Homeचिट चॅटदेसाई स्मृती कबड्डीत...

देसाई स्मृती कबड्डीत रिझर्व्ह बँकेची थरारक सलामी

प्रो कबड्डीच्या समाप्तीनंतर प्रभादेवीत सुरू झालेल्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या राजाभाऊ देसाई स्मृती चषकानिमित्त विशेष व्यावसायिक गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत रिझर्व्ह बँकने मिडलाईन अ‍ॅकेडमी स्पोर्ट्सवर थरारक मात करत विजयी सलामी दिली. त्याचप्रमाणे युनियन बँक, ठाणे महानगरपालिका आणि मुंबई बंदरनेही एकतर्फी सामन्यात सहजसुंदर विजयासह आपल्या गुणांचे खाते उघडले.

कबड्डीला आक्रमक करण्यासाठी आगळीवेगळी बक्षिसे ठेवलेल्या या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा शिवेसना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अनंत गिते, दिवाकर रावते, विभागप्रमुख आणि मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. रामदार गावकर आणि प्रमुख कार्यवाह महेश सावंत, क्रीडाप्रमुख चंद्रशेखर राणे, स्पर्धाप्रमुख रवी शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. स्पर्धेच्या प्रारंभीच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, विभागाचे आमदार-खासदार आणि मुंबईचे महापौर भूषविलेल्या मनोहर जोशी यांना सर्व कबड्डीपटू आणि कबड्डीप्रेमींनी आदरांजली वाहिली.

प्रभादेवीच्या चवन्नी गल्लीत सीताराम चव्हाण क्रीडा नगरीत मिडलाईन अ‍ॅकॅडमी आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्यात खेळला गेलेला सामना कमालीचा चित्तथरारक झाला. डावाच्या पहिल्या चढाईपासून दोघांमध्ये गुण मिळवण्यासाठी सुरू झालेली चढाओढ अखेरच्या चढाईपर्यंत दिसली. कासार आणि राक्षे यांच्या यशने उत्कृष्ट चढाया करत आरबीआयला १७-१३ अशी ४ गुणांची आघाडी मिळवून दिली. मिडलाईनच्या आदी तिथे आणि ऋषिकेश गागरे यांनी आरबीआयच्या गुणांची बरोबरी साधण्यासाठी जोरदार खेळ केला. उत्तरार्धात चढाई-पकडींचा खेळ चांगलाच रंगला होता. पण अखेर आरबीआयनेच ३६-३२ अशी सरशी घेत विजयी सलामी दिली.

ठाणे महानगरपालिका (टीएमसी) आणि रायगडच्या जेएसडब्ल्यू यांच्यातील लढत कबड्डीप्रेमींना थराराची मेजवानी देऊ शकली नाही. टीएमसीच्या जावेद, अनिकेत माने, विघ्नेश आणि मनोज बोंद्रे यांच्या खेळापुढे जेएसडब्ल्यूच्या खेळाडूंचे काहीएक चालले नाही. एकतर्फी आणि निरस लढतीत टीएमसीने जेएसडब्ल्यूवर चक्क चार लोण चढवत ४८- १७ असा दणदणीत विजय मिळविला.

युनियन बँक आणि सेंट्रल बँकेतील लढतही अत्यंत कंटाळवाणी झाली. सामन्याच्या पहिल्या चढाईपासून युनियन बँकेने घेतलेली आघाडी त्यांनी शेवटपर्यंत कायम राखली. आदित्य चोगले आणि आदित्य शिंदे यांनी केलेल्या खेळाने पहिल्या डावातच सेंट्रल बँकेवर दोन लोण चढवत २६-१० अशी निर्विवाद आघाडी घेतली. युनियन बँकेच्या झंझावातापुढे सेंट्रल बँकेचा जराही निभाव लागला नाही. परिणामी हा सामना ४५-२६ असा संपला. न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स आणि मुंबई बंदर (एमपीटी) यांच्यात झालेला सामना एमपीटीने ४३-३१ असा सहज जिंकला.

Continue reading

काँग्रेस सेवादल सुरू करणार प्रत्येक गावात केंद्र

काँग्रेस सेवादल प्रत्येक गावात सेवादल केंद्राची स्थापना करणार आहे. मंगळवारी वसई-विरार जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निवासी प्रशिक्षण शिबिरात हा निर्णय घेण्यात आला. पहिल्या दिवशी सकाळी वसई विरार जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष ओनिल आल्मेडा यांच्या हस्ते ध्वजारोहण...

मंगोलियात जाणार सारिपुत्र आणि मौद्गल्यायन यांचे पवित्र अवशेष

भारत आणि  मंगोलिया यांच्यातील संबंध केवळ राजनैतिक नाहीत. ते भावनिक आणि आध्यात्मिक बंध आहेत. अनेक शतकांपासून दोन्ही देश बौद्धतत्त्वाच्या सूत्रामध्ये बांधले गेले आहेत. या कारणामुळे आपल्याला आध्यात्मिक बंधू असेही संबोधले जाते. आज या परंपरेला अधिक दृढ करण्यासाठी आणि या...

‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ सर्वोत्कृष्ट!

महाराष्ट्रातील प्रतिष्ठित एकांकिका स्पर्धांपैकी एक असलेल्या 'दाजीकाका गाडगीळ करंडक २०२५'चा अंतिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. पी. एन. जी. ज्वेलर्स प्रस्तुत या स्पर्धेत राज्यभरातील १२१ एकांकिकांमधून निवडलेल्या अंतिम फेरीतल्या १६ सर्वोत्कृष्ट कलाकृतींनी दमदार सादरीकरण केले. या वर्षी चुरशीच्या लढतीत...
Skip to content