजर ठेवत आहेत. सागरी आणि हवाई मार्गांवर कडक देखरेख ठेवण्यात आली आहे.

10. वृद्ध आणि दिव्यांग मतदार व्यक्तींना सुलभतेने मतदान करण्याच्या दृष्टीने पाणी, सावली, स्वच्छतागृह, रॅम्प, स्वयंसेवक, चाकाची खुर्ची आणि वीज यांसारख्या किमान सोयीसुविधा उपलब्ध आहेत.

11. सर्व नोंदणीकृत मतदारांना मतदार माहिती पावतीचे वाटप करण्यात आले आहे. या पावत्या एक सोयीच्या आणि मतदान करण्याचे आमंत्रण म्हणूनही काम करतात. पण मतदानासाठी या पावत्या बंधनकारक नाहीत.

12. https://electoralsearch.eci.gov.in/ या लिंकद्वारे मतदार त्यांचे मतदान केंद्र तपशील आणि मतदानाची तारीख तपासू शकतात.

13. मतदान केंद्रांवर ओळख पडताळणीसाठी आयोगाने मतदार ओळखपत्र (EPIC)व्यतिरिक्त 12 पर्यायी कागदपत्रे देखील मान्य केली आहेत. मतदारयादीत मतदार नोंदणीकृत असल्यास, यापैकी कोणतेही कागदपत्र दाखवून मतदान करता येते. पर्यायी ओळख दस्तऐवजांसाठी निवडणूक आयोगाच्या आदेशाची लिंक: https://tinyurl.com/43thfhm9

Continue reading

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राची बाजी!

गेले दोन वर्षं सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक 1वर असलेल्या महाराष्ट्रात 2024-2025, या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतसुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली आहे. एप्रिल ते जून 2024 या पहिल्या तिमाहीत एकूण 70,795 कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. थोडक्यात सांगायचे...

उद्यापासून श्री गणेशोत्सव!

उद्यापासून गणेशोत्सव! गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या वातावरणामुळे भाविकांमध्ये आंनद आणि उत्साह संचारतो. श्री गणेशचतुर्थी हा हिंदूंचा मोठा सण आहे. श्री गणेश चतुर्थीला, तसेच श्री गणेशोत्सवाच्या दिवसांत गणेशतत्त्व नेहमीच्या...

अनुराधा पौडवाल यांची नवी भक्तीमय स्वरभेट अर्पण!

गणेशोत्सवाचे औचित्य साधून आदि शंकराचार्य रचित ‘गणेश पंचरत्न’ या गणपतीच्या श्लोककाव्याची स्वरभेट लोकप्रिय ज्येष्ठ पार्श्वगायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांनी कोट्यवधी भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या मुंबईतील श्री सिध्दीविनायक मंदिरात मंगळवारी सकाळी श्रींच्या चरणी अर्पण केली. श्री सिध्दीविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर,...
error: Content is protected !!
Skip to content