Thursday, October 10, 2024
Homeमुंबई स्पेशलउद्या आणि परवा...

उद्या आणि परवा द. मध्य तसेच दक्षिण मुंबईत पाणीपुरवठा विस्कळीत

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ई विभागातील पाणीपुरवठा सुव्यवस्थित करण्याकरिता नवानगर, डॉकयार्ड रोड येथे असलेली जुनी १२०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनी बंद करुन तेथे नवीन १२०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यासाठी भंडारवाडा जलाशयाला जाणाऱ्या जुन्या १२०० मि.मी. च्या जलवाहिनीवर जलद्वार बसविण्याचे काम बुधवार, दिनांक १७ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजेपासून ते गुरुवार, दिनांक १८ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजेपर्यंत एकूण २४ तासांसाठी हाती घेण्यात येणार आहे. या कामाच्या कालावधीत ए, बी आणि ई विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा २४ तास बंद राहणार आहे. तर जे. जे. रुग्णालय परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

सदर परिसरांचा तपशील खालीलप्रमाणे आहेः 

१) ए विभाग- नेव्हल डॉकयार्ड सप्लाय – सेंट जॉर्ज हॉस्पिटल, पी. डिमेलो रोड, रामगड झोपडपट्टी, आर. बी आय., नेव्हल डॉकयार्ड, शहीद भगतसिंग मार्ग, जी. पी. ओ. जंक्शनपासून रिगल सिनेमापर्यंत – (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी १.३० ते सायंकाळी ४.१५ आणि रात्री ९.३० ते मध्यरात्री १.००) – दिनांक १८ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.

२) ई विभाग– नेसबीट  झोन (१२०० मि.मी. आणि ८०० मि.मी.) – ना. म. जोशी मार्ग, मदनपुरा, कामाठीपुरा, एम. एस. अली मार्ग, एम. ए. मार्ग, आग्रीपाडा, टँक पाखाडी मार्ग, क्लेअर रोड, सोफिया जुबेर मार्ग, भायखळा (पश्चिम) (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ पहाटे ४.०० ते सकाळी ६.३०) – दिनांक १८ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.

म्हातारपाखाडी रोड झोन- म्हातारपाखाडी मार्ग, सेंट मेरी रोड, नेसबीट रोड, ताडवाडी  रेल्वे  कुंपण (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी ६.३० ते सकाळी ८.१५) – दिनांक १८ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.

डॉकयार्ड  रोड  झोन- बॅ. नाथ पै मार्ग, डिलिमा स्ट्रीट, गनपावडर रोड, कासार गल्ली, लोहारखाता, कॉपरस्मिथ मार्ग (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी १२.२० ते दुपारी २.५०) – दिनांक १७ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.

हातीबाग मार्ग- हातीबाग, शेठ मोतिशहा लेन, डि. एन. सिंघ  मार्ग – (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी ३.२० ते सायंकाळी ५.००) – दिनांक १७ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.

जे. जे. रुग्णालय– (२४ तास पाणीपुरवठा) – कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.

मुंबई पोर्ट ट्रस्ट झोन- मुंबई पोर्ट ट्रस्ट, दारुखाना – (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ४.४५ ते सायंकाळी ५.५५) – दिनांक १७ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.

रे रोड  झोन- बॅ. नाथ पै मार्ग, मोदी कुंपण, ऍटलास मिल कुंपण, घोडपदेव छेद गल्ली क्रमांक १-३ (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ७.०० ते रात्री ८.१५) – दिनांक १७ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.

माऊंट मार्ग- रामभाऊ भोगले मार्ग, फेर बंदर नाका, वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान,  घोडपदेव नाका, म्हाडा संकुल, भायखळा  (पूर्व), शेठ मोतिशहा लेन, टी. बी. कदम मार्ग, संत सावता मार्ग (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ७.१५ ते रात्री ९.००) – दिनांक १७ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.

३) बी विभाग– बाबूला  टँक  झोन – मोहम्मद अली मार्ग, इब्राहिम रहिमत्तुला मार्ग, इमामवाडा मार्ग, इब्राहिम मर्चंट मार्ग, युसूफ मेहेर अली  मार्ग – (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ पहाटे ४.४० ते सकाळी ६.१०) – दिनांक १८ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.

डोंगरी बी– झोन – नूरबाग, डोंगरी, रामचंद्र भट मार्ग, सॅम्युअल रस्ता, केशवजी नाईक मार्ग, नरसी नाथा रस्ता – (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ पहाटे ४.४० ते सकाळी ६.१०) – दिनांक १८ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.

डोंगरी ‘ए’ झोन- उमरखाडी, वालपाखाडी, रामचंद्र भट मार्ग, समाताभाई नानजी मार्ग, शायदा मार्ग, नूरबाग आणि डॉ . महेश्वरी मार्ग – (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ रात्री ८.३० ते रात्री १०.००) – दिनांक १७ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.

मुंबई पोर्ट ट्रस्ट झोन- सर्व मुंबई पोर्ट ट्रस्ट झोन, पी. डिमेलो मार्ग – (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ४.३० ते सायंकाळी ६.३० आणि रात्री ११.३० ते मध्यरात्री २.००) – दिनांक १७ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.

मध्म रेल्वे– रेल्वे यार्ड (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ७.०० ते रात्री ८.००) – दिनांक १७ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.

वाडी बंदर- पी. डिमेलो रोड, नंदलाल जैन मार्ग, लीलाधर शाह मार्ग, दानाबंदर, संत तुकाराम मार्ग – (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ४.२० ते सायंकाळी ५.३०) – दिनांक १७ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.

वाडी बंदर- पी. डिमेलो मार्ग – (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ७.१५ ते रात्री ८.००) – दिनांक १७ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.

आझाद मैदान बुस्टींग- (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ पहाटे ४.४० ते सकाळी ६.००) – दिनांक १७ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.

संबंधित परिसरातील नागरिकांना विनंती करण्यात येते की, कृपया पाण्याचा पुरेसा साठा करुन ठेवावा, दिनांक १७ व १८ जानेवारी २०२४ रोजी पाणी जपून वापरावे आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. 

Continue reading

माझी माऊली चषक कॅरम स्पर्धेत वेदांत राणे विजेता

 मुंबईतल्या सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळ - जेजे व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित माझी माऊली चषक आंतरशालेय विनाशुल्क कॅरम स्पर्धेचे विजेतेपद युनिव्हर्सल स्कूल-दहिसरच्या वेदांत राणेने पटकाविले. अतिशय चुरशीच्या अंतिम सामन्यात अचूक फटक्यांची आतषबाजी करीत वेदांत राणेने प्रारंभी ७-० अशी मोठी...

राज्यपालांच्या हस्ते अभिनेते प्रेम चोप्रा सन्मानित

महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते काल विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना भारतरत्न डॉ.आंबेडकर पुरस्कार प्रदान करण्यात आले. मुंबईतील इस्कॉन सभागृहात झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात राज्यपालांच्या हस्ते प्रसिद्ध चित्रपट अभिनेते प्रेम चोप्रा यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्यपालांच्या हस्ते आमदार डॉ....

शेख, नंदिनी, तन्मय, वैभवी, मयुर, काजल ठरले सर्वोत्तम लिफ्टर

महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनने ज्ञानेश्वर विद्यालय, वडाळा, मुंबई येथे आयोजित केलेल्या राज्य बेंचप्रेस स्पर्धेत क्लासिक गटात शेख समीर, नंदिनी उपर, तन्मय पाटील, वैभवी माने, मयुर शिंदे, काजल भाकरे यांनी आपापल्या गटात सर्वोत्तम लिफ्टरचा किताब संपादन केला. आमदार कालिदास  कोळंबकर यांच्या हस्ते...
Skip to content