Homeकल्चर +'मेट गाला'मध्ये झाली...

‘मेट गाला’मध्ये झाली सर्वात वाईट पोशाखाचीच चर्चा!

एआय वधू येत आहे का? असा प्रश्न पडावा. कॅटी पेरीने आपला चेहरा रोबोटसारख्या दिसणाऱ्या चंदेरी मास्कने पूर्णपणे झाकला होता आणि त्यावर तिने खांद्याविना, मोठा चौकोनी गळा असलेला पांढरा रेशमी गाऊन परिधान केला होता. पांढऱ्या सॅटिन ऑपेरा ग्लोव्हज घालून तिने आपला हा लूक पूर्ण केला. यंदा मेट गाला २०२६मधील सर्वात वाईट पोशाख केला कायली जेनर आणि कॅटी पेरी यांनी. रेड कार्पेटवर विचित्र पोशाख घालून त्यांनी सर्वांना धक्का दिला.

दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या सोमवारी न्यूयॉर्कमधील ‘मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट्स’च्या पायऱ्यांवर फॅशन जगतातील सर्वात मोठा उत्सव रंगतो, ज्याला आपण ‘मेट गाला’ म्हणून ओळखतो. या वर्षीही या रेड कार्पेटवर भारतीय सौंदर्याने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. ऑस्कर किंवा फिल्मफेअरपेक्षा वेगळ्या असणाऱ्या या सोहळ्यात भारतीय तारे नक्की का जातात आणि तिथे नेमके काय घडते? याबाबत बरीच उत्सुकता आहे. ‘मेट गाला’ हा भारतीय कलाकारांसाठी केवळ फॅशनचा सोहळा नसून, जागतिक स्तरावर भारताची ‘सॉफ्ट पॉवर’ आणि ‘ब्रँड व्हॅल्यू’ वाढवण्याचे एक महत्त्वाचे व्यासपीठ बनले आहे.

मेट गाला म्हणजे नेमके काय?

मेट गाला हा केवळ एक फॅशन शो नसून तो एक चॅरिटी इव्हेंट (फंडरेझर) आहे. न्यूयॉर्कमधील ‘कॉस्च्युम इन्स्टिट्यूट’साठी निधी गोळा करणे हा याचा मुख्य उद्देश असतो. दरवर्षी या सोहळ्यासाठी एक विशिष्ट ‘थीम’ दिली जाते आणि जगातील दिग्गज कलाकार त्या थीमनुसार पेहराव करून तिथे उपस्थित राहतात.

भारतीय कलाकार ‘मेट गाला’ला का जातात?

१. जागतिक ब्रँडचे प्रतिनिधित्व:
भारतीय स्टार्स आता केवळ बॉलीवूडपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. प्रियांका चोप्रा, आलिया भट्ट आणि दीपिका पदुकोण यांसारखे कलाकार ‘लुई विट्टों’ किंवा ‘गुची’सारख्या आंतरराष्ट्रीय ब्रँडचे ग्लोबल अ‍ॅम्बेसेडर आहेत. या ब्रँड्सना भारतीय बाजारपेठेत आपली पकड मजबूत करायची असते, त्यामुळे ते आपल्या भारतीय चेहऱ्यांना या जागतिक मंचावर उतरवतात.

२. भारतीय फॅशन आणि डिझाइनचे प्रमोशन:
पूर्वी केवळ पाश्चात्य डिझाइनर्सचे वर्चस्व असलेल्या या सोहळ्यात आता सव्यसाची, गौरव गुप्ता किंवा राहुल मिश्रा, यांसारख्या भारतीय डिझाइनर्सनी आपली जागा निर्माण केली आहे. भारतीय हस्तकला आणि संस्कृती जगासमोर नेण्यासाठी हे कलाकार एक माध्यम ठरतात.

३. हॉलीवूड आणि ग्लोबल मार्केटमध्ये ओळख:
प्रियांका चोप्रासारख्या अभिनेत्रींनी हॉलिवूडमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केल्यामुळे तिला दरवर्षी आमंत्रित केले जाते. भारतीय कलाकारांसाठी मेट गाला म्हणजे जागतिक स्तरावरील निर्माते, दिग्दर्शक आणि जागतिक फॅशन आयकॉन्सशी संवाद साधण्याची एक सुवर्णसंधी असते.

४. भारतीय लक्झरी मार्केटचा प्रभाव:
जगातील मोठ्या फॅशन हाऊसेससाठी भारत ही एक खूप मोठी बाजारपेठ आहे. जेव्हा एखादा भारतीय स्टार मेट गालामध्ये चमकतो, तेव्हा त्याचा प्रभाव भारतातील कोट्यवधी तरुणांवर पडतो, ज्याचा फायदा या ब्रँड्सना व्यावसायिकदृष्ट्या होतो.

या सोहळ्यात नक्की काय होते?

  • रेड कार्पेट: सर्वसामान्यांना केवळ हे रेड कार्पेटच पाहायला मिळते, जिथे कलाकार त्यांच्या अतरंगी आणि कल्पक फॅशनचे प्रदर्शन करतात.
  • सीक्रेट डिनर: रेड कार्पेटनंतर आतमध्ये एक भव्य डिनर आणि म्युझिकल परफॉर्मन्स असतो. विशेष म्हणजे, आतमध्ये काय चालते याचे फोटो काढण्यास किंवा सोशल मीडियावर पोस्ट करण्यास सक्त मनाई असते.
  • प्रचंड खर्च: या सोहळ्याच्या एका तिकिटाची किंमत लाखो रुपयांत असते आणि फक्त निमंत्रण असलेल्या व्यक्तींनाच प्रवेश मिळतो.

Continue reading

हुडकेश्वरमध्ये मुलीवर झालेल्या अत्याचाराची व्याप्ती वाढवा!

नागपूरमधील हुडकेश्वर पोलीसठाण्याच्या हद्दीत मुलीवर झालेल्या गंभीर अत्याचाराच्या प्रकरणाचा तपास केवळ एका आरोपीपुरता मर्यादित न ठेवता त्याची व्याप्ती वाढविण्यात यावी. आरोपीला प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष मदत करणारे, पीडितेवर दबाव किंवा दहशत निर्माण करणारे तसेच या प्रकरणामागे आणखी व्यक्ती अथवा एखादी...

रोहिणी हट्टंगडी यांना भारताबाहेरचा पहिला पुरस्कार!

महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने आयोजित तिसऱ्या नाफा मराठी चित्रपट महोत्सव २०२६ची सुरुवात हॉलिवूडच्या ग्लॅमरला साजेशा दिमाखदार रेड कार्पेट सोहळ्याने झाली. कॅमेऱ्यांच्या लखलखत्या फ्लॅशमध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज तारे-तारकांच्या शानदार आगमनाने सॅन होजेतील वातावरण मराठमोळ्या उत्साहाने भारून गेले. या सोहळ्यात हिंदी-मराठी चित्रपटसृष्टी...

मुंबईत पालिका सुविधा केंद्रात जन्म-मृत्यू नोंदणीसाठी स्वतंत्र खिडकी

मुंबई महापालिका क्षेत्रातील जन्म व मृत्यूंची नोंदणी करण्यासाठी तसेच नोंदणीकृत जन्म व मृत्यू प्रमाणपत्रांतील आवश्यक दुरुस्त्या करण्यासाठी पालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयातल्या नागरी सुविधा केंद्राच्या ठिकाणी स्वतंत्र खिडकी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नागरिक सेवा केंद्रात ऑनलाईन सेवा विभागस्तरावर जन्म...
Skip to content