Saturday, July 6, 2024
Homeन्यूज अँड व्ह्यूजराष्ट्रीय पुरस्कारासाठी शिक्षकांना...

राष्ट्रीय पुरस्कारासाठी शिक्षकांना 15 जुलैपर्यंत संधी

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2024साठी पात्र शिक्षकांकडून ऑनलाईन स्व-नामांकन 27 जून 2024पासून शिक्षण मंत्रालयाच्या http://nationalawardstoteachers.education.gov.in या पोर्टलवर मागविण्यास सुरूवात झाली असून ऑनलाईन स्व-नामांकन पाठवण्याची अंतिम तारीख 15 जुलै 2024 आहे. यावर्षी जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर तीन टप्प्यातील निवड प्रक्रियेद्वारे 50 शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड केली जाईल. राष्ट्रपतींच्या हस्ते येत्या शिक्षकदिनी 5 सप्टेंबर 2024 रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे आयोजित समारंभात हे पुरस्कार प्रदान केले जातील.

कठोर, पारदर्शक आणि ऑनलाईन निवड प्रक्रियेद्वारे निवडलेल्या देशातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यासाठी, शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागातर्फे दरवर्षी शिक्षकदिनी 5 सप्टेंबरला राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. देशातील शिक्षकांच्या अद्वितीय योगदानाचा गौरव करणे आणि ज्या शिक्षकांनी आपल्या निष्ठेने आणि समर्पित वृत्तीने केवळ शैक्षणिक गुणवत्ता सुधारली नाही तर त्यांच्या विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध केले आहे, त्यांचा सन्मान करणे हा राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराचा उद्देश आहे.

शिक्षक

यासाठीचे पात्रता निकष:

राज्य सरकार / केंद्रशासित प्रदेश प्रशासन, स्थानिक संस्था आणि राज्य / केंद्रशासित प्रदेश मंडळाशी संलग्न असलेल्या खाजगी शाळांद्वारे चालवल्या जाणाऱ्या मान्यताप्राप्त प्राथमिक / माध्यमिक / उच्च / उच्च माध्यमिक शाळांमध्ये काम करणारे शालेय शिक्षक आणि शाळा प्रमुख पुरस्कारासाठी पात्र आहेत.

केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या शाळा, उदा. केंद्रीय विद्यालये, जवाहर नवोदय विद्यालय, संरक्षण मंत्रालय संचालित सैनिक शाळा, अणुऊर्जा शिक्षण संस्थाद्वारे संचालित शाळा आणि आदिवासी व्यवहार मंत्रालयाद्वारे चालवल्या जाणाऱ्या एकलव्य मॉडेल निवासी शाळा आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी संबंधित शाळा (CBSE) आणि भारतीय शाळा प्रमाणपत्र परीक्षा परिषदेशी (CISCE) संलग्न शाळांमध्ये काम करणारे शिक्षक या पुरस्काराकरीता पात्र असतील.

Continue reading

आनंद घ्या नंदिनी वर्माच्या ‘फ्लो ऑफ लाईफ’चा!

राज्यपाल रमेश बैस यांनी आज मुंबईच्या काळाघोडा येथील जहांगीर कलादालन येथे चित्रकार नंदिनी वर्मा यांच्या कला प्रदर्शनाला भेट देऊन चित्रकृतींची पाहणी केली. 'फ्लो ऑफ लाईफ' हे नंदिनी वर्मा यांचे प्रदर्शन येत्या रविवारपर्यंत म्हणजेच ७ जुलैपर्यंत खुले राहणार आहे.

मुंबईत फेरीवाल्यांकडून होत असलेली वीजचोरी उजेडात

बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मुंबई महानगरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरूद्ध चाललेल्या कारवाईदरम्यान अनेक ठिकाणी फेरीवाल्यांनी केलेली वीजचोरी उजेडात आली आहे. विजेच्या खांबांवरून वीजचोरी करणाऱ्या दादर रेल्वेस्थानक परिसर, भायखळा, चेंबूर, बोरिवली, मुलुंड आणि अंधेरी परिसरातल्या फेरीवाल्यांवर कारवाई करताना काल पालिकेने अनेक अनधिकृत वीजजोडण्या खंडित...

दक्षिण मुंबईतल्या हिंदू मंदिरांचे जतन होणार?

मुंबईतल्या गिरगाव/दक्षिण मुंबईतील हिंदू मंदिरांचे जतन, संरक्षण व संवर्धन व्हावे, गिरगावचा सांस्कृतिक वारसा जतन केला जावा यासाठी मुंबई हिंदू मंदिर, जतन, संरक्षण, संवर्धन अभियान, गिरगाव सांस्कृतिक वारसा जतन अभियान, मुंबई विकास परिषद, मुंबई भाडेकरू संघर्ष समितीचे निमंत्रक व संयोजक...
error: Content is protected !!