Homeडेली पल्सउद्यापासून संसदेच्या हिवाळी...

उद्यापासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला होणार सुरूवात!

उद्या, 4 डिसेंबरपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत असून  या अधिवेशनचा समारोप 22 डिसेंबरला शुक्रवारी होईल. त्यात 19 दिवसांत कामकाजाच्या 15 बैठका होतील. संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी काल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकार आणि सर्व राजकीय पक्षाच्या सभागृह नेत्यांची बैठक झाली.

या अधिवेशनात भारतीय नाट्य संहिता, मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य निवडणूक आयुक्त (नियुक्ती, सेवाशर्ती, कार्यकाल), केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (दुसरी सुधारणा) या तीन विधेयकांसह एकूण 21 विधेयके आणली जाणार असून त्यातील दोन वित्त विधेयक आहेत, असे संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी या बैठकीनंतर सांगितले.

संबंधित पीठासीन अधिकाऱ्यांनी कार्यपद्धतीच्या नियमांतर्गत परवानगी दिलेल्या कोणत्याही मुद्द्यावर सभागृहात चर्चा करण्यास सरकार नेहमीच तयार असते. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी सर्व पक्षीय नेत्यांनी सहकार्य करावे आणि पाठिंबा द्यावा असे आवाहन त्यांनी केले.

विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मांडलेले मुद्दे ऐकून घेतल्यानंतर बैठकीत महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केल्याबद्दल राजनाथ सिंह यांनी उपस्थित नेत्यांचे आभार मानले आणि या सर्व मुद्द्यांवर संसदेच्या संबंधित सभागृहांच्या नियमांनुसार आणि संबंधित पीठासीन अधिकाऱ्यांच्या परवानगीने चर्चेसाठी सरकार तयार असल्याचे सांगितले. या बैठकीला तेवीस राजकीय पक्षांचे एकूण तीस नेते उपस्थित होते.

Continue reading

१ ऑगस्टला रूपेरी पडद्यावर झळकणार ‘मुंबई लोकल’!

मुंबई शहराची जीवनवाहिनी असलेली मुंबई लोकल आणि त्यात फुलणारी एक प्रेमकहाणी आता 'मुंबई लोकल' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येत आहे. अभिनेता प्रथमेश परब आणि अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर यांची जोडी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार असून येत्या १ ऑगस्टला हा...

57 वर्षांनंतर अर्जेंटिनाला पहिल्यांदा भेट देणार भारतीय पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पाच देशांच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यात तब्बल 57 वर्षांनंतर अर्जेंटिनाला तसेच गेल्या 60 वर्षांत ब्राझिलला भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान असतील. 2 ते 9 जुलै 2025 असा पंतप्रधानांचा हा दौरा आहे. या कालावधीत ते घाना,...

विधिमंडळात आजही गदारोळ?

विधानसभेत अध्यक्षांसमोरील राजदंडाला स्पर्श करत निदर्शने केल्यामुळे काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंगळवारच्या संपूर्ण दिवसभराच्या कामकाजासाठी सभागृहातून निलंबित केले. विधिमंडळात आजही काँग्रेससह विरोधी पक्षांच्या सदस्यांकडून कृषीमंत्र्यांच्या कथित वादग्रस्त विधानांविरूद्ध आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता...
Skip to content