Homeचिट चॅटपुराणिक स्मृती क्रिकेटः...

पुराणिक स्मृती क्रिकेटः वेंगसरकर फाउंडेशन विजेता

क्रिकेटपटू प्रकाश पुराणिक स्मृती चषक महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिलीप वेंगसरकर फाउंडेशनने विजेतेपद पटकाविले. निर्णायक सामन्यात दिलीप वेंगसरकर फाउंडेशनने सलामी फलंदाज सारा सामंत (४५ धावा) व कप्तान पूनम राऊत (नाबाद ४७ धावा) यांच्या आक्रमक फलंदाजीमुळे एमआयजी क्रिकेट क्लबचा ८ विकेटने पराभव करून अजिंक्यपदाला गवसणी घातली.

माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लब व शिवाजी पार्क जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अंतिम  सामन्यात दिलीप वेंगसरकर फाउंडेशनने नाणेफेक जिंकून एमआयजी क्रिकेट क्लबला प्रथम फलंदाजी दिली. प्रारंभ २ बाद १५ धावा असा निराशाजनक होऊनही मिताली म्हात्रे (५२ चेंडूत ५२ धावा, ५ चौकर) व महेक मिस्त्री (३० चेंडूत २७ धावा, ४ चौकार) यांनी डाव सावरला. त्यामुळे एमआयजी क्लबने मर्यादित २० षटकात ६ बाद १२० धावांचा टप्पा गाठला. मध्यमगती गोलंदाज सिद्धी पवारने २६ धावांत ३ बळी घेतले. सलामी फलंदाज सारा सामंत (२२ चेंडूत ४५ धावा, ९ चौकार) व अष्टपैलू पूनम राऊत (३४ चेंडूत नाबाद ४७ धावा, ८ चौकार) यांच्या फटकेबाजीमुळे दिलीप वेंगसरकर फाउंडेशनने विजयी लक्ष्य १३.५ षटकात २ बाद १२३ धावा झळकावून साध्य केले. परिणामी एमआयजी क्रिकेट क्लबला अंतिम उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

अंतिम सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार वेंगसरकर फाउंडेशनची कप्तान पूनम राऊतने पटकाविला. माजी कसोटीपटू करसन घावरी यांच्या हस्ते बक्षीस समारंभ संपन्न झाला. याप्रसंगी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक, सेक्रेटरी अभय हडप, खजिनदार अरमान मलिक, जॉईंट सेक्रेटरी दीपक पाटील तसेच अपेक्स कौन्सिल मेंबर, विजय येवलेकर, संजू खानोलकर, सुनील रामचंद्रन, सुनील पाटील, महेश शेट्ये आदी मान्यवर उपस्थित होते.

Continue reading

अखेर इराणपुढे अमेरिकेने हात टेकले! युद्धविराम!! शुक्रवारी पाकिस्तानात चर्चा!!!

४८ तासांत होर्मूझची सामुद्रधुनी खुली केली नाही तर इराण बेचिराख करू, असा अत्यंत गंभीर इशारा देणाऱ्या अमेरिकेने अखेर इराणपुढे हात टेकले. इराणच्या १० अटींच्या प्रस्तावावर सकारात्मक चर्चा करण्याचे मान्य करत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन आठवड्यांकरीता एकतर्फी युद्धविराम...

आहात तिथेच थांबा! इराणमधल्या भारतीयांना सरकारचे निर्देश!!

मध्यपूर्वेतील इराण आणि इस्रायल यांच्यात वाढता तणाव पाहता, केंद्र सरकारने इराणमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची 'ट्रॅव्हल ॲडव्हायझरी' (मार्गदर्शक सूचना) जारी केली आहे. "पुढील ४८ तास तुम्ही जिथे आहात, तिथेच सुरक्षित राहा आणि अनावश्यक प्रवास टाळा," असे स्पष्ट आदेश...

उद्या पहाटेपासून मीरा-भाईंदर ते चेंबूरपर्यंतच्या प्रवाशांसाठी मेट्रो!

मुंबई आणि उपनगरातील प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि वेगवान करण्याच्या दिशेने मंगळवारी एक मोठे पाऊल पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मेट्रो मार्गिका ९ (टप्पा १) आणि मेट्रो मार्गिका...
Skip to content