Homeपब्लिक फिगरआमच्या समर्थनामुळेच उद्धव...

आमच्या समर्थनामुळेच उद्धव सेना खुर्च्या उबवत होती!

गेल्या २५ वर्षांत मुंबईकरांनी उद्धवजींच्या नेतृत्त्वाला आणि त्यांच्या शिवसेनेला प्रत्येक निवडणुकीत नाकारले. कायम घरचा रस्ता दाखवला. आमच्या समर्थनामुळे तुमचे आकडे खाली जात असतानाही तुम्ही खुर्च्या उबवत होता. कारण, हिंदुत्वासाठी आम्ही तुम्हाला समर्थन देत होतो. आता परिस्थिती बदलली आहे. आज तुमच्यासमोर भाकीत करतो की, उद्धवजींची शिवसेना येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ५०चा आकडाही पार करू शकणार नाही, अशी टीका मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली.

मुंबई भाजपाच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पक्षाची कार्यकारिणी बैठक रविवारी दादर वसंत स्मृती येथे पार पडली. मंगलप्रभात लोढा, प्रवीण दरेकर, गोपाळ शेट्टी, पूनम महाजन, मनोज कोटक, संजय उपाध्याय, अमित साटम, योगेश सागर, सुनील राणे, पराग अळवणी, कालिदास कोळंबकर, मनीषा चौधरी, भारती लव्हेकर, विद्या ठाकूर, राजहंस सिंह, कॅप्टन तमिळ सेल्वन, जयप्रकाश ठाकूर, चित्रा वाघ, किरीट सोमय्या, सुनील कर्जतकर, केशव उपाध्ये, प्रभाकर शिंदे, राज पुरोहित, मधू चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना सर्वमान्यता

मुंबई शहरातील आमच्यावर टीका करणारे काहीजण म्हणायचे कधीतरी लोकांचे ऐका. सलग १५ दिवसांत ९ मोठे कार्यक्रम अन्य कुठल्या पक्षाला जमू शकत नाहीत तेवढे आपण केले. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्त्वाला सर्वमान्यता आहे. विरोधकांच्या पोटात दुखते. त्यांना त्रास होतो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन मोदींना म्हणातात, तुम्ही चांगली लोकशाही राबवत आहात. आपण पुढच्या महिन्यात भोजनासाठी वॉशिंग्टनमध्ये भेटत आहोत. अमेरिकेतील उच्च वर्तुळात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रसिद्ध आहेत. आम्ही बंद खोलीतून स्वतःच्या मनाशी स्वतः बोलणारे नाही आहोत. आम्ही खुल्या जनतेत बोलणारे नेतृत्त्व आहोत, असे ते म्हणाले.

समाजविघातक कृत्य सहन करणार नाही

यावेळी शेलार यांनी समाजमाध्यमांवर व्हायरल झालेला एक व्हिडीओ दाखवला. भाजप पराभूत झालं, यश मिळालं नाही तर नंगानाच आणि त्याबरोबर समाजविदारक कृत्यांची व्हिडिओ क्लिप कशी काढली जाते? त्याचा आनंद कर्नाटकात साजरा केला. भाजपच्या झेंड्यावर गाय कशी कापली हे दाखविण्यात येत आहे. गाय कापून भाजपच्या झेंड्यावर तुम्ही उन्माद साजरा करणार असाल आणि त्या काँग्रेसबरोबर उद्धवजी तुम्ही बसणार असाल तर तुमचा निषेध करावा तेवढा कमी आहे, असे ते म्हणाले.

.. म्हणून उद्धव ठाकरेंना मुंबईकरांनी नाकारले

१९९७ साली उद्धवजींची शिवसेना लढली, १०३ नगरसेवक होते. ९७ ते २००२ या काळात हा आकडा ९७वर आला. त्यानंतर ते ८४वर आले. २०१२मध्ये तर ही संख्या ७५वर आली. २०१७मध्ये ८४ हा आकडा आला. ते आमच्या सरकारचे भाग होते म्हणून झाले. त्या फायद्यावर ८४चा आकडा गाठला. राज्यात सरकारमध्ये नसते तर त्याच वेळेला हा आकडा ६०वर आला असता. आज तुमच्यासमोर मी भाकीत करतो की, उद्धवजींची शिवसेना मुंबई महापालिकेत पन्नासचा आकडाही पार करू शकणार नाही. ही आकडेवारी त्याचा पुरावा आहे म्हणून मुंबईकरांनी यांना नाकारले; झिडकारले. मुंबईकरांचा प्रामाणिकपणावर भरोसा आहे, उबाठा शिवसेनेचे पाकीटमारीत मोठे नावच आहे… पाकीटमारीचा धंदा करणारे महापालिकेतल्या आणि मविआच्या अट्टल चोरांनी मुंबईला लुटले आहे. प्रामाणिक काम करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुंबईकर उभे राहतील याबद्दल माझ्या मनात बिलकुल शंका नाही, असेही आशिष शेलार म्हणाले.

राज ठाकरेंना कानपिचक्या

पंतप्रधान मोदींनी २ हजाराची नोट बंद करण्याचा निर्णय प्रामाणिकपणे घेतला. आता लगेच काही लोक बोलायला लागले आहेत. राज ठाकरे यांना आमचे निवेदन आहे की, तुम्ही उत्तम बोलता. मोठे नेते आहात. अभ्यास करण्याचा प्रयत्न करता. पण सगळ्याच बाबतीत तुम्ही बोलले पाहिजे आणि तुमचं बोलल्यावर खरंच असेल असं मानण्याचं काही कारण नाही. व्यक्तिगत संबंधांमध्ये तुम्ही आमच्यावर व्यक्तिगत टीका केली तर त्याला आम्ही उत्तर देणार नाही. पण जर तुम्ही माझ्या पक्षावर आणि पक्षाच्या सर्वोच्च नेत्यावर टीका केली तर तुमच्या विरोधात बोलायला मुलाहिजा ठेवणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

Continue reading

‘बीएमसी’त इतिहास घडविणाऱ्या ‘मेट्रो वुमन’!

बीएमसीच्या म्हणजेच मुंबई महापालिकेच्या १३८ वर्षांच्या प्रदीर्घ इतिहासात आजपर्यंत आयुक्तपदावर कधीही महिला बसली नव्हती. मात्र, ३१ मार्च २०२६ हा दिवस त्या इतिहासाला कलाटणी देणारा ठरला. महाराष्ट्र सरकारने वरिष्ठ आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांची बीएमसी आयुक्तपदी नियुक्ती जाहीर केली. या...

श्रद्धा और सबुरी! दिल्लीहून शिर्डीला निघालेल्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग!!

दिल्लीहून शिर्डीच्या दिशेने निघालेल्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाला मंगळवारी खराब हवामानामुळे गुजरातमध्ये सूरत विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावी लागली. विमानात १५०पेक्षा जास्त प्रवासी होते. शिर्डी विमानतळावर जोरदार वारे आणि अत्यंत कमी दृश्यमानता असल्याने लँडिंग अशक्य झाल्यावर पायलटने विमान सुमारे एक तास...

अश्विनी भिडे झाल्या मुंबई महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त!

देशातील सर्वात मोठी आणि सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) आयुक्तपदी 'मेट्रो वुमन' म्हणून ओळख असलेल्या अश्विनी भिडे यांची नियुक्ती मंगळवारी जाहीर करण्यात आली. निवृत्त होत असलेले आयुक्त भूषण गागराणी यांच्याकडून भिडे यांनी पदभार स्वीकारला आहे....
Skip to content