Homeचिट चॅटविजय मडव यांना...

विजय मडव यांना यंदाचा शारदा पुरस्कार

प्रख्यात साहित्यिक विजय मडव यांना यंदाचा शारदा पुरस्कार देण्यात येणार असून जय महाराष्ट्र नगर भूषण पुरस्कार मागाठाणे मित्र मंडळाचे खंदे कार्यकर्ते दिलीप चव्हाण आणि वसंत सावंत यांना देण्यात येणार आहे.

मुंबई उपनगरातील रसिक श्रोत्यांना अविरत बौद्धिक मेजवानी उपलब्ध करून देणारे ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांनी यंदाच्या ४२व्या वर्षीच्या जय महाराष्ट्र नगर, बोरीवली पूर्व येथील वसंत व्याख्यानमालेत सालाबादप्रमाणे देण्यात येणारे शारदा पुरस्कार आणि जय महाराष्ट्र नगर भूषण पुरस्कार यांच्या नावांची घोषणा केली असून या वर्षापासून प्रेरणा पुरस्कारही देण्याचेही जाहीर केले.

यंदाचा पहिलावहिला प्रेरणा पुरस्कार विजय घरटकर यांना देण्यात येणार आहे. वायंगणकर साई स्पोर्ट्सच्या मल्लखांबपटू हर्षिता वायंगणकर हिने राष्ट्रीय स्तरावरील विद्यापीठ स्पर्धेत अभिमानास्पद यश संपादन केले असून या तिच्या यशाबद्दल तिलाही सन्मानित करण्यात येणार आहे. रविवारी, २६ मे रोजी प्रमुख अतिथींच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक विजय वैद्य आणि  प्रा. नयना रेगे यांनी दिली.

Continue reading

मंगोलियात जाणार सारिपुत्र आणि मौद्गल्यायन यांचे पवित्र अवशेष

भारत आणि  मंगोलिया यांच्यातील संबंध केवळ राजनैतिक नाहीत. ते भावनिक आणि आध्यात्मिक बंध आहेत. अनेक शतकांपासून दोन्ही देश बौद्धतत्त्वाच्या सूत्रामध्ये बांधले गेले आहेत. या कारणामुळे आपल्याला आध्यात्मिक बंधू असेही संबोधले जाते. आज या परंपरेला अधिक दृढ करण्यासाठी आणि या...

‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ सर्वोत्कृष्ट!

महाराष्ट्रातील प्रतिष्ठित एकांकिका स्पर्धांपैकी एक असलेल्या 'दाजीकाका गाडगीळ करंडक २०२५'चा अंतिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. पी. एन. जी. ज्वेलर्स प्रस्तुत या स्पर्धेत राज्यभरातील १२१ एकांकिकांमधून निवडलेल्या अंतिम फेरीतल्या १६ सर्वोत्कृष्ट कलाकृतींनी दमदार सादरीकरण केले. या वर्षी चुरशीच्या लढतीत...

अध्यात्मशास्त्र दीपावलीचे!

अज्ञानाच्या अंधःकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी! दिवाळी हा शब्द दीपावली या शब्दापासून बनला आहे. दीपावली हा शब्द दीप + आवली (रांग, ओळ) असा बनला आहे. त्याचा अर्थ आहे, दिव्यांची रांग किंवा ओळ. दिवाळीला सर्वत्र दिवे लावतात. चौदा...
Skip to content