Homeएनसर्कलविनायक खेडेकर, सुनयना...

विनायक खेडेकर, सुनयना हजारीलाल ठरले अकादमी फेलो!

संगीत, नृत्य आणि  नाट्य कलेशी संबंधित संगीत नाटक अकादमी, नवी दिल्लीच्या जनरल कौन्सिलने नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत कला क्षेत्रातील सहा नामवंतांची अकादमी फेलो (अकादमी रत्न) म्हणून एकमताने निवड केली. विनायक खेडेकर, आर. विश्वेश्वरन, सुनयना हजारीलाल, राजा आणि राधा रेड्डी, दुलाल रॉय आणि डी. पी. सिन्हा अशी या नामवंतांची नावे आहेत.

अकादमीची फेलोशिप हा सर्वात प्रतिष्ठित आणि दुर्मिळ सन्मान आहे, जो कोणत्याही वेळी जास्तीतजास्त 40 कलाकारांना दिली जातो. जनरल कौन्सिलने संगीत नाटक अकादमी पुरस्कार 2022 आणि 2023 वर्षांसाठी संगीत, नृत्य, नाट्य, पारंपारिक/लोक/आदिवासी संगीत/नृत्य/नाट्य, कठपुतळी आणि एकूणच योगदान/शिष्यवृत्ती या क्षेत्रातील कलाकारांची निवड केली आहे.

अकादमीच्या जनरल कौन्सिलने 2022 आणि 2023 या वर्षांसाठी संगीत नाटक अकादमीच्या ‘उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कारासाठी’ 80 तरुण कलाकारांचीदेखील निवड केली आहे. उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्काराचे स्वरूप ताम्रपत्र आणि शाल तसेच 25,000/- रुपये असे आहे. हे पुरस्कार संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षांच्या हस्ते एका विशेष समारंभात प्रदान केले जातील.

1952पासून अकादमी पुरस्कार प्रदान केले जात आहेत. अकादमी रत्नच्या सन्मानार्थ ताम्रपत्र आणि शाल याव्यतिरिक्त 3, 00, 000/- रुपये दिले जातात. तर अकादमी पुरस्काराचे स्वरूप 1,00,000/- रुपये आहे. संगीत नाटक अकादमी फेलोशिप आणि पुरस्कार भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते एका विशेष समारंभात प्रदान केले जातील.

Continue reading

१ ऑगस्टला रूपेरी पडद्यावर झळकणार ‘मुंबई लोकल’!

मुंबई शहराची जीवनवाहिनी असलेली मुंबई लोकल आणि त्यात फुलणारी एक प्रेमकहाणी आता 'मुंबई लोकल' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येत आहे. अभिनेता प्रथमेश परब आणि अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर यांची जोडी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार असून येत्या १ ऑगस्टला हा...

57 वर्षांनंतर अर्जेंटिनाला पहिल्यांदा भेट देणार भारतीय पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पाच देशांच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यात तब्बल 57 वर्षांनंतर अर्जेंटिनाला तसेच गेल्या 60 वर्षांत ब्राझिलला भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान असतील. 2 ते 9 जुलै 2025 असा पंतप्रधानांचा हा दौरा आहे. या कालावधीत ते घाना,...

विधिमंडळात आजही गदारोळ?

विधानसभेत अध्यक्षांसमोरील राजदंडाला स्पर्श करत निदर्शने केल्यामुळे काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंगळवारच्या संपूर्ण दिवसभराच्या कामकाजासाठी सभागृहातून निलंबित केले. विधिमंडळात आजही काँग्रेससह विरोधी पक्षांच्या सदस्यांकडून कृषीमंत्र्यांच्या कथित वादग्रस्त विधानांविरूद्ध आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता...
Skip to content