Homeचिट चॅटराष्ट्रीय संरक्षणासाठी तयार...

राष्ट्रीय संरक्षणासाठी तयार करणे, हे सैनिकी शाळांचे उद्दीष्ट!

छात्रसैनिकांमध्ये नागरी जबाबदारी आणि नेतृत्वाची भावना निर्माण करण्यासाठी सैनिकी शाळांद्वारे विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. सर्व सैनिकी शाळांमध्ये प्रीफेक्टोरियल प्रणालीचे पालन केले जाते. यात नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी छात्रसैनिकांना विशिष्ट जबाबदाऱ्या नेमून दिल्या जातात. सैनिकी शाळांचे प्राथमिक उद्दिष्ट, छात्रसैनिकांना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये प्रवेशासाठी शैक्षणिक, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तयार करणे आहे. संरक्षण राज्यमंत्री अजय भट यांनी काल राज्यसभेत लेफ्टनंट जनरल (डॉ) डी. पी. वत्स (निवृत्त) यांना लेखी उत्तर देताना ही माहिती दिली.

सैनिकी शाळा गेल्या काही वर्षात छात्रसैनिकांना दर्जेदार शिक्षण आणि प्रशिक्षण, चांगले नागरिक होण्यासाठी व जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सरसता साध्य करण्याच्या दृष्टीने त्यांना तयार करण्यामध्ये एक प्रारूप म्हणून विकसित होत आहेत.

छात्रसैनिकांना नागरी जबाबदाऱ्या समजण्यासाठी आणि त्यांच्यात नेतृत्वगुण विकसित व्हावेत यासाठी सैनिकी शाळा आणि इतर शाळांमध्ये आयोजित केल्या जाणार्‍या विविध आदानप्रदान  कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले जाते.

सैनिकी शाळा सामाजिक कार्य आणि सामुदायिक सेवा प्रकल्प हाती घेतात. छात्रसैनिकांना  विविध वातावरण आणि परिस्थितींबद्दल अवगत करण्यासाठी  शैक्षणिक दौरे आणि भेटींचे आयोजन केले जाते. अनुकूलता, सांस्कृतिक समज आणि मोठ्या समुदायाप्रती जबाबदारीची भावना विकसित करण्यात हे अनुभव सहायक ठरतात.

मुले आणि मुली दोन्ही कॅडेटसाठी एनसीसी अनिवार्य आहे. यामुळे कॅडेट्समध्ये  चारित्र्य, धैर्य आणि शिस्त या गुणांचा विकास होण्यास मदत होते.

Continue reading

महाराष्ट्रातल्या 89 अधिकारी व कर्मचाऱ्यांना शौर्य व सेवा पदके घोषित

भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशातल्या पोलीस, अग्निशमन, होमगार्ड आणि सुधारात्मक सेवेतील एकूण 982 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शौर्य तसेच सेवा पदके जाहीर करण्यात आली आहेत. यात महाराष्ट्रातल्या एकूण 89 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये 31 पोलीस कर्मचाऱ्यांना 'वीरता पदक', उत्कृष्ट आणि विशिष्ट सेवेकरीता दिली जाणारी राष्ट्रपती पदके, पोलीस दलातल्या 4 अधिकाऱ्यांना आणि सुधारात्मक सेवा विभागातल्या 2 कर्मचाऱ्यांचा...

बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी होती अशी फुलांची सजावट

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काल झालेल्या जयंतीनिमित्त मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाकडून दादरच्या शिवाजीपार्क येथील स्मृती स्थळावर विविध फुलझाडांनी तसेच शोभिवंत झाडांनी सजावट केली होती. उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मांडणी करण्यात आली. यामध्ये सफेद आणि पिवळ्या रंगाच्या...

ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा झाले ‘जॉली अँड पॉली’!

भारतातील सर्वात विश्वासार्ह खासगी जीवन विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या एसबीआय लाइफ इन्शुरन्सने क्रिकेट सुपरस्टार ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांना आपले ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे. त्यांना 'जॉली' आणि 'पॉली' या दोन विशिष्ट भूमिकांमध्ये सादर करण्यात आले आहे,...
Skip to content