Thursday, September 19, 2024
Homeब्लॅक अँड व्हाईटराडोची दोन नवीन...

राडोची दोन नवीन घड्याळे बाजारात

अत्यंत आनंदाच्या प्रसंगाची एखादी अविस्मरणीय आठवण आपल्याला हवी असते. स्विस घड्याळे बनवणारी आणि मास्टर ऑफ मटेरियल्स म्हणून प्रख्यात असलेली राडो कंपनी राडो कॅप्टन कूक हाय-टेक सिरॅमिक स्केलेटन आणि राडो सेंट्रिक्स ओपन हार्ट सुपर ज्युबिल ही दोन अफलातून घड्याळे घेऊन आली आहे, जी भेट म्हणून देण्यासाठी आदर्श आहेत. बॉलीवूडचे लाडके कलाकार हृतिक रोशन आणि कतरिना कैफ यांच्या  माध्यमातून ही घड्याळे सादर करण्यात आली आहेत. ही दोन्ही घड्याळे राडोची खास डिझाईन परंपरा, मटेरियल्स निपुणता आणि सर्जनशील महत्त्वाकांक्षा यांचे प्रतिनिधित्व करणारी आहेत.

राडोचे सीईओ अॅड्रियन बॉसहार्ड म्हणाले की, राडोमध्ये असे टाइमपीस बनवण्याचा आमचा प्रयत्न असतो, जे सामान्य अॅक्सेसरीजपेक्षा खूप वरचढ असतील- हे टाइमपीस जीवनातील सर्वात महत्त्वपूर्ण क्षणांचे प्रतीक आहेत. हृतिक रोशन आणि कतरिना कैफसारख्या दोन दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळणे हे आमचे सद्भाग्य आहे आणि हे कलाकार सहजपणे अभिव्यक्त करतात की, राडो कॅप्टन कूक हाय-टेक सिरॅमिक स्केलेटन आणि राडो सेंट्रिक्स ओपन हार्ट जुबिल आपल्या सर्वाधिक भावनात्मक प्रसंगांसाठी किती अनुरूप आहेत.

हृतिक रोशनने राडो कॅप्टन कूक हाय-टेक सिरॅमिक स्केलेटनचे अनावरण केले, जे पहिल्यांदाच रोझगोल्ड सजावटीसह मॅटब्लॅक मोनोब्लॉक केसमध्ये सादर करण्यात आले आहे. त्याच्या ब्लॅक टिन्टेड बॉक्स आकाराच्या सफायर क्रिस्टल आणि त्याहीपेक्षा त्याचे बोल्ड हात आणि इंडेक्स यांच्या माध्यमातून (ज्या सर्वांना काळ्या सुपर-लुमिनोवा सह रोझ गोल्ड रंग ब्रश केला आहे) त्याच्या राडो कॅलिबर आर ८०८ ऑटोमॅटिक मूव्हमेन्टची झलक बघता येते. त्यामध्ये रोझगोल्ड रंगाचा सेंटर व्हील ब्रिज आहे.

हृतिक रोशन म्हणाला की, राडो कॅप्टन कूक हाय-टेक सिरॅमिक स्केलेटन म्हणजे घड्याळे बनवण्याची परंपरा, कल्पक  मटेरियल्स आणि आधुनिक डिझाईन यांचा सुरेख संगम आहे. हे घड्याळ ते घालणाऱ्याला त्याच्या सर्वात मोठ्या गौरवपूर्ण सिद्धीची आठवण देण्यासाठी आणि साहसांमध्ये त्यांना साथ देण्यासाठी सज्ज आहे.

आपली शैली आणि डौल यांच्यासाठी प्रसिद्ध असलेल्या कतरिनाने व्यक्तिशः राडो सेंट्रिक्स ओपन हार्ट जुबिलचे उदाहरण प्रस्तुत केले. याच्या रोझगोल्ड रंगाच्या केसने आणि १२ डायमंड इंडेक्स असलेल्या डार्क ब्राऊन मदर ऑफ पर्ल डायलने राडो कॅलिबर आर७३४ ऑटोमॅटिक मूव्हमेंटचा व्ह्यू सुंदर रीतीने फ्रेम केला आहे. ही सुंदर पद्धतीने बनवलेली संरचना दोन विश्वांचा आनंद साजरा करते. जेव्हा हे घड्याळ भेटवस्तूच्या रूपात दिले जाते, तेव्हा ते जीवन आणि जीवनाला जिवंत करणाऱ्या अनमोल क्षणांचे प्रतीक बनते. मग त्यातून कोणत्याही सेलिब्रेशनची कहाणी सांगायची असो किंवा प्रेमाच्या मार्गावर चालायचे असो. डायलमधील अनोखा ऑर्गेनिक काँट्रास्ट, मूव्हमेंटवरील वर्तुळाकार ग्रेन डेकोरेशन आणि रोझगोल्ड रंगाच्या ब्रेसलेटमध्ये हाय-टेक सिरॅमिक लिंकसारख्या गोष्टी प्रत्येक वापरकर्त्याच्या प्रवासाची सार्थकता अधिक चांगल्या पद्धतीने व्यक्त करतात.

कतरिना कैफ म्हणाली की, राडो सेंट्रिक्स ओपन हार्ट जुबिल केवळ लक्झरी, शालीनता आणि स्टाइलचे प्रतीक नाही, तर ती एक कलाकृती आहे. त्यामुळे अत्यंत आनंदाच्या आणि चिरस्मरणीय क्षणी ती आदर्श भेटवस्तू ठरू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

होंडा एलीव्‍हेटची नवीन अॅपेक्‍स एडिशन लाँच

होंडा कार्स इंडिया लि. (एचसीआयएल) या भारतातील आघाडीच्‍या प्रीमियम कार उत्‍पादक कंपनीने सुरू असलेल्‍या द ग्रेट होंडा फेस्‍टच्‍या फेस्टिव्‍ह मोहिमेदरम्‍यान त्‍यांची लोकप्रिय मध्‍यम आकाराची एसयूव्‍ही होंडा एलीव्‍हेटची नवीन अॅपेक्‍स एडिशन लाँच केली आहे. मर्यादित युनिट्ससह अॅपेक्‍स एडिशन मॅन्‍युअल ट्रान्‍समिशन (एमटी)...

मोटोरोलाने लाँच केला ‘रेडी फॉर एनीथिंग’!

मोबाईल तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण संशोधनात जागतिक स्तरावर अग्रेसर असलेल्या मोटोरोलाने भारतात motorola edge50 Neo नुकताच सादर केला. मोटोरोलाच्या प्रीमियम एज स्मार्टफोन लाइनअपमध्ये सर्वात नवीन भर घालण्यात आली आहे, ज्यात शक्तिशाली वैशिष्ट्यांसह आकर्षक, कमीतकमी डिझाइनचा समावेश आहे. ज्यात 'रेडी फॉर एनीथिंग' ही टॅगलाइन समाविष्ट आहे. हे उपकरण जास्तीतजास्त...

‘वन नेशन, वन इलेक्शन’ला मोदी कॅबिनेटची मान्यता!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत (कॅबिनेट) 'वन नेशन, वन इलेक्शन' संकल्पनेच्या मसुद्याला मान्यता देण्यात आली. केंद्रीय कॅबिनेटने याला मंजुरी दिल्यामुळे संसदेच्या शीतकालीन अधिवेशनात संबंधित विधेयक मांडण्यात येईल आणि शक्य झाले तर ते...
error: Content is protected !!
Skip to content