Homeचिट चॅटबिग बॉसमध्ये आज...

बिग बॉसमध्ये आज विशाल VS विकास!

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरू आहे एक आगळवेगळं साप्ताहिक कार्य. अद्भुत नगरावर ताबा मिळविण्यासाठी राक्षस आणि देवदूतांमध्ये युद्ध सुरू झालं. हे दोघेही स्वत:च्या मूळ स्वभावाशी एकनिष्ठ राहून हे युद्ध लढणार असे जरी काल बिग बॉसने जाहीर केलं असलं तरीसुद्धा हा प्रश्न मनात येतो, सदस्य त्यांच्या मूळ स्वभावाशी एकनिष्ठ राहू शकतील? टास्क जिंकण्यासाठी प्रत्येक सदस्य मनापासून प्रयत्न करतो. पण कधीकधी ते काय करत आहेत याचं त्यांना भान राहत नाही. असंच काहीसं कालच्या भागामध्ये घडलं आणि आजही घडणार असं दिसून येत आहे.

नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमधून बिग बॉसच्या घरातील जय–विरूची जोडी आता कुठेतरी तुटणार असे वाटतं. नॉमिनेशन टास्कपासून या वादाला सुरुवात झाली आणि हा वाद आज विकोपाला जाणार आहे. टास्कमुळे अजून काय काय घडणार? किती नाती दुरावली जाणार? कोणाकोणाचं खरं रूप समोर येणार? हे अनेक प्रश्न कालचा प्रोमो बघून आपल्या मनात येऊ शकतात.

टास्कमध्ये आता टीम B डेव्हिल असणार आहे. यामध्ये आता विशाल आणि विकासच्या संयमाची कसोटी लागणार आहे. विशाल विकासला टास्क सुरू असताना म्हणाला, सगळ्याचा हिशेब घेतला जाईल. विकासच्या रागाचा विशालला सामना करावा लागणार आहे. विकास चिडून विशालला म्हणाला, खेळ खेळता येत नाही तुला.. हेच करणार तू… विशाल त्यावर म्हणाला- मला खरोखर डेव्हिलच्या रूपात यायला नको लावूस. विकास म्हणाला, “तू डेव्हिलच आहेस, यायची गरज नाहीये… विशाल म्हणाला, मी डेव्हिलचं आहे.. बघूया आता हा वाद अजून कुठवर जाणार? विशाल आणि विकासची मैत्री अखेर तुटणार?

आज दादूस आणि मीनलच्या वाट्यालादेखील येणार आहे कठीण टास्क. घरात सुरू झालेल्या नव्या टास्कमध्ये प्रत्येक सदस्याच्या संयमची कसोटी लागत आहे. आज टीम Bमधील सदस्य डेव्हिल बनणार असून विशाल त्याच्या डेव्हिल रूपात घरामध्ये बराच हंगामा करताना दिसत आहेत. विशालची वेगळीच बाजू या टास्कमुळे प्रेक्षकांना दिसते आहे. विशाल आणि विकासच्या भांडणानंतर आज विशाल दादूसना एक टास्क देताना दिसणार आहे. तर जय आणि सोनाली मीनलला एक मजेदार टास्क देणार आहे.

विशाल दादूसना सांगणार आहे गाणं म्हणा एक… मोठं गाणं, चांगलं गाणं म्हणा… रागात म्हणा… अशा ऑर्डर देताना दिसणार आहे. दादूस यांनी गाणं तयारही केलं “एकच वादा, आमचा विशाल दादा… तर दुसरीकडे मीनलला सोनाली आणि जय म्हणत होते असं करताना तुम्ही, राग आलाय राग आलाय… खूप राग येतोय, मीनलताईंना राग येतो आहे. जय म्हणाला, आता रागवाना एकदा, काय बोलत होता आम्हाला, आमच्याबद्दल बोलता येत नाही… अहो आमच्याबद्दल भरपूर बोलत आहेत, लोक आमची प्रशंसा करत आहेत… त्याच्यामध्येच आम्ही जिंकतो. तोच खरा मान असतो… यात काही मान नसतो. स्वत:च आपल्याबद्दल बोलायचं, स्वत:ची वाहवा नाही करायची, लोकांनी केली पाहिजे.

बघूया आज काय होणार या टास्कमध्ये. रात्री कलर्स मराठीवर.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content