Homeटॉप स्टोरीउद्धव-आदित्य ठाकरे रुजवताहेत...

उद्धव-आदित्य ठाकरे रुजवताहेत पॉप, पार्टी आणि पॉर्न संस्कृती!

छत्रपती शिवरायांच्या पवित्र भूमीमध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे पॉप, पार्टी आणि पॉर्न अशी नवी अश्लील संस्कृती रुजवायचा किळसवाणा उद्योग करत आहेत, असा आरोप भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आज मुंबईत एका पत्रकार परिषदेत केला. भाजपाचे माध्यम विभागप्रमुख नवनाथ बन, भाजपा महिला मोर्चा प्रदेश सचिव मृणाल पेंडसे यावेळी उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीतील प्रचारासाठी उबाठा शिवसेनेतर्फे बनविण्यात आलेल्या जाहिरातींमधून एक पॉर्न स्टारच जनतेला महिलांवरील अत्याचार कधी थांबणार, असा सवाल विचारत आहे. आपल्या प्रचारासाठी उबाठा शिवसेनेच्या या जाहिराती पाहून स्त्री, पत्नी, आई आणि मुलगी म्हणून माझी मान शरमेनं खाली झुकली गेली. उबाठाच्या निवडणूक प्रचाराची जाहिरात बनवणारी कंपनी, ठाकरे परिवार तसेच जाहिरातीमध्ये पित्याची भूमिका वठवणारा पॉर्न स्टार आणि उबाठा शिवसेना यांचा संबंध काय आहे याचे उत्तर ठाकरे यांनी महाराष्ट्राला द्यावे, अशी मागणी वाघ यांनी केली.

निवडणुकीच्या काळात आणि त्याआधीपासून उबाठा गटाचे नेते महिलांचा वारंवार अपमान करत आहेत. अमरावती येथील महायुतीच्या महिला उमेदवाराबाबत उबाठा नेत्यांनी कोणती भाषा वापरली हे महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यापुढे जाऊन उबाठा शिवसेनेच्या निवडणूक प्रचाराच्या जाहिरातीत उल्लू ॲप या अश्लील ॲपवरून लहान मुलींबरोबर अश्लील चित्रिकरण करणाऱ्या पॉर्नस्टारच्या माध्यमातून उबाठा गटाचा प्रचार केला जात आहे. जाहिरातीत पित्याची भूमिका करणारा पॉंर्नस्टार महिलांवरील अत्याचार कधी थांबणार असा प्रश्न विचारतो यासारखी महिलांची क्रूर चेष्टा कोणी केली नसेल. उद्धव ठाकरेंची वैचारिक पातळी इतकी घसरली आहे का, असा सवालही त्यांनी केला.

केंद्रातील मोदी सरकारने आधीच अनेक अश्लील ॲप्सवर बंदी घातली असून उल्लू ॲपवरही बंदी घालावी अशी मागणी वाघ यांनी केली. 

Continue reading

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...

आखाती देशांमध्ये उद्या साजरी होणार ईद!

संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि बहरीनसह अनेक आखाती देशांनी ईद-उल-फित्रच्या अधिकृत प्रारंभ तारखेची आज घोषणा केली. 30 दिवसांचा रमजान महिना पूर्ण झाल्याचे दर्शवणारा शव्वाल महिन्याचा चंद्र न दिसल्यामुळे, उद्या 20 मार्च, शुक्रवार रोजी ईद-उल-फित्र साजरी...

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...
Skip to content