Homeकल्चर +आयुष्मान खुरानाला ‘द...

आयुष्मान खुरानाला ‘द अकादमी’चे आमंत्रण!

बॉलिवूड स्टार आयुष्मान खुराना, ज्यांनी भारतामध्ये आपल्या विघटनात्मक आणि प्रगतीशील सिनेमाच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे, त्यांना यंदा ऑस्कर पुरस्कार प्रदान करणाऱ्या ‘द अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’कडून सदस्यत्वासाठी आमंत्रित करण्यात आले आहे! या प्रतिष्ठित कलाकार, तंत्रज्ञ आणि व्यावसायिकांना अकादमीत सामील करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे, असे अकादमीचे सीइओ बिल क्रेमर आणि अध्यक्ष जॅनेट यांग यांनी सांगितले. चित्रपट निर्मिती आणि संपूर्ण चित्रपट उद्योगाबाबतच्या त्यांच्या बांधिलकीमुळे या अत्यंत प्रतिभावान व्यक्तींनी जागतिक चित्रपट समुदायात अमीट योगदान दिले आहे, असेही ते म्हणाले.

मोशन पिक्चर्स आणि सिनेमा क्षेत्रातील योगदानासाठी जगभरातील नावाजलेल्या कलाकारांना आमंत्रित करण्यात आले आहे. आयुष्मान आता गिलियन अँडरसन, एरियाना ग्रांडे, कमल हसन, मिकी मॅडिसन, जेरेमी स्ट्रॉन्ग, कीरन कल्किन यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांच्या यादीत सामील झाला आहे. आयुष्मान खुरानाला नेहमीच त्यांच्या वेगळ्या वाटेवर चालणाऱ्या सिनेमासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवण्यात आले आहे. त्यांनी नेहमीच आपली कला समाजपरिवर्तनासाठी आणि राष्ट्रउभारणीसाठी वापरली आहे. त्यांना टाइम मॅगझिनकडून दोन वेळा गौरवण्यात आले आहे. टाइम १०० इम्पॅक्ट अवार्ड्स 2023साठी आणि प्रतिष्ठित टाइम १०० यादीत, ज्यामध्ये त्यांना जगातील 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक म्हणून ओळख देण्यात आली आहे! आयुष्मान हे युनिसेफ इंडियाचे राजदूत आहेत आणि ते मुलांच्या हक्कांसाठी सातत्याने कार्यरत आहेत.

Continue reading

उद्यापासून सॅन होजे येथे रंगणार ‘नाफा’ मराठी चित्रपट महोत्सव!

राष्ट्रीय सुवर्णकमळविजेत्या 'देऊळ' आणि 'भारतीय' या चित्रपटांचे राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त निर्माते अभिजीत घोलप यांच्या संकल्पनेतून 'नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोशिएशन' तथा नाफा (NAFA) या संस्थेची स्थापना गेल्यावर्षी अमेरिकेत झाली. हॉलिवूडच्या धर्तीवर मराठी चित्रपटसृष्टीचा भव्य सोहळा प्रथमच त्यांनी आयोजित करून सर्वांचे...

शशांक केतकरच्या ‘मुरांबा’चे ११०० भाग पूर्ण!

स्टार प्रवाहवरील मुरांबा मालिकेने नुकताच ११०० भागांचा टप्पा पार केला. रमा-अक्षय या जोडीसोबतच संपूर्ण मुकादम कुटुंबाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. अक्षय मुकादमची भूमिका साकारणाऱ्या शशांक केतकरने आजवर बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं आहे. मात्र शशांकच्या करिअरमधली मुरांबा ही सर्वाधिक भागांची...

‘सावली’वर सावली.. तीही कडक ऊन नसताना!

राज्यविधिमंडळाच्या नुकत्याच संपलेल्या अधिवेशनात विधान परिषदेत शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते अनिल परब यांनी महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांचा राजीनामा मागताना मुंबईतल्या कांदिवलीत असलेला 'सावली' हा डान्स बार त्यांच्या मातोश्रींचा असल्याचा आरोप केला. काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी येथे छापा टाकून...
Skip to content