तुमच्या घराचा हॉल ‘पूलसाईड’ हवा असे वाटते ना? मग आमच्यकडेच या… अशा आशयाची जाहिरात अलीकडेच एका अग्रगण्य इंग्रजी दैनिकात आली होती. लोढा बिल्डरची जाहिरात वाचून मी लगेचच गेल्या दोन वर्षांच्या पावसाळी मोसमात जाऊन पोहोचलो. तर काय गमंत.. डोंबिवलीतल्या पलावा फेज एकच्या अनेक इमारती डोळ्यासमोरून गेल्याच. येथेच तर जोरदार पावसात चक्क दीड-दोन मजल्यापर्यंत पावसाचे पाणी तुंबून संपूर्ण पलावा सिटी पाण्याखाली गेली होती. हे आठवून मला दरदरून घाम सुटला आणि मी जागा झालो!
या बिल्डरविरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही कारवाई करतात की नाही हेच आता पाहायचे आहे. (मुख्यमंत्री कारवाई करणार नाहीतच हे शेम्बडं पोरही सांगेल.) मात्र, अशी टीका झाल्यावर म्हणून या जाहिरातीचा खर्च करणाऱ्यावर मात्र बिल्डर निश्चितच कारवाई करतील हे मात्र लिहून ठेवा. बिल्डरची कारवाई म्हणजे जाहिरात कंपनीचे लाखो रुपयांचे बिल थकवणे!!