Friday, November 8, 2024
Homeएनसर्कलटीसीआयने पहिल्या तिमाहीत...

टीसीआयने पहिल्या तिमाहीत नोंदवली दमदार कामगिरी

ट्रान्‍सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. (टीसीआय), या भारतातील आघाडीच्‍या एकीकृत पुरवठा साखळी व लॉजिस्टिक्‍स सोल्‍यूशन्‍स प्रदाता कंपनीने ३० जून २०२४ रोजी समाप्‍त झालेल्‍या पहिल्‍या तिमाहीच्‍या आर्थिक निकालांची नुकतीच घोषणा केली. टीसीआयने गेल्‍या वर्षातील याच कालावधीमधील ८८७५ दशलक्ष रूपयांच्‍या तुलनेत १०.९ टक्‍क्‍यांच्‍या वाढीसह ९८४४ दशलक्ष रूपये स्‍वतंत्र महसूलाची नोंद केली. कंपनीचे अर्निंग्‍ज बिफोर इंटरेस्‍ट, टॅक्‍सेस्, डेप्रीसिएशन अँड अमोर्टायझेशन (ईबीआयटीडीए) आर्थिक वर्ष २०२४च्‍या पहिल्‍या तिमाहीमधील १२४४ दशलक्ष रूपयांच्‍या तुलनेत १६.७ टक्‍क्‍यांनी वाढून १४५२ दशलक्ष रूपये राहिले. कंपनीचा करोत्तर नफा गेल्‍या वर्षातील संबंधित तिमाहीमधील ८३३ दशलक्ष रूपयांच्‍या तुलनेत २६.३ टक्‍क्‍यांनी वाढून १०५२ दशलक्ष रूपयांपर्यंत पोहोचला.

ट्रान्‍सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.चे व्‍यवस्‍थापकीय संचालक विनीत अग्रवाल म्‍हणाले की, आम्‍ही आर्थिक वर्ष २०२४-२०२५च्‍या पहिल्‍या तिमाहीत प्रबळ कामगिरी केली आहे. विविध उद्योगक्षेत्रांना सेवा देणाऱ्या आमच्‍या सेवा विभागांनी, विशेषत: कोस्‍टल शिपिंग, रेल मल्‍टीमोडल सोल्‍यूशन्‍स, ३पीएल/वेअरहाऊसिंग आणि कोल्‍ड चेन लॉजिस्टिक्‍स यांनी उत्तम प्रगती केली आहे. आमचे ग्राहकांना मूल्‍यवर्धित आणि तंत्रज्ञानदृष्‍ट्या प्रगत सानुकूल ऑफरिंग्‍ज देण्‍यावर लक्ष केंद्रित आहे.

टीसीआय

टीसीआय रेल आणि कोस्‍टल मल्‍टीमोडल असेट्स अँड नेटवर्क्‍समधील गुंतवणूकीच्‍या माध्‍यमातून नाविन्‍यता आणण्‍यासोबत शाश्‍वत सोल्‍यूशन्‍स विकसित करत आहे. आम्‍ही बीएस-६ वाहनांचा आमचा ताफा वाढवत आणि इलेक्ट्रिक, सीएनजी व एलएनजी अशा पर्यायी इंधनांचा अवलंब करत ग्राहकांना त्‍यांची जीएचजी उत्‍सर्जन कमी करण्‍यास सक्षम करत आहोत. केंद्रीय अर्थसंकल्‍पाने नॅशनल लॉजिस्टिक्‍स पॉलिसीमध्‍ये दृष्टिकोन ठेवल्‍याप्रमाणे लॉजिस्टिक्‍स क्षेत्राच्‍या विकासासाठी सुस्‍पष्‍ट आराखडा तयार केला आहे. टीसीआय वेअरहाऊसेस्, यार्ड्स अशा महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांमध्‍ये गुंतवणूक करत आहे आणि मागणीची पूर्तता करण्‍यासाठी ई-वेबिल्‍स व फास्‍टटॅगमधील मोठ्या डेटाचा फायदा घेत आहेत तसेच ग्राहकांसाठी लॉजिस्टिक्‍स कार्यक्षमतेमध्‍ये वाढ करत आहे, असेही त्यांनी सांगितले.

मल्‍टीमोडल क्षमतांना चालना देण्‍यासाठी कंपनीने ३८.८० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्‍या एकूण करार किंमतीसाठी दोन ७३०० मेट्रिक टन डेड वेट क्षमतेचे सेल्‍युलर कंटेनर वेसल्‍स निर्माण करण्‍याच्‍या ऑर्डर्स दिल्‍या आहेत. २०२६च्‍या अखेरपर्यंत शिप्‍स वितरित होण्‍याची अपेक्षा आहे.     

Continue reading

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत ३०५ कोटींची मालमत्ता जप्त

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ व मौल्यवान धातू असा एकूण ३०४ कोटी ९४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. सोबत:...

८ नोव्हेंबरपासून ‘वर्गमंत्री’ आपल्या भेटीला!

राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच आता शाळेतील 'वर्गमंत्री'वर निवडणुकीचा कल्ला होणार आहे. आघाडीचे मराठी कन्टेट क्रिएटर खास रे टीव्ही यांच्यातर्फे वर्गमंत्री, या वेब सीरिजची निर्मिती करण्यात आली असून, अक्षया देवधर, अविनाश नारकर, नेहा शितोळे यांच्यासह उत्तमोत्तम स्टारकास्ट या...

मुंबई जिल्हा कॅरम संघटनेवर पुन्हा प्रदीप मयेकर

मुंबई जिल्हा कॅरम असोसिएशनची त्रैवार्षिक निवडणूक दादर येथील एल. जे. ट्रेनिंग सेंटर येथे नुकतीच पार पडली. या निवडणुकीत प्रदीप मयेकर यांची मानद अध्यक्ष म्हणून तर अरुण केदार यांची मानद सरचिटणीस म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. बिनविरोध झालेल्या या निवडणुकीत...
Skip to content