Homeडेली पल्सनिवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी...

निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी बिहारमध्ये अर्ज करण्याची मुदत 28 मार्च

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी काल सकाळी उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झाली. भारतीय निवडणूक आयोगाने काल 21 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमधील लोकसभा निवडणुका 2024मध्ये होणाऱ्या 102 लोकसभा मतदारसंघांसाठी अधिसूचना जारी केल्यानंतर काल उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यातील या मतदारसंघांमध्ये 19 एप्रिलला मतदान होईल. पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख बिहार वगळता इतर सर्व 20 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांसाठी 27 मार्च असून बिहारसाठी ती 28 मार्च 2024 आहे.

पहिल्या टप्प्यात अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, राजस्थान, सिक्कीम, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, अंदमान आणि निकोबार बेटे, जम्मू आणि काश्मीर, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरी या राज्य / केन्द्रशासित प्रदेशांत मतदान होणार आहे.

पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणेः

Continue reading

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...

आखाती देशांमध्ये उद्या साजरी होणार ईद!

संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि बहरीनसह अनेक आखाती देशांनी ईद-उल-फित्रच्या अधिकृत प्रारंभ तारखेची आज घोषणा केली. 30 दिवसांचा रमजान महिना पूर्ण झाल्याचे दर्शवणारा शव्वाल महिन्याचा चंद्र न दिसल्यामुळे, उद्या 20 मार्च, शुक्रवार रोजी ईद-उल-फित्र साजरी...

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...
Skip to content