Homeचिट चॅटरामदास आठवले यांनी...

रामदास आठवले यांनी सलग ५व्या वर्षी दत्तक घेतला पँथर!

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सलग पाचव्या वर्षी मुंबईतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबळ्या वाघ (पँथर) दत्तक घेतला. वन्य प्राणी दत्तक योजनेअंतर्गत रामदास आठवले यांनी त्यांचे सुपुत्र जित आठवले यांच्या हस्ते नुकतेच 1 लाख 20 हजार रुपये वार्षिक शुल्क अदा करून पँथर दत्तक घेतला. दलित पँथरपासून पँथर ही ओळख असणारे नेते रामदास आठवले यांचे पँथर, या वन्यजीवावर प्रेम आहे. त्यामुळे त्यांनी वन्यप्राणी दत्तक योजनेत सलग पाचव्या वर्षी पँथर बिबळ्या वाघ दत्तक घेतला.

निसर्गातील अन्नसाखळीमध्ये समतोल राखण्यात पँथर महत्त्वाची भूमिका पार पाडतो. तसेच वन्य प्राण्यांवर प्रेम करा; निसर्गावर प्रेम करा; पर्यावरण वाचविण्यासाठी प्रयत्न करा आणि वन संवर्धनासाठी निसर्गाचे आपण काही देणे लागतो या विचारातून आपण पँथर दत्तक घेतला असून ज्यांना शक्य आहे त्यांनी वन्यप्राणी दत्तक योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन आठवले यांनी नंतर केले. यावेळी आठवले यांच्या पत्नी सीमा आठवले उपस्थित होत्या. वनसंरक्षक आणि संचालक एस. मल्लिकार्जुन यांच्या हस्ते बिबळ्या वाघ दत्तक घेतल्याचे प्रमाणपत्र रामदास आठवले यांना सुपूर्द करण्यात आले. या दत्तक बिबळ्या वाघाचे नाव सिम्बा ठेवण्यात आले असून त्याचा पाचवा वाढदिवस केक कापून आणि बुद्धवंदना घेऊन साजरा करण्यात आला.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content