Homeटॉप स्टोरी20 मेला होणार...

20 मेला होणार 695 उमेदवारांचे राजकीय भवितव्य निश्चित

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी येत्या 20 मे रोजी मतदान होणार असून त्याकरीता 8 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये 695 उमेदवार निवडणुकीला उभे राहिले आहेत. याच टप्प्यात मुंबईतल्या सहा, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पालघर या मतदारसंघांत मतदान होणार आहे.

निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात 8 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील 49 मतदारसंघांसाठी 1586 उमेदवारीअर्ज दाखल झाले होते. उमेदवारीअर्ज भरण्याची अखेरची तारीख 3 मे 2024 होती. आलेल्या सर्व अर्जांच्या छाननीनंतर 749 अर्ज वैध ठरले आहेत. महाराष्ट्रात 13 लोकसभा मतदारसंघांमधून सर्वाधिक 512 उमेदवारी अर्ज आले. त्यापाठोपाठ उत्तर प्रदेशातील 14 मतदारसंघांमधून 466 अर्ज दाखल झाले. झारखंडमधील 4-छत्र लोकसभा मतदारसंघात सर्वात जास्त 69 अर्ज; तर त्यापाठोपाठ उत्तर प्रदेशातील 35-लखनौ मतदारसंघात 67 उमेदवारी अर्ज दाखल झाले. पाचव्या टप्प्यात निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची प्रति मतदारसंघ सरासरी संख्या 14 आहे.

पाचव्या टप्प्यातील राज्य/केंद्रशासित प्रदेशनिहाय आकडेवारी

राज्य/केंद्रशासित प्रदेश मतदारसंघांची संख्याएकूण उमेदवारी अर्जछाननीनंतर वैध उमेदवारांची संख्याअर्ज मागे घेतल्यानंतर अंतिमतः निवडणूक लढवणार असलेल्या उमेदवारांची संख्या
बिहार51648280
जम्मू आणि कश्मिर1382322
झारखंड31485754
लदाख1853
महाराष्ट्र13512301264
ओदिशा5874140
उत्तर प्रदेश14466147144
पश्चिम बंगाल71639388
Total491586749695

Continue reading

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...

आखाती देशांमध्ये उद्या साजरी होणार ईद!

संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि बहरीनसह अनेक आखाती देशांनी ईद-उल-फित्रच्या अधिकृत प्रारंभ तारखेची आज घोषणा केली. 30 दिवसांचा रमजान महिना पूर्ण झाल्याचे दर्शवणारा शव्वाल महिन्याचा चंद्र न दिसल्यामुळे, उद्या 20 मार्च, शुक्रवार रोजी ईद-उल-फित्र साजरी...

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...
Skip to content