Homeकल्चर +'के-पॉप'चे पुनरागमन! एप्रिलपासून...

‘के-पॉप’चे पुनरागमन! एप्रिलपासून ‘अरिरांग’ आणि कॉन्सर्टचे तब्बल ८२ शो!

जगप्रसिद्ध के-पॉप बँड बीटीएसचे सातही सदस्य- आरएम, जिन, सुगा, जे होप, जिमिन, व्ही आणि जंग कुक हे जवळपास चार वर्षांच्या खंडानंतर 21 मार्च रोजी सोलच्या ग्वानहवामुन चौकात एकत्र आले. त्यांनी ‘बीटीएस दी कमबॅक लाईव्ह अरिरांग’ या भव्य मोफत कॉन्सर्टने जगाला दणाणून सोडले. या एक तासाच्या कॉन्सर्टच्या एकच दिवस आधी प्रसिद्ध झालेला त्यांचा नवा अल्बम ‘अरिरांग’ पहिल्याच दिवशी तब्बल ४ कोटी (३.९८ मिलियन) प्रतींहून अधिक विकला गेला. चार वर्षांच्या गॅपनंतर एप्रिल २०२६ ते मार्च २०२७ दरम्यान ३४ देशांमध्ये या बॅण्डचे ८२ शोज नियोजित असून प्रत्येक ठिकाणी ५०,०००पेक्षा अधिक प्रेक्षकांची क्षमता असेल.

अरिरांग (ARIRANG) हे नाव कोरियाच्या शतकांपुरातन लोकगीतावरून घेतले असून ते उत्तर व दक्षिण कोरियाचे अनधिकृत राष्ट्रगीत मानले जाते, ज्याचा आशय आहे विरह, ओढ आणि शांत धैर्य. ग्वानहवामुन आणि जवळचा ग्योंगबोक राजवाडा यांनी या कॉन्सर्टला ऐतिहासिक पार्श्वभूमी दिली. मंचावर जांभळ्या, लाल व निळ्या प्रकाशझोतात न्हाऊन निघालेल्या राजवाड्याच्या भिंती पाहत हजारो चाहते “डायनामाईट” आणि “बटर”सारख्या जुन्या गाण्यांवर एकत्र गाऊ लागले. सदस्य जिन म्हणाले, “बुसानच्या शेवटच्या कॉन्सर्टमध्ये आम्ही तुम्हाला वाट पाहायला सांगितले होते. इथे आलात, याबद्दल खूप आभारी आहोत.”

अनिवार्य लष्करी सेवेमुळे चार वर्षे बँड बंद

बीटीएसची ही चार वर्षांची अनुपस्थिती दक्षिण कोरियाच्या अनिवार्य लष्करी सेवेमुळे होती, सगळ्यात शेवटी सुगा यांनी जून २०२५मध्ये सेवा पूर्ण केली. दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ली जे म्युंग यांनी या कार्यक्रमाबद्दल आनंद व्यक्त करत कोरियाच्या सांस्कृतिक ‘सॉफ्ट पॉवर’साठी हे महत्त्वाचे असल्याचे म्हटले. सुरक्षेसाठी ८,२०० कर्मचारी तैनात करण्यात आले होते. २०२२मध्ये इताइवॉनमधील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर सोल प्रशासन मोठ्या जनसमुदायाबाबत अत्यंत सावध झाले आहे.

टेलर स्विफ्टशी स्पर्धा करणारा जागतिक दौरा

आर्थिक दृष्टिकोनातून हे ‘BTSnomics’ च्या नव्या युगाची नांदी आहे. विश्लेषकांच्या अंदाजानुसार BTS च्या ‘ARIRANG’ वर्ल्ड टूरमधून तब्बल $ १.८ अब्ज (सुमारे १५,०० कोटी रुपये) उत्पन्न होण्याची शक्यता आहे. टेलर स्विफ्टच्या एरस टूर आणि कोड प्लेच्या म्युझिक ऑफ दी स्पिअर्स टूरशी तुलना होणारा हा के-पॉप इतिहासातील सर्वात मोठा दौरा ठरू शकतो. एप्रिल २०२६ ते मार्च २०२७ दरम्यान ३४ देशांमध्ये ८२ शोज नियोजित असून प्रत्येक ठिकाणी ५०,०००पेक्षा अधिक प्रेक्षकांची क्षमता असेल.

Continue reading

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...

आज व उद्या मुंबईतल्या काही इमारतीत वाजणार सायरन

नवी दिल्लीतल्या नागरी संरक्षण विभागाचे महासंचालकांच्या निर्देशानुसार दूरसंचार विकास केंद्र (सी-डॉट), सी-डॉट परिसर, मेहरौली, नवी दिल्ली येथील पथकाच्यावतीने मुंबईत प्रोटोटाइप सायरन उपकरणाची चाचणी आज आणि उद्या म्हणजेच ८ व ९ ऑक्टोबरला करण्यात येत आहे. बृहन्मुंबई शहरातील जुने सचिवालय, जोड...

मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेत केवल कुळकर्णी विजेता

मुंबईतल्या आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे एमएससी बँक पुरस्कृत मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेत शेठ करमशी कानजी इंग्लिश स्कूलचा केवल कुळकर्णी विजेता ठरला. अटीतटीच्या अंतिम आठव्या फेरीत डावाच्या मध्यापर्यंत १०-० अशी आघाडी घेणाऱ्या उमैर पठाणला...
Skip to content