Homeकल्चर +जन्म आणि मृत्यू...

जन्म आणि मृत्यू यांच्यादरम्यानची गूढरम्य गोष्ट ‘समसारा’!

हॉरर चित्रपट हा जगभरात लोकप्रिय असलेला प्रकार आहे. मात्र मराठी चित्रपटसृष्टीत हॉरर प्रकार फार हाताळला गेलेला नाही. ही उणीव आता “समसारा” हा चित्रपट भरून काढणार आहे. दमदार स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाचा गूढरम्य टीजर नुकताच सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आला. २० जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

संचय प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘समसारा’ची निर्मिती पुष्कर गुप्ता यांनी केली असून दिग्दर्शनाची जबाबदारी सागर लढे यांनी सांभाळली आहे. कथा सागर लढे, विश्वेश वैद्य आणि समीर मानेकर यांची असून, पटकथा सागर लढे आणि समीर मानेकर यांनी लिहिली आहे. समीर मानेकर, निहार भावे यांनी संवादलेखन केलं आहे. विश्वेश वैद्य यांनी संगीत, अक्षय राणे छायांकनाची जबाबदारी निभावत आहेत. सायली संजीव, ऋषी सक्सेना, पुष्कर श्रोत्री, डॉ. गिरीश ओक, नंदिता धुरी, प्रियदर्शनी इंदलकर, तनिष्का विशे, यशराज डिंबळे, कैलास वाघमारे, साक्षी गांधी अशी उत्तम स्टारकास्ट या चित्रपटात आहे. कार्यकारी निर्माता म्हणून महेश भारंबे व अन्वय नायकोडी काम पाहणार आहेत.

जन्म आणि मृत्यू यांच्यादरम्यान घडणारी एक गूढरम्य गोष्ट या चित्रपटात उलगडण्यात आली आहे. गूढरम्य गोष्टीला अनुभवी अभिनेत्यांची साथ लाभली आहे. त्याशिवाय पार्श्वसंगीत, छायांकन, व्हिज्युअल इफेक्ट्सही उत्तम दर्जाचे असल्याचं टीजरमधून जाणवत आहे. त्यामुळेच चित्रपटाचा टीजर अत्यंत रंजक आणि भयाचा अनुभव देणारा ठरला आहे. चित्रपटाच्या टीजरमुळे चित्रपटाविषयी चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळेच समसाराचं नेमकं गूढ काय आहे, याविषयी आता कुतूहल निर्माण झालं आहे.

Continue reading

उद्यापासून सॅन होजे येथे रंगणार ‘नाफा’ मराठी चित्रपट महोत्सव!

राष्ट्रीय सुवर्णकमळविजेत्या 'देऊळ' आणि 'भारतीय' या चित्रपटांचे राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त निर्माते अभिजीत घोलप यांच्या संकल्पनेतून 'नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोशिएशन' तथा नाफा (NAFA) या संस्थेची स्थापना गेल्यावर्षी अमेरिकेत झाली. हॉलिवूडच्या धर्तीवर मराठी चित्रपटसृष्टीचा भव्य सोहळा प्रथमच त्यांनी आयोजित करून सर्वांचे...

शशांक केतकरच्या ‘मुरांबा’चे ११०० भाग पूर्ण!

स्टार प्रवाहवरील मुरांबा मालिकेने नुकताच ११०० भागांचा टप्पा पार केला. रमा-अक्षय या जोडीसोबतच संपूर्ण मुकादम कुटुंबाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. अक्षय मुकादमची भूमिका साकारणाऱ्या शशांक केतकरने आजवर बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं आहे. मात्र शशांकच्या करिअरमधली मुरांबा ही सर्वाधिक भागांची...

‘सावली’वर सावली.. तीही कडक ऊन नसताना!

राज्यविधिमंडळाच्या नुकत्याच संपलेल्या अधिवेशनात विधान परिषदेत शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते अनिल परब यांनी महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांचा राजीनामा मागताना मुंबईतल्या कांदिवलीत असलेला 'सावली' हा डान्स बार त्यांच्या मातोश्रींचा असल्याचा आरोप केला. काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी येथे छापा टाकून...
Skip to content