Tuesday, March 11, 2025
Homeएनसर्कलजेन-नेक्स्टचे आकर्षण 'क्रेज'...

जेन-नेक्स्टचे आकर्षण ‘क्रेज’ बाजारात दाखल

भारताच्या अग्रगण्य मेकअप ब्रॅण्ड्सपैकी एक असलेल्या स्विस ब्युटीने क्रेज, हे आपले जेन्झी मेकअप कलेक्शन बाजारात दाखल केले आहे. एकाच वेळी अनेक कामांमध्ये गुंतलेल्या मल्टी-टास्कर जेन-नेक्स्ट लोकसंख्येसाठी विविध प्रकारच्या सौंदर्यप्रसाधनांचा यात समावेश आहे. क्रेज कलेक्शनमध्ये आयशॅडो आणि ब्लश पॅलेट ते मस्कारासारख्या डोळ्यांच्या मेकअपपासून ते लिप बामपासून १२ तास राहणाऱ्या लिप क्रेऑन्ससारख्या ओठांसाठीच्या उत्पादनांपर्यंत ते प्रायमर आणि फिक्सरसारख्या चेहऱ्यासाठीच्या उत्पादनांच्या श्रेणीपर्यंतच्या मनाला भुरळ पाडणाऱ्या उत्पादनांचे विपुल पर्याय उपलब्ध आहेत. 

या उत्पादनांसाठी वापरण्यात आलेले ट्रेण्डी पॅकेजिंग आणि फॉर्म्युले जेन झेडच्या खास बोलीभाषेत – स्लॅन्ग्जमध्ये ठेवण्यात उत्पादनांची नावे आणि बहुउपयोगी उत्पादने ही वैशिष्ट्ये असलेले क्रेज तरुणाईचा ध्यास व स्वत:ला बिनधास्तपणे व्यक्त करण्याची वृत्ती यांचा उत्सव साजरा करते. यात चेहरा, ओठ व डोळ्यांसाठी नजरेत भरणारे रंगांचे पर्याय आणि नाविन्यपूर्ण मेकअप फॉर्म्युले उपलब्ध आहेत. या कलेक्शनमधील सर्व सौंदर्यउत्पादने बहुउपयोगी आणि उच्च दर्जाची कामगिरी करणारी आहेत. यामुळे क्रेजमधील प्रसाधने सर्वांना परवडण्याजोगी असून सौंदर्यप्रसाधनाच्या जगातील नवनवे कल युवा व प्रवासी ग्राहकांच्या आवाक्यात राहावेत याची काळजी यात घेण्यात आली आहे.

स्विस ब्युटीचे सीईओ साहिल नायर म्हणाले की, आमची क्रेज मेकअप श्रेणी उत्साहाने भारलेल्या आणि अष्टपैलू अशा जेन्झीसाठी आहे, जी कॉलेजमधील पदार्पण करताना, पदवीधर होताना, नोकरीवर रुजू होताना अशा आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपला ठसा उमटवत आहेत. या श्रेणीतील उत्पादनांचे उठावदार रंग, वैविध्यपूर्ण फॉर्म्युले आणि विक्षिप्त व्यक्तिमत्त्व यात जेन झेडच्या कोणत्याही बंधनांना न जुमानणाऱ्या उर्मींचे प्रतिबिंब पडले आहे.

या कलेक्शनद्वारे तरुण मुली नवे प्रयोग करू शकतात, नव्या लुक्सचा शोध घेऊ शकतात आणि मेकअपच्या माध्यमातून स्वत:ला व्यक्त करू शकतात. भारतीय सौंदर्यप्रसाधनांच्या क्षेत्रात ११ वर्षांच्या प्रभावशाली अस्तित्त्वाद्वारे स्विस ब्युटीने भारतीय बाजारपेठेची नस अचूक पकडली आहे आणि आता क्रेजच्या रूपाने जेन झेडची रंगीत कॉस्मेटिक्सची आजवर अपूर्ण राहिलेली गरजही पूर्ण करण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. वैविध्यपूर्ण, बहुउपयोगी आणि ट्रेण्डी मेकअप उत्पादने ही खास जेन झेडसाठी, या पिढीशी संवाद साधण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहेत.

जेन झेड, हा भारताच्या सौंदर्य आणि पर्सनल केअर गटाचा सर्वात वेगाने वाढत असलेला ग्राहकवर्ग आहे. तरुणाईवर लक्ष केंद्रित करणारा ब्रॅण्ड म्हणून दर्जा, नाविन्यपूर्णता आणि ट्रेण्डी स्वभावामधून आपल्या या ग्राहकवर्गाशी खरेखुरे नाते निर्माण करण्याची आमची इच्छा आहे, असे ते म्हणाले.

स्विस ब्युटी क्रेजकडे ५५०हून अधिक शहरांतील किरकोळ विक्रीस्थानांचे जाळे आहे व संपूर्ण भारतामध्ये १२०हून अधिक सौंदर्यप्रसाधनांशी संबंधित आउटलेट्समध्ये त्यांचे मुख्यत्वे अस्तित्त्व दिसून येते. क्रेजची सर्व उत्पादने आता नायका, अमेझॉन, मिंत्रा, पर्पल इत्यादी अग्रगण्य बाजारपेठांमध्ये उपलब्ध आहेत. अलीकडेच बाजारात दाखल झालेली कंपनीची मायक्रो वेबसाइट म्हणजे अनोखेपणाने आणि नेत्रदीपक फॉर्म्युलेशन्सनी बाजारपेठेत लोकप्रिय होत असलेली नवनवी मेकअप उत्पादने एकाच ठिकाणी मिळण्याचे ठिकाण आहे, असेही त्यांनी सांगितले.

Continue reading

कुर्ल्यातल्या कबड्डी स्पर्धेत अंबिका, पंढरीनाथ संघांची बाजी

शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून मुंबईतल्या कुर्ला (पश्चिम) येथील गांधी मैदानात जय शंकर चौक क्रीडा मंडळ आणि गौरीशंकर क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित पुरुष गटाच्या कबड्डी स्पर्धेत प्रथम श्रेणी गटात अंबिका सेवा मंडळ, कुर्ला...

‘स्वामी समर्थ श्री’साठी राज्यातील दिग्गज उद्या आमनेसामने

क्रीडा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या "स्वामी समर्थ श्री" राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेच्या माध्यमातून मुंबईकर शरीरसौष्ठवप्रेमींना जानदार, शानदार आणि पीळदार शरीरसौष्ठवपटूंचे ग्लॅमर पाहायला मिळणार आहे. आमदार महेश सावंत यांच्या आयोजनाखाली मुंबईच्या प्रभादेवीत दै. सामना मार्गाशेजारील...

भारतात महिलांच्या आत्महत्त्यांपैकी ३६.६% तरुणींच्या!

पुरुषांपेक्षा महिलांमध्ये चिंता आणि नैराश्य अधिक प्रमाणात असून जागतिक स्तरावर ही समस्या अधिक व्यापक आहे, असा अहवाल नीरजा बिर्ला यांच्या नेतृत्त्वाखालील आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या एमपॉवर, या अभ्यास गटाने प्रसिद्ध केला आहे. भारतात पुरुषांपेक्षा हे प्रमाण दुप्पट असून यात...
Skip to content