Homeटॉप स्टोरीदेशात समान नागरी...

देशात समान नागरी कायदा व वन नेशन, वन इलेक्शन…

भारतीय जनता पार्टीचे नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत भारतीय जनता पार्टीच्या मुख्यालयात पक्षाच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन केले. या जाहीरनाम्याला भाजपाने संकल्पपत्र असे नाव दिले असून त्यात सत्तेवर आल्यानंतर देशात समान नागरी कायदा लागू करण्याची तसेच देशात लोकसभा आणि विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका एकाचवेळी घेण्याची ‘वन नेशन, वन इलेक्शन’ची घोषणा केली.

समान नागरी

भाजपाच्या संकल्पपत्रातले महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे-

  1. मुद्रा योजनेतील कर्जांची लिमिट 10 लाखांवरुन 20 लाख.
  2. लखपती दीदी योजनेचा विस्तार करून 3 कोटी महिलांना लखपती बनवणार.
  3. आयुष्मान भारत योजना सर्व वर्गातील 70 वर्षे वयावरील नागरिकांना लागू करणार.
  4. पीएम आवास योजनेत नवीन 3 कोटी घरे बनवणार.
  5. एकलव्य शाळांची संख्या वाढवणार.
  6. तमिळ भाषा जगातील सर्वात प्राचीन भाषा आहे. तिचा विस्तार करणार.
  7. महिलांना अनेक क्षेत्रात कौशल्यविकास प्रशिक्षण देणार.
  8. टूरिझम क्षेत्राला बळ देणार. रोजगार वाढणार. अनेक क्षेत्राना संधी.
  9. इको टूरिजममध्ये आदिवासींना संधी.
  10. सोशल इन्फ्रास्ट्रक्चर वाढवणार.
  11. फिजिकल व डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर वाढवणार.
  12. इंडस्ट्री 4.0साठी अनेक उपाय.
  13. नवीन रोजगार संधी उपलब्ध करुन देणार.
  14. वंदे भारत- 3 प्रकार स्लीपर, चेअर, मेट्रो.
  15. बुलेट ट्रेन- उत्तर, दक्षिण, पूर्व भारतात करणार.
  16. देशाला प्रत्येक क्षेत्रात आत्मनिभर करणार. एनर्जी, खाद्यतेल प्राधान्य.
  17. सूर्यघर योजनेचा विकास.
  18. ग्रीन एनर्जी हब, फार्मा हब, इलेक्ट्रॉनिक हब, सरंक्षण आयुधे हब.
  19. विश्वबंधू भारत. सर्व जगातील मानवतेचं रक्षण ही भारताची जबाबदारी.
  20. वन नेशन, वन इलेक्शन.
  21. समान नागरी कायदा.
  22. भ्रष्टाचारविरोधी मोहीम चालूच राहणार.
  23. देशात ऑलिम्पिकचे आयोजन करणार.

Continue reading

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...

आखाती देशांमध्ये उद्या साजरी होणार ईद!

संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि बहरीनसह अनेक आखाती देशांनी ईद-उल-फित्रच्या अधिकृत प्रारंभ तारखेची आज घोषणा केली. 30 दिवसांचा रमजान महिना पूर्ण झाल्याचे दर्शवणारा शव्वाल महिन्याचा चंद्र न दिसल्यामुळे, उद्या 20 मार्च, शुक्रवार रोजी ईद-उल-फित्र साजरी...

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...
Skip to content