Homeचिट चॅटदोन नवीन इलेक्ट्रिक...

दोन नवीन इलेक्ट्रिक दुचाकी बाजारात!

शेमा इलेक्ट्रिक ह्या ओदिशामधील युवा मेक इन इंडिया ईव्ही उत्पादक कंपनीने ईव्ही इंडिया एक्स्पो 2021मध्ये आपल्या इलेक्ट्रिक दुचाकींच्या आकर्षक श्रेणीचे नुकतेच सादरीकरण केले. ह्या ब्रँडला त्यांच्या एसईएस टफ (उच्च गती)आणि एसईएस हॉबी (कमी गती) ह्यांच्या शुभारंभानंतर ब्रँडचे अनेक दर्शकांनी कौतुक केले. तसेच, कमी‌ वेगाच्या प्रकारामधील त्यांच्या उत्पादनांची संपूर्ण उपलब्ध श्रेणी- एसईएस झूम, एसईएस बोल्ड, एसईएस ईगल आणि एसईएस टफ ह्या श्रेणीतील उत्पादनांचेही त्यांचे अद्ययावत तंत्रज्ञान आणि शैलीदार डिझाईन ह्यामुळे कौतुक झाले.

एसईएस टफ (उच्च गती): बीटूबी प्रकारासाठी उच्च गतीची दुचाकी ब्रँडने समोर आणली आहे. ह्या बहुउपयोगी इलेक्ट्रिक बाईकची गती 60 किमी प्रति तास असेल व ती 150 किलो वजनासह 150 किमी/ तास गती घेऊ शकते. एसईएस टफला एक ड्युअल 60 व्ही 30 एएच लिथियम डिटॅचेबल बॅटरीने सक्षम केलेले आहे.

एसईएस हॉबीह्या ब्रँडचे हे दुसरे उत्पादन 100% भारतीय बनावटीची ई स्कूटर एसईएस हॉबी, हे आहे. त्यामध्ये 25 किमी/ तास ही सर्वाधिक गती मिळते व एका चार्जवर ती 100 किलोमीटर जाते. आकर्षक शैली आणि उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानासह ह्या उत्पादनाचे उपस्थितांनी कौतुक केले. एसईएस हॉबीमध्ये 60 व्ही आणि 30 एएच डिटॅचेबल बॅटरी आहे. पूर्ण चार्ज होण्यासाठी 4 तास लागतात.

सध्या ब्रँडची कमी गतीच्या ई स्कूटर प्रकारामध्ये 05 उत्पादने आहेत व एक उच्च गतीच्या फेम- II प्रकारातील उत्पादन आहे.

ह्या नवीन उत्पादनाच्या शुभारंभाबद्दल बोलताना, शेमा इलेक्ट्रीकचे संस्थापक आणि सीओओ योगेश कुमार लाथ ह्यांनी म्हटले की, “भारतामध्ये ईव्ही मार्केट नवीन आहे आणि देशाने ह्याबाबतीत खूप मोठी उद्दिष्टे ठेवली आहेत. ते साध्य करण्यासाठी आवश्यक आहे की, सर्व घटकांनी सर्वंकष विकासासाठी सक्रिय प्रकारे त्यात सहभाग घेतला पाहिजे. आम्ही ग्राहकांच्या अपेक्षा व गरजा लक्षात घेऊन सकारात्मक प्रकारे ईव्ही दुचाकींचे उत्पादन करत आहोत. आम्ही ह्या उत्पादनांमध्ये नावीन्यपूर्णता आणणे व त्यांना आणखी प्रगत करणे सुरू ठेवू व दुसऱ्या बाजूला आमच्या आउटरीचमध्येही विस्तार करू. ह्या आर्थिक वर्षाच्या शेवटी आम्ही बाजारामध्ये 2-3 नवीन उच्च गतीची उत्पादने सुरू करू आणि पूर्ण भारतामध्ये आमचे 100पेक्षा जास्त वितरक असतील.”

शेमा इलेक्ट्रिकचे सध्या 75 वितरक आहेत व ह्या ब्रँडची 13 राज्यांमध्ये उपस्थिती ‌आहे. भारतातील सर्वांत प्रमुख बाजारपेठ असलेल्या राजस्थान, पंजाब, हरयाना, केरळ व कर्नाटक, गुजरातमध्ये पुढील 6 महिन्यांमध्ये जाळे निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, असेही त्यांनी सांगितले.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content