Homeन्यूज अँड व्ह्यूजविचित्र असते स्वप्नांची...

विचित्र असते स्वप्नांची दुनिया!

स्वप्नांची दुनिया काही वेगळीच असते. असे म्हणण्याचे कारण असे की ज्यांना आपली सगळी स्वप्ने चक्क आठवतात. अशी माणसे मिळणे जसे कठीण तसेच मला स्वप्नच पडत नाही किंवा मलातर एकही स्वप्न आठवत नाही असे सांगणारी माणसे मात्र अनेक असतील. मनोविज्ञान असे मानते की, तुमच्या आठवणीत राहोत अथवा न राहोत परंतु स्वप्ने पडण्याची शक्यता मात्र रोज रात्री झोप लागल्यानंतर असते. एखाद्या सकाळी आपण उठतो तेच जणू काही वेगळ्या विश्वातून बाहेर आल्यासारखे वाटत असते. तुमचे डोळे जरी वास्तवात उघडलेले असले तरी आपण मात्र अजून त्या स्वप्नाच्या आठवणीत अनेकदा स्थळ, काळ यांच्यासहित रमलेले असतो. काहीवेळी आपल्याजवळ व्यक्त करण्यासारखे काहीही नसते. आपण स्तब्ध पण शांत असतो. याचाही अनुभव आपल्यापैकी प्रत्येकाने घेतला असेलच.

या विषयातील संशोधक सांगतात की, असे आपल्याला वाटत असले तरी आपण झोप आणि स्वप्ने यांच्या प्रयोगशाळेत असतो तेव्हा आपल्याला बरेच काही आठवू लागते. याचे कारण येथे प्रत्येकालाच स्वप्नावर व्यक्त होणे आवश्यक असते. निदान एकतरी स्वप्न यावेळी आठवतेच असे एरिन वाम्स्ले या संस्धोधक महिलेचे म्हणणे आहे. ज्यांनी आपली स्वप्ने बघण्याची क्षमताच मेंदूतील विकाराच्या कारणाने गमावली आहे तेच याला अपवाद असतात. स्वप्ने ही कायम राहणारी बाब आहे तर स्मरणशक्ती बदलू शकते. याचे नेमके कारण अजून समजलेले नाही पण विज्ञानाने स्वप्ने आठवणीत का राहू शकत नाहीत याचा काही अभ्यास केला आहे. एक म्हणजे स्मरणशक्ती ही कमी टिकणारी असते. झोपेचे अभ्यास तर असे दाखवतात की तुम्हाला त्यानंतर लगेच जाग आली नसेल तर तुम्हाला स्वप्न लक्षातच राहू शकत नाही.

रात्री कधीतरी जाग येत असेल तर तुमची स्वप्ने लक्षात ठेवण्याची स्मरणशक्ती चांगली आहे असे मानले जाते. काही सेकंद जागे राहून कूस बदलणे सामान्य असते. परंतु हे मर्यादेच्या पलीकडे जाता कामा नये असेही एरिन वाम्स्ले म्हणतात. ज्यांची झोप कमी असते त्यांची स्वप्ने लक्षात ठेवण्याची क्षमता अधिक असते. रात्रीतून दोन-तीन वेळा जाग येणे सामान्य असले तरी त्याहून अधिक हे झोपेच्या विकाराचे लक्षण असते. आपोआप जाग येणे स्वप्नातील आठवणींच्यासाठी महत्त्वाचे असते.

झोपेचे चार प्रकार आहेत. पहिला डोळ्यांची जलद उघडझाप. यानंतरचे तीन प्रकार रात्रभरात झोप आणि जाग येणे यांची किती आवर्तने होतात यावर.. आपल्या लक्षात ८० टक्के राहतात अशी स्वप्ने बहुतांश दीर्घकालीन असतात आणि डोळ्यांची जलद उघडझाप होताना पडतात. रात्रीचा कोणता काळ अथवा प्रहर हेदेखील महत्त्वाचे असते. जसजसे आपण आपल्या नेहमीच्या जागे होण्याच्या वेळेकडे येतो तसतसा आपला मेंदू अधिक कार्यान्वित होतो. आपण सजग होतो. हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या संशोधक जिंग झांग म्हणतात की, अलार्म लावून उठण्याची सवय असणाऱ्यांना स्वप्ने फारशी आठवत नाहीत हे लक्षात ठेवायला हवे. याचे कारण अलार्म आपल्याला सखोल झोपेतून कृत्रिम रीतीने उठवतो हे असते.

मनाचा मोकळेपणा असेल तर स्वप्ने अधिक प्रमाणात लक्षात राहू शकतात. मेंदूतील विशिष्ट ठेवणदेखील यासाठी काम करते, तुम्हाला स्वप्ने किती आठवतात यावर जागेपणी तुमच्या भावनिक स्थितीचा अंदाज करता येतो. अधिक स्वप्ने लक्षात राहावी असे वाटत असेल तर काही दिवस अलार्म बंद ठेवा. माणूस स्वप्न बघतो आहे का हे तत्काळ समजण्याची मात्र आज काहीही व्यवस्था नाही. त्यामुळे मला स्वप्नेच पडत नाहीत असे सांगून मोकळे होणारी मंडळीही असणारच… बघा शोधून!

Continue reading

टाकाऊ इलेक्ट्रॉनिक्समधले सोने मिळवले तरी दागिने महागच!

फार पूर्वीच्या काळी इलेक्ट्रॉनिक उपकरणे फार बोजड असत आणि त्यामुळे ती सहजपणे हातात मावत नव्हती. त्यानंतर १९६०च्या दशकात हातात वागवण्यासारख्या स्वरुपात ट्रांझिस्टर नावाचे एक उपकरण बाजारात आले. त्यापूर्वी रेडिओ म्हणजे घरच्या टेबलावर किंवा कपाटात ठेवून त्यावर कार्यक्रम ऐकता येत...

दोन बापांच्या उंदराला पिल्ले…

या जगातले विज्ञान आजचे कोणतेही आश्चर्य प्रत्यक्षात घडवून आणते, हे जरी खरे असले तरी ‘दोन बापांचा’ ही मराठीत चक्क शिवी समजली जात असताना माणसाच्या दीर्घायुषी जीवनासाठी जे काही संशोधन होत आहे त्यासाठी उंदीर हाच प्राणी वापरला जातो. याचेही कारण...

आता अवकाशात भ्रमण करणार माणसाच्या अस्थी!

माणसाचे मन फार विचित्र आहे. त्याला एखादी गोष्ट ‘भावली’ की त्याच्यासाठी तो वाट्टेल ते करायला तयार होतो. इतकेच नव्हे तर आपल्या मुलाबाळांना पढवून ठेवतो की, माझे जेव्हा केव्हा बरेवाईट होईल त्यानंतर तुम्ही माझ्यावर अंत्यसंस्कार तर करालच, पण मी आजच्या...
Skip to content