Tuesday, April 1, 2025
Homeचिट चॅटचुनाभट्टीत २३ फेब्रुवारीपासून...

चुनाभट्टीत २३ फेब्रुवारीपासून रंगणार हिंदुहृदयसम्राट चषक कबड्डी स्पर्धा

मुंबईतल्या चुनाभट्टीत येत्या २३ ते २६ फेब्रुवारीदरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विभाग क्रमांक ६ शाखा क्रमांक १७०, १७१ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि दत्तात्रय संघ, चुनाभट्टी यांच्यावतीने हिंदुहृदयसम्राट चषकासाठी प्रथम श्रेणी पुरुष गट आणि महिला गटाच्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे‌ आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धेतील सामने साई मंदिर पटांगण, व्ही. एन. पुरव मार्ग, चुनाभट्टी येथे होतील. रवी म्हात्रे व मनिष मोरजकर (विधानसभा प्रमुख) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मलकित सिंग संधु, शाखा प्रमुख, शाखा क्रमांक १७० आणि प्रकाश साळुंके शाखाप्रमुख, शाखा क्रमांक १७१ यांनी या स्पर्धेच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला आहे. पुरुष गटात उत्कर्ष, सत्यम, चेंबूर क्रीडा केंद्र, टागोर नगर मित्र मंडळ, स्वस्तिक, शूर संभाजी, अंबिका, ओवळी, अमरज्योत, श्री साई तर महिला विभागात स्वराज्य, महात्मा फुले, सत्यम, स्नेहविकास, नवशक्ती, महात्मा गांधी हे मुंबई उपनगरातील बलाढ्य संघ भाग घेत आहेत.

मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने होत असलेल्या या स्पर्धेत पुरुष विजेत्या संघाला दहा हजार रुपये रोख आणि उपविजेत्या संघाला सात हजार रुपये रोख तसेच आर्कषक हिंदुहृदयसम्राट चषक मिळेल. महिला विजेत्या संघाला आठ हजार रुपये रोख आणि उपविजेत्या संघाला‌ पाच हजार रुपये रोख व आर्कषक हिंदुहृदयसम्राट चषक भेट मिळेल. याशिवाय स्पर्धेतील सर्वोत्तम पकडपटू, चढाईपटू आणि अष्टपैलू खेळाडूंनादेखील खास पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेतील सामने मॅटवर होतील.

Continue reading

‘मुंबई लोकल’ येत आहे ११ जुलैला!

अभिनेता प्रथमेश परब आणि ज्ञानदा रामतीर्थकर यांची प्रमुख भूमिका असलेला "मुंबई लोकल" हा चित्रपट येत्या ११ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चित्रपट प्रदर्शनाची तारीख घोषित करण्यात आली आहे. आजवर मराठी चित्रपटात मुंबई लोकल दिसली असली, तरी लोकलच्या...

भारती देसाई, गोपाळ लिंग सन्मानित

भारती देसाई, गोपाळ लिंग यांना "ओम् कबड्डी प्रबोधिनी"ने यंदाचे आपले पुरस्कार जाहीर केले. तेहरान, इराण येथे झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय महिला संघाचे नेतृत्त्व करून सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या सोनाली शिंगटेचादेखील यावेळी सन्मान करण्यात येईल. स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ...

वाद निर्माण करून प्रसिद्धी मिळवण्याचा कुणाल कामराचा हव्यास!

पंतप्रधान, मुख्य न्यायाधीश किंवा अन्य न्यायमूर्ती तसेच न्यायव्यवस्था याच्याबद्दल अत्यंत खालच्या दर्जाचं बोलणं ही कुणाल कामराची कार्यपद्धती आहे. मुळात या व्यक्तीला वाद निर्माण करून प्रसिद्धी मिळवण्याचा हव्यास आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिन्दे यांना लक्ष्य करत खालच्या दर्जाची कॉमेडी करण्याचा...
Skip to content