Homeचिट चॅट8 कोटींच्या कोकेनसह...

8 कोटींच्या कोकेनसह युगांडाच्या व्यक्तीला अटक!

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, महसूल गुप्तचर विभागाच्या (DRI) अधिकाऱ्यांनी गेल्या सोमवारी (7 ऑगस्ट, 2023) मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (CSMI) अंमली पदार्थ बाळगल्याच्या संशयावरून युगांडाच्या एका पुरुष प्रवाशाला अटक केली. या संदर्भात प्रवाशाकडे सविस्तर चौकशी केली असता, भारतात तस्करी करण्यासाठी आपण अंमली पदार्थ असलेल्या कॅप्सूलचे सेवन केल्याचे आणि ते शरीरातून वाहून नेत असल्याचे कबूल केले. या प्रवाशाला नंतर दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले आणि न्यायालयाच्या आदेशानुसार त्याला मुंबईच्या जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले.

785 ग्रॅम कोकेन असलेल्या एकूण 65 कॅप्सूल, ज्याची किंमत 7.85 कोटी रुपये आहे, त्याच्या शरीरातून बाहेर काढण्यात आल्या आणि गुरुवारी (10 ऑगस्ट 2023) एनडीपीएस कायदा 1985 अन्वये जप्त करण्यात आल्या. या प्रवाशाला एनडीपीएस कायदा 1985 च्या कलमानुसार अटक करण्यात आली. या प्रकरणी अधिक तपास सुरू असून भारतात अंमली पदार्थांच्या अवैध तस्करीमध्ये सहभाग असलेल्या या आंतरराष्ट्रीय टोळीच्या इतर सदस्यांचा शोध सुरू आहे.

Continue reading

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...

केशव उपाध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तर डावखरे, राणे सरचिटणीस!

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचवेळी प्रदेश सरचिटणीस म्हणून आमदार निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश...
Skip to content