Friday, November 22, 2024
Homeकल्चर +मुंबईत ऑगस्टमध्ये तबलावादन...

मुंबईत ऑगस्टमध्ये तबलावादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे येत्या २४ आणि २५ ऑगस्टला सकाळी ९.३० वाजता तबलावादन स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या स्पर्धा दोन वयोगटात घेतल्या जातील. या स्पर्धा अव्यावसायिक कलाकारांसाठी आहेत.

शनिवार, २४ ऑगस्टला छोटा गट (१० ते १५ वर्षे) आणि रविवार, २५ ऑगस्टला मोठा गट (१६ ते २५ वर्षे) या स्पर्धा घेतल्या जातील. प्रवेशअर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख २२ ऑगस्ट २०२४ आहे. प्रवेशअर्ज संस्थेच्या कार्यालयात, फेसबुकवर तसेच संस्थेच्या www.dadarmatungaculturalcentre.org  या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

अधिक माहितीसाठी संपर्क साधावा- ०२२-२४३०४१५० 

Continue reading

अॅक्शनपॅक्ड ‘राजवीर’चा ट्रेलर लाँच!

पोलिस अधिकाऱ्यानं एखादं ध्येय निश्चित केलं असेल, तर ते पूर्ण करण्यासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो. अशाच एका ध्येयानं प्रेरित असलेल्या पोलिस अधिकाऱ्याची रंजक गोष्ट 'राजवीर' या चित्रपटातून उलगडणार आहे. अॅक्शनपॅक्ड अशा या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच लाँच करण्यात...

प्रतिभाआजी धावल्या नातू युगेंद्रसाठी!

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आपल्या मुलीसाठी म्हणजेच खासदार सुप्रिया सुळेंसाठी पुणे जिल्ह्यातल्या बारामतीत घरोघरी प्रचाराला जाणाऱ्या शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार आता नातू युगेंद्र यांच्या प्रचारासाठी बारामतीच्या मैदानात उतरल्या आहेत. आज प्रतिभा पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघात जाऊन त्यांचे...

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत ३०५ कोटींची मालमत्ता जप्त

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ व मौल्यवान धातू असा एकूण ३०४ कोटी ९४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. सोबत:...
Skip to content