Homeडेली पल्सकांदा उत्पादकांच्या नुकसानीची...

कांदा उत्पादकांच्या नुकसानीची भरपाई सरकारने द्यावी!

केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्यामुळे शेतकऱ्यांवर आघात झाला आहे. त्यामुळे सरकारने याबाबत केंद्राकडे पाठपुरावा करावा, अन्यथा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई राज्य सरकारने द्यावी, अशी मागणी आज विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज नागपूरमध्ये केली.

कांदा

गारपीट अवकाळीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. पीक, फळबाग यांचा नुकसान झालं आहे. त्यातही महत्त्वाचे कांदा. या पिकाच्या निर्यातीवर बंदी आणली आहे. सरकारने १५ ऑगस्टपर्यंत अनुदान देण्याची घोषणा करूनही अद्याप त्याबाबत कोणतीही मदत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिली नाही. निर्यातबंदी झाल्यावर कांद्याचा भाव १२०० ते १५०० रुपयांपर्यंत खाली घसरला आहे. यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादनखर्चही वाया गेला आहे. अनेक राजकीय पक्ष उत्स्फूर्तपणे आंदोलनात उतरले आहेत. सरकारने केंद्र सरकारकडे निर्यातबंदीबाबत भूमिका मांडली पाहिजे. सरकारने कांदा निर्यातबंदीसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा अन्यथा प्रति अडीच हजार क्विंटल कांद्याचे झालेल्या नुकसानाची सरकारने स्वतः जबाबदारी घेऊन नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी दानवे यांनी केली.

कांदा

त्यावर सरकारकडून उत्तर देण्यात आले की २५ ते ३० टक्के कांदयाची देशात कमतरता आहे. शेतकरी जर कांद्यामुळे संकटात येत असेल तर केंद्र सरकार कांदा खरेदी करायला तयार आहे अशी माहिती देण्यात आली. राज्यात गेल्या वर्षभरात अवकाळी, सततचा पाऊस, संततधार यामुळे मोठया प्रमाणात शेतीचे व शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र सरकारने १० हजार कोटी रुपयांची मदतीची घोषणा करूनही एक रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली नाही. शेतकऱ्यांच्या खात्यात एक हजार रुपयांपेक्षाही कमी पीक विम्याची रक्कम जमा करून सरकारने शेतकऱ्यांची थट्टा केली असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Continue reading

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...

आखाती देशांमध्ये उद्या साजरी होणार ईद!

संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि बहरीनसह अनेक आखाती देशांनी ईद-उल-फित्रच्या अधिकृत प्रारंभ तारखेची आज घोषणा केली. 30 दिवसांचा रमजान महिना पूर्ण झाल्याचे दर्शवणारा शव्वाल महिन्याचा चंद्र न दिसल्यामुळे, उद्या 20 मार्च, शुक्रवार रोजी ईद-उल-फित्र साजरी...

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...
Skip to content